प्रा.पुनम चौगुले यांनी प्रिस्ट विश्वविद्यालय तमिळनाडूच्या फार्मसी विभागातून पीएचडी पदवी संपादन केली
अकिवाट येथील बाळासाहेब पारीसा कोथळी यांची जेष्ठ कन्या तर इचलकरंजी येथील
बाळासाहेब चौगुले यांच्या सुनबाई प्रा.पूनम निलेश चौगुले या फार्मसी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करुन व्हेरीकोज व्हेन्स या रोगावर औषध निर्माण केली आहे. युजीसी मान्यता प्राप्त प्रिस्ट विश्वविद्यालय तंजावर, तामिळनाडू,फार्मसी विभागातुन डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे.माध्यमिक शिक्षण श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट तर पदवीधर शिक्षण के एल ई कॉलेज व राजीव गांधी युनिव्हर्सिटी मध्ये झाले आहे.सद्या प्रोफेसर व वनस्पती औषधनिर्माण शास्त्र विभाग प्रमुख म्हणून अशोकराव माने काॅलेज पेठ वडगाव याठिकाणी अध्यापनाचे काम करत आहेत. या पीएचडी पदवी करीता डॉ.कैलास कौमारवेळू, डॉ.नागाप्पना, डॉ.एम.बी.पाटील, डॉ.एस एस पाटील, डॉ. डि. आर. जडगे, डॉ. एस, व्ही. पाटील, डॉ. ए. पी.गडद, डॉ. आर. एस. बगली यांचे मार्गदर्शन लाभले. तर विशेष सहकार्य विजयसिंह माने अध्यक्ष अशोकराव माने ग्रुप व जिल्हा परिषद सदस्य मनिषा माने, पती डॉ.निलेश चौगुले व कुंटुंबियांचे प्रेरणा मिळाले. पीएचडी संपादन केले बद्दल प्रा.पुनम चौगुले यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
टिप्पण्या