शिवाई संघटना कोल्हापूर यांचे कडून पूर बाधितांना कपडे वाटप
कोल्हापूर मध्ये जी पूर परिस्थीती निर्माण झाली आहे अश्या लोकांची घरे पुरामध्ये गेली आहेत त्यामुळे त्यांचे स्थलांतर चित्रदुर्ग मठमध्ये करण्यात आले आहे.पूर परिस्थितीची पाहणी करून शिवाई संघटने तर्फे लहान बाळांचे कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.या वेळी
सुनिल कानुरकर,बाजीराव कांबळे,सुनिल नेसरीकर,उदय नागवडेकर,महादेव सुतार, स्वरूपा खुरंदळे,सविता कानुरकर,मनीषा खोत,सुप्रिया गोरे,सागर गुरव,विकास कांबळे, ऋषिकेश पोवार,आदी
उपस्थित होते.सामाजिक जबाबदारी म्हणून आपणा सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे कुणालाही,कुठलीही अडचण असेल तर शिवाई संघटना कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले.
टिप्पण्या