सुधारित पाणीपट्टी दर तात्काळ रद्द करा शिवसेना शहर (उद्धव ठाकरे) यांची मागणी
हुपरी सागर पाटील - नगरपरिषदेने पाणीपट्टी दुप्पट वाढ करून 31 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे सदर निवेदन देऊन हरकती म्हणून दाखल करण्यात विनंती केली होती.
परंतु नगरपरिषदेच्या माध्यमातून सदरच्या पाणीपट्टी वाढ करून गावातील नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसायचे काम मागील आठवड्यात पत्रकाद्वारे करण्यात आले
दुपटीने वाढ करून 500/- कमी करतो असे सांगून
नागरिकांची दिशाभूल केली व सदर दरवाढ नागरिकांची कोणतीही हित डोळ्यासमोर न ठेवता नागरिकांच्या अडचणीत भर घालण्याचे काम होत आहे.
तरी नागरिकांच्या भावना तीव्र होत आहेत, ही दरवाढ तात्काळ 10 दिवसाच्या आत मागे घ्यावी
अन्यथा शिवसेना (उद्धव ठाकरे) व युवासेना यांच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेला टाळे ठोक,रास्ता रोको,प्रसंगी गावबदं आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी मा.शहर प्रमुख राजेंद्र पाटील नगरसेवक बाळासो मुधाळे, नगरसेविका पूनम पाटील
महिला शहरप्रमुख मीना जाधव, रघुनाथ नलवडे,विजय जाधव,संजय वाइंगडे,भरत मेथे,अरुण गायकवाड
अवघडी बाणसे,संदीप भंडारे,प्रवीण चौगुले,संताजी देसाई,भरत देसाई,विनायक नाकील,
अभिनंदन मानकापुरे,अक्षय चाणक्य
तानाजी पांडव,वैभव लायकर,शुभम भिवटे,विशाल पाटील,नितीन काटकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या