श्री जगदंबा माता मोफत दर्शन यात्रा गुरुवार पासून सुरु.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


विनोद बोराडे व मित्र मंडळाचा उपक्रम. मोफत वाहन सुविधा.


सेलू : नवरात्र महोत्सवा निमित्त गेल्या अनेक वर्षा पासून सेलू शहरातील सर्व महिला भगिनींना मंठा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घडावे,या उद्धेशाने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाच्या वतीने  गुरुवार पासून (दि. 19 ऑक्टो.) श्री जगदंबा माता दर्शन यात्रा सुरु होत आहे. याचा अधिकाधिक महिला भक्तानी  लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  पाचव्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत ( 19 ऑक्टोंबर  ते 22 ऑक्टोबर 2023) महिला भाविकांची जाण्या- येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री.साईबाबा मंदिर परिसरात ही वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. श्री साईबाबा मंदिर, महेशनगर ते मंठा व परत श्री साईबाबा मंदिर, असा दर्शन प्रवास राहील.सकाळी 9 ते सायंकाळी 4  असा दर्शन यात्रेसाठी वेळ दिला आहे. फक्त महिलांसाठीच ही व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत दर्शन यात्रा प्रवाससाठी संपर्क क्रमांक  8087205555,9371718525,9960 160963 या नंबर वर संपर्क करावा असे संयोजकानी  कळविले आहे. दरवर्षी हा उपक्रम माजी नगराध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारे राबवीत असतात.या उपक्रमाला महिला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. मित्र मंडळ आणी त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हिरहिरीने पुढाकार घेऊन उपक्रम अतिशय नियोजनबद्ध राबवीत असतात.यंदाही या उपक्रमाला हजारो महिला भक्त प्रतिसाद देतील यात काहीच शंका नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.