भारतीय जनता पार्टी चा वतीने विविध कामांच्या चौकशी बाबत तहसीलदार यांची भेट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
 
सेलू- आज तहसील कार्यालय सेलू येथे सेलू जिंतूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौ.मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात तसेच सेलू तालुक्यासह जिल्ह्याचे शिक्षण महर्षी मा.डॉ.संजय भाऊ रोडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजना तसेच राशन संदर्भातील अडचणी अशा विविध कामांच्या चौकशी बाबत तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टी सेलू तालुक्याच्या वतीने ऑनलाईन झालेल्या लाभार्थ्यांची यादी देऊन प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी भाजपा सेलू तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ कदम, जयसिंग शेळके, सौ.वनिताताई चाफे कर, कैलास पवार, शामराव चाफेकर व ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच तसेच लाभार्थी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी तहसील दार साहेब यांनी सर्वप्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.