रेंदाळ ग्रामपंचायत वरती महिलांचा धडक मोर्चा काढत नागरी सुविधांसाठी दिले निवेदन
रेंदाळ ता.हातकणंगले येथील भगतसिंग रोड येथील महिलांनी ग्रामपंचायत वरती धडक मोर्चा काढून ग्रामपंचायत सरपंच यांना जाब विचारला रेंदाळ ग्रामपंचायतकडून गावामध्ये अनेक सुविधांचा अभाव असून नागरिक अनेक वाईट प्रसंगांना तोंड देत आहेत रस्त्याची झालेली चाळण, तुंबलेल्या गटारी, आणि पिण्यासाठी नसलेले पाणी यासाठी आज प्रभाग क्रमांक-३ भगतसिंग रोड मधील महिलांनी ग्रामपंचायत वरती धडक मोर्चा काढून १० दिवस झाले आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही तेव्हा महिलांची होणारी वनवन हि त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत सरपंच यांना येऊन जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक अशी महिलांना उत्तरे दिली नसल्यामुळे महिला आक्रमक होऊन महिलांनी आमच्या मागण्या पूर्ण करा व वेळेवरती पाणी सोडा या उद्देशाने पाणीपुरवठा सभापती मेहबूब मुजावर यांनाही त्यांनी वेटिस धरले व लवकरात लवकर पाणीपुरवठा करावा असे त्यांना कडक शब्दात सांगितले व सर्वानुमते निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुप्रिया पाटील. पाणीपुरवठा सभापती मेहबूब मुजावर फैमूनिसा नायकवडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.
टिप्पण्या