मिळकत धारकांची जप्ती, दंड, डिजिटल बोर्डवर प्रसिद्धी आदी कारवाई टाळणेसाठी नगरपरिषद हुपरी कडील सर्व कर वेळेत भरून सहकार्य करा..... मा मुख्याधिकारी श्री अशोक कुंभार

सागर पाटील हुपरी,-



नगरपरिषद हुपरी कडील नगरपरिषद कर्मचारी वेतन, नगरपरिषद विद्युत बीले, अत्यावश्यक सेवाची देयके प्रलंबित राहिलेली आहेत. येणार वर्षात नगरपरिषद निवडणूक असल्याने त्या करीताही निधी उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. या सर्व बाबीचा विचार करून नगरपरिषद हुपरी कडील कर व मिळकत विभागाची बैठक मा मुख्याधिकारी यांनी दि ०३/१०/२०२३ इ रोजी घेतली असता हुपरी नगरपरिषद कडील कराची वसुली निव्वळ १० % पर्यंत झाली असलेचे दिसून आले. त्यामुळे नगरपरिषद कडील कर वसुली बाबत कर विभागास सक्त सूचना करणेत आल्या. त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५० नुसार नगरपरिषदेकडील चालू आर्थिक वर्षीचा घरफाळा हा सदर वर्षांच्या ३१ डिसेंबर अखेर भरणे आवश्यक आहे. या कालावधी नंतर येणारे घरफाळा रकमेवर २ % प्रती महा इतके दंड व्याज लागू करणे बाबत तरतूद आहे. सबब २०२३ २०२४ या आर्थिक वर्षातील घरफाळा व पाणीपट्टी दिनांक ३१ डिसेंबर २०२३ अखेर भरून सहकार्य करावे. सदर कालावधी नंतर म्हणजे १ जानेवारी २०२४ नंतर घरफाळा भरलेस नियमानुसार घरफाळ्यावर दोन टक्के इतके प्रतिमाह- दंडव्याज लागू करणेत येणार आहे.

तसेच मागील ( २०२२ / २०२३ ) वर्षाअखेरचा ज्यांचा घरफाळा व पाणीपट्टी थकीत असेल अशा सर्व थकबाकीदारांनी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ अखेर त्यांची थकबाकी नगर परिषदेकडे जमा करावी. अन्यथा अशा थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन तोडणे व त्यांच्या नावांची डिजिटल बोर्ड द्वार प्रसिद्धी देणे, जप्ती करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईमुळे होणाऱ्या मानहानीसाठी संबंधित मालमत्ता धारक स्वतः जबाबदार राहतील. त्यामुळे मागील (२०२२/२०२३) वर्षाअखेरचा ज्यांचा घरफाळा व पाणीपट्टी, दुकान कर, जागा भाडे आदि कर थकीत असेल अशा सर्व थकबाकीदारांनी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ अखेर भरून सहकार्य करावे. त्यानंतर कोणी थकीत राहिलेस वरील प्रमाणे कारवाई करणेत येईल याची नोंद घेऊन वरील नमूदकेले कालावधीमध्ये आपले कडील घरपट्टी, पाणीपट्टी दुकान कर, जागा भाडे आदि कराची रक्कम भरून सहकार्य करावे. वेळेत कराची रक्कम भरून जप्ती, दंड, डिजिटल बोर्ड लावणे आदि सारखा कटु प्रसंग टाळावा असे आवहन मुख्याधिकारी मा अशोक कुंभार यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई, कर निरीक्षक डॉ ज्योती पाटील, मिळकत पर्यवेक्षक श्रद्धा गायकवाड, उदय कांबळे, कर वसुली लिपिक रमेश गुरव, सुर्यकांत खोत, नयना शिंदे, प्रसाद बाविस्कर, महेश फुले मंगेश कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.