डोक्यात वार केल्याने हॉटेल चालकाचा मृत्यू

कानूर (प्रतिनिधी) : खाजगी सावकरीचा आणखी एक बळी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. चंदगड तालुक्यातील मजरे शिरगाव येथील सेलिब्रेशन हॉटेलचे मालक सुरेश भोगण यांचा व्याजाने दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून हाणामारीत झाली त्यामध्ये भोगण यांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी दत्तू धोंडीबा गावडे (रा. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबत पत्नी साधना सुरेश भोगान यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोगण यांचे चंदगड फाट्यावर सेलिब्रेशन नावाने हॉटेल असून त्यासाठी आरोपी दत्तू गावडे यांनी व्याजाने ४० हजार दिले होते. ते पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये रविवारी शिवीगाळ होवून वाद झाला. या वादातून हाणामारी होवून आरोपीने भोगण यांच्या डोक्यात लाकडी टोण्याने वार केला.त्यात ते गंभीर जखमी होवून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल (मंगळवारी दि. १७ ऑक्टो.रोजी) मृत्यू झाला. या प्रकरणी दत्तू गावडे याला चंदगड पोलीसांनी अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.खाजगी सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी दत्तू गावडे याने भोगण यांना १० टक्क्याने व्याजाने ४० हजार दिल्याचे कबूल केले असून या प्रकरणी खाजगी सावकारी अधिनियम अंतर्गत वाढीव ३९, ४५ कलमे लावण्यात आली आहेत. तर त्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी सह.पोलिस निरीक्षक मुल्ला अधिक तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.