रेंदाळ प्रभाग क्रमांक १ मध्ये विविध कामासाठी चालू असलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मा
रेंदाळ प्रभाग क्रमांक एक मधील माने नगर व अंबाई नगर भागातील काही भागात पाणीपुरवठा अपुऱ्या दाबाने व अनियमितपणे होत आहे, त्यामुळे भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
तसेच 45 मिनिटे होत असलेला पाणीपुरवठा 1 तास करावा असे वारंवार तोंडी व लेखी सांगून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.त्याचबरोबर कचरा उठावासाठी घंटागाडी वेळेवर येत नसल्याने ठिकठिकाणी कचरा साचून राहत आहे, यामुळे डेंग्यू, मलेरिया स्वाईनफ्ल्यू यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.
यासंदर्भात रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी मंगळवार दि.१० सकाळी उपोषणास सुरुवात केली होती.तसेच जागेवर कामास सुरुवात झाल्याशिवाय मागे हटनार नाही असा पावित्रा घेतला होता पण संध्याकाळी ग्रामसेवक यांनी लेखी आश्वासन देऊन विनंती केली असता उपोषण मागे घेण्यात आले.सत्ताधाऱ्यांरी सदस्यांना जर उपोषण करावे लागत असतील तर याच्यापेक्षा गावासाठी वाईट गोष्ट नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व नागरिक,सदस्य यांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे अशी नागरिकांतून जोरदार चर्चा आहे.
यावेळी ग्रामसेवक बी.टी.कुंभार,ग्रामपंचायत सदस्य उषा चौगुले, गजानन वाईंगडे, संजय चौगुले, युवासेनेचे सुनिल गुदले, शुभम चौगुले, अमर भोसले,विश्वजीत कांबळे, रोहण केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या