करजखेडा पुनर्वसन येथील सर्व महिलांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन.
शिवाजी शिंदे
डॉ संजय रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम.
सेलु :- श्रीराम प्रतिष्ठान व डॉ. संजय दादा रोडगे मित्र मंडळ यांच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त मंठा येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी आज करजखेडा येथील महिलांना मोफत गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. करजखेडा पुनर्वसन गावातील महिलांना रेणुका माता देवी दर्शन मंठा करिता नेण्यात आले यावेळी उप सरपंच सुनील झोल ग्रामपंचायत सदस्य राजू हातागळे सुनील झोल, अमोल झोल, दिनकर शेजुळ, उद्धव हातागळे, चालक मोहन मगर, करजखेडा पुनर्वसन येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
टिप्पण्या