आरपी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशोत्सव.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अधिष्ठाता मार्गदर्शन व स्वागत समारोप.

 
परभणी : दि.05 
शहरातील आर. पी. वैद्यकीय महाविद्यालया त प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार 3 ऑक्टोंबर रोजी अधिष्ठाता मार्गदर्शन व स्वागत समारोह आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक रागसुधा आर., शासकीय वैद्यकीय महाविद्यालया चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. राजू सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करीत विद्यार्थ्यांचे परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. वेदप्रकाश पाटील यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासा च्या दृष्टीकोनातून आर.पी. वैद्यकीय महाविद्यालय व रिसर्च सेंटरची स्थापना केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. परभणी शहर हे कृषी विद्यापीठाच्या नावा मुळे ओळखले जायचे. आता हे शहर दोन वैद्यकीय महाविद्यालया मुळे वैद्यकीय महाविद्या लयाचे शहर म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अँटी रँगीग, लैंगिक समानता, महिला सुरक्षा संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच ध्येय प्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याचा सल्ला दिला. डॉ. शिवाजी सुक्रे यांनी पालकांचे अभिनंदन करीत विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमात काय शिकायला भेटणार याची माहिती दिली. यावेळी माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यामागची दूरदृष्टी विषद केली. तसेच वैद्यकीय पदवी घेवून डॉक्टर होणारी नवीन पिढी ही भारत देशाला जगात महासत्ता बनवण्यात अग्रेसर राहील, असे मत व्यक्त केले.आरपी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी संस्थेच्या नियम, शिस्त व अनुपालनाबद्दल माहिती दिली.यावेळी सर्व प्रमुख पाहुणे व अध्यक्षांनी उपस्थित सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना पांढरा कोट प्रदान करून हिप्पोक्रॅटिक शपथ दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तृप्ती बोरूडकर, डॉ. वंदना दुधमल यांनी केले तर आभार डॉ. पल्लवी दोडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी आर.पी.वैद्यकीय महाविद्यालय व रिसर्च सेंटरच्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.