हुपरीत प्रधानमंत्री स्वनिधी योजना शिबीरास उदंड प्रतिसाद

प्रतिनिधी - सागर पाटील हुपरी,
हुपरी- हुपरी येथे भगवा रक्षक संघटना व श्री अंबाबाई शहर विकास आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत फेरीवाले, भाजीपाला विक्रेते व पथविक्रेते यांना विनातारण कर्ज नोंदणी व कर्ज मंजूरी शिबीराचे
आयोजन केले होते. कमीत कमी कागदपत्रांवर नोंदणी बरोबर तात्काळ कर्जास मंजूरी मिळत असलेमुळे या शिबीरात कर्ज मागणीसाठी शहर व परिसरातील सुमारे ११५० भाजीपाला विक्रेते व पथविक्रेत्यांनी या बहुपयोगी योजनेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या शिबीरात भाजीपाला व पथविक्रेत्या महिलांनीही नोंदणी केली आहे. यातील बहुतांश कर्जदारांच्या खात्यावर सणासुदीच्या तोंडावर तात्काळ पैसे जमा झालेने भाजीपाला विक्रेते व पथविक्रेते यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जात होता. माजी नगरसेवक दौलतराव पाटील व मनसे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर यांच्या पुढाकाराने गेल्या सोमवारपासून मनसे मध्यवर्ती कार्यालय येथे या शिबीराचे आयोजन केले होते.भगवा रक्षक संघटना, श्री अंबाबाई शहर विकास आघाडी यांच्या वतीने आयोजित केलेले हे शिबीर यशस्वी ठरले आहे. यापुढील काळातही शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असलेचे प्रतिपादन मा. नगरसेवक दौलतराव पाटील यांनी केले आहे. दौलतराव पाटील यांचे हस्ते लाभार्थींना कर्ज निधीचे वाटप करणेत आले. या शिबीराचे यशस्वीतेसाठी महादेव पाटील, उमाजी पाटील, चंद्रकांत भुजूगडे,शिवसेना तालुका प्रमुख अजीत सुतार, शहरप्रमुख नितीन गायकवाड,स्वाभीमानी पक्षाचे राजाराम देसाई, मा. उपसरपंच धर्मवीर कांबळे,पिपल्स पार्टीचे विद्याधर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे पांडूरंग माणकापुरे, कृष्णकांत निकम, सागर पाटील, प्रशांत पाटील, ऋषीकेश साळी, पृथ्वीराज पाटील,रमेश भोरे, सुनिल धोंगडे, सोमेश पाटील,अतुल नागावकर, प्रफुल्ल लाड,अक्षय पोवार, आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.