सदलगा -ज्योतिबा कोल्हापूर आगाराची कोरोना महामारीच्या वेळी बंद झालेली बस सेवा आज पासून पूर्ववत सुरू.

चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातून सदलगा -ज्योतिबा डोंगर अशी बस सेवा उपलब्ध होती परंतु ही बस सेवा कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये प्रवासी अभावी बंद झाली,
ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सदलगा शहरातील  सामाजिक कार्यकर्ते श्री पिरगौडा पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व  कोल्हापूरचे आमदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील, कर्नाटक विधान परिषद सदस्य श्री प्रकाश हुक्केरी, चिकोडी - सदलगा मतदार क्षेत्राचे आमदार श्री गणेश अण्णा हुक्केरी, यांच्या सहकार्यातून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून सदर बस सेवेसाठी  कोल्हापूर विभागीय नियंत्रक सौ अनघा बारटक्के, विभागीय वाहतूक अधिकारी श्री संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक कोल्हापूर श्री अनिल म्हेतर, स्थानक प्रमुख कोल्हापूर श्री सुरेश शिंगाडे ,तसेच सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री शितल चिखलवाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ही बस सदलगा, बोरगाव, रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, कोल्हापूर, ज्योतिबा या मार्गाने धावणार असून चिकोडी तालुक्यातील ज्योतिबाला जाणाऱ्या प्रवाशांनी व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पिरगौडा पाटील यांनी केले आहे.

सदर बस सदलगा हून दररोज सकाळी 06.15 व दुपारी 02.30 वाजता ज्योतिबा डोंगराकडे निघणार आहे तसेच सदलगा कोल्हापूर सकाळी 11 वाजता सुटणार आहे.

ज्योतिबा डोंगरावरून सदलगा कडे सकाळी 08.30 वाजता व संध्याकाळी 05.30 वाजता निघणार आहे. तसेच कोल्हापूरहून सदलगा कडे दुपारी एक वाजता ही गाडी सुटणार आहे.

बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी सदलगा शहरातील माजी मुख्याध्यापक श्री गुंडकल्ले सर, पिरगौडा पाटील, श्री अण्णासाहेब कदम, श्री मकरंद द्रविड, श्री महावीर चिंचणे ,श्री महादेव पाटील , श्री सुधाकर कमते, ईरगौडा पाटील, सौ पाटील, सदलगा बस स्थानक प्रमुख श्री डोनवाडे सदर बसचे वाहक चालक या बरोबर अनेक प्रवासी नागरिक उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.