जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिरोळ :  प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली मार्फत..मौजे आगरमधील  सिद्धिविनायक सोसायटी, मगदूम सोसायटी आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ सुरेखा याळगी या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा सौ. अश्विनी नरुटे यांनी स्वागत केले.
 प्रमुख पाहुण्या सौ. सुरेखा याळगी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आणि दुर्गा सहेलीच्या कार्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जायंट्स फेडरेशन समन्वयिका डॉ. सौ. स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या की  विद्यार्थ्यांनी सातत्य  आणि प्रयत्न या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आयुष्यात एक चांगला माणूस ओहोण्याचा प्रयत्न करावा.
 या कार्यक्रमात ग्रुपच्या माजी अध्यक्ष सौ कुसुम जगदाळे यांनी देखील गोष्टी रूपाने आणि विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 तसेच फेडरेशन स्पेशल ऑफिसर श्री सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी,  जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या उपाध्यक्षा सौ. विणा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली. 
ग्रुपच्या खजिनदार ऍड. शर्मिला देशपांडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ. कुसुम जगदाळे यांनी केले.याप्रसंगी ग्रुपच्या सौ संगीता जाधव, सौ पूजा  बदामे , सौ नलिनी देसाई,  सौ श्वेता पुजारी व पालक आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
दुर्गा सहेली तर्फे 19 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा देखील  सन्मान करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.