निर्भय बनो विषयावर सेलू येथे डाॅ. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.



सेलू : देशातील व राज्यातील वर्तमान राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने संविधान बचाव समिती सेलू तर्फे जनजागृतीच्या उद्देशाने सेलू तालुक्याचे भुमिपुत्र, पर्यावरणतज्ञ, विचारवंत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रख्यात व्याख्याते डाॅ. विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता साई नाट्यगृह, महेश नगर सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण शेरे पाटिल तर स्वागता ध्यक्ष म्हणुन शेख महेमुद सर हे असणार आहेत. लोकशाही व संविधान रक्षणाच्या उद्देशाने आयोजित या व्याख्यानास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने दत्तूसिंग ठाकूर, जाहेद घौरी,प्रा.के.डी.वाघमारेॲड. विष्णु ढोले, सुनिल गायकवाड, श्रीनिवास उघडे, रामेश्वर पौळ, शेख साजीद, अमजद बागवान सतीश जाधव सह संविधान बचाव समिती सेलू तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.