निपाणी टाकळी ता.सेलू साखळी उपोषणाचा तिसरा दिवस.

शिवाजी शिंदे
सेलू तालुका प्रतिनिधी

सेलू : दि.29 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोनाच्या समर्थनार्थ शासनाला चाळीस दिवसाची मुद्धत देऊन हि शासनाने कुठलीच हलचाल केली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाराजीचे सूर उमटले असून गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांना,पुढऱ्यांना गाव बंदी प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले आहे. जो पर्यंत मराठा समाजास कुणबी मध्ये आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्याच परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. त्याचेच पडसाद  सेलू तालुक्यात निपाणी टाकळी,करडगाव,कवडधन,आंबेगाव, गोगलगाव, काजळी रोहिणा आदी ग्रामीण भागामध्ये उमटले असून मराठा समाजात तीव्र संताप निर्माण झाल्यामुळे सर्वांनी मनोज जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निपाणी टाकळी येथे साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करण्याचा निर्धार घेतला आहे. यासाठी त्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये जाऊन लोकामध्ये जनजागृती केली त्याच्याच परिणाम म्हणून दि. 29 ऑक्टो.पासून  समस्त मराठा समाजातर्फे साखळी उपोषण व आमरण उपोषण  सुरु करण्याचा निर्धार केला असून सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले. त्यास अनेकांनी पाठींबा दिला.आज निपाणी टाकळी पाटीवर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यामध्ये आज गोगलगाव  येथील सकल मराठा समाजा च्या ग्रामस्थांनी दिवस भर आमरण उपोषण केले. त्यामध्ये दिगांबर मगर,दिगंबर खवास,ज्ञानेश्वर मगर,आण्णासाहेब मगर,आबासाहेब मगर,दिलीप मगर,भारत मगर,अमोल मगर,पांडुरंग मगर,नारायण मगर,मारोती मगर,कैलास मगर,दिगंबर मगर,आकाश मगर,आक्रूर मगर,नारायण मगर इत्यादी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन समस्त मराठा समाजास न्याय मिळवून द्यावा. असे सर्व समस्त मराठा समाजाची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.