सेलू येथे भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश मेळावा संपन्न झाला.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  

सेलू :  दि. 28/07 /2024 वार रविवार रोजी सेलू येथे साई नाट्य गृह  येथे लहू क्रांती संघर्ष सेना आयोजित मातंग समाज परिवर्तन महा मेळावा व भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव, सुरेश नागरे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून नानासाहेब राऊत यांची उपस्थिती होती. या वेळी लहू क्रांती संघर्ष सेनेच्या पदाधि कारी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सुरेश भैय्यानी सांगितले कि, येणाऱ्या विधानसभा निवडणु
कीत जनतेनी निवडुन दिल्यास सर्वच समाजा च्या हिताची कामे करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात वैभव डख यांची युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी, माणिक हिंगे यांची युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ओबीसी विभागपदी,बालासाहेब ताठे यांची सेलू तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी तसेच गंगाधर गाडेकर यांची सेलू तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी लहू क्रांती संघर्ष सेनेचे राजू कसबे, बाबासाहेब कांबळे,किशोर गवारे, संजय चौरे,यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच  या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे,राजेश चव्हाण,
रामजी घुगे, नागसेन भेरजे, निशांत भागवत जोगदंड, कमलताई लोखंडे,शेख दिलावर, राजेंद्र गाडेकर, माऊली थोरात, डॉ निशांत मुंढे,इरफान जमीनदार, राजेश चव्हाण, इर्शाद पाशा चांद पाशा, माणिक हिंगे, पप्पु टाकरस,राहुल कुटे, सुधाकर दराडे, गोपाल बुधवंत,ऋषी अंभोरे आदिची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू कसबे, बाळासाहेब जोगदंड,शेख दिलावर, राजेंद्र गाडेकर, इरफान जमीनदार व ईतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचा लन इरफान जमीनदार यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.