श्री दुर्गामाता दौड मनपाडळे
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील एक खेडे म्हणजेच समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती पैकी ९ वा (प्रताप मारुती) स्थापित असलेले हे मनपाडळे नावाचे गाव. या गावांमध्ये सर्व सणोत्सव जोरदार उत्साहात साजरे होत असतात. पण शारदीय नवरात्रोत्सव मध्ये घेतली जाणारी श्री दुर्गामाता दौड या गावाध्ये होत नसल्यामुळे गावामध्ये उत्सवाचे वातावरण नसायचे. पण यावर्षी गावातील काही तरुण वर्गाने श्री दुर्गामाता दौड सुरू करण्याचे ठरवले व गावातील इतर युवा वर्गाला एकत्र करून या संदर्भात माहिती दिली व त्यापद्धतीने पुढचे पाऊल उचलून नियोजण केले. ज्या दिवसाची तरुण वर्ग वाट बघत होता तो घटस्थापना म्हणजेच दुर्गामाता दौड चा पहिला दिवस. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे 10 दिवस गावातील 10 वेगवेळ्या तरुणींना ध्वजधारीचा मान दिला. पहिल्याच दिवशी गावातील युवा युवक, युवती चांगल्या संख्येने सहभागी होते.दौड गावात 10 दिवस वेगवेवळ्या मार्गाने जात होती, ज्या मार्गाने दौड जाणार आहे त्याच्या आदल्या रात्री तो मार्गावर पाणी मारून झाडून तो मार्ग स्वच्छ करून मार्गावर सर्वत्र रांगोळी काडण्यासाठी गावातील युवक वर्ग एकत्र यायचा. हे बघून गावातील बाकीच्या तरुण युवक/ युवतीच्या मनात देखील सहभागी होण्याची इच्छा जागृत झाली. त्यामुळे गावामध्ये एक चांगल्या प्रकारे उत्सवाचे वातावरण झाले. सर्वात प्रथम ध्वजधारी असे त्यापाठोपाठ मावळ्यांची वेशभूषा केलेले युवक तसेच युवती हातामध्ये शस्त्र घेऊन उभे असायचे त्यानंतर गावातील युवती आणि सगळ्यात मागे युवक उभे रहायचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर पासून दौड ला सुरवात व्हायची आणि ठरलेल्या मार्गाने दौड पुन्हा मंदिराजवळ येऊन समाप्त होत असे, अश्या प्रकारचे नियोजन ९ दिवसाचे होते, दिवस १० वा विजयादशमी म्हणजेच दशहरा या दिवशी श्री दुर्गामाता दौड चा शेवटचा दिवस म्हणजेच शोभा यात्रेचा दिवस या दिवशी सर्व गावात रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घातल्या गेल्या होत्या कारण या दिवशी पालखीचे सोहळ्याचे नियोजन केले होते. सर्वात प्रथम ध्वजधारी त्यापाठोपाठ शस्त्रधरी युवती तसेच मावळ्यांची वेशभूषा परिधान केले युवक त्यांच्या मागे यात्रेला आणलेल्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला चिमुकला अश्वावर स्वार केलेला होता. त्यांच्या पाठोपाठ पालखी घेऊन धारकरी उभे होते, त्यानंतर गावातील लहान-मोठ्या युवती तसेच महिला वर्ग होता त्यानंतर लहान-मोठे युवक शिस्तबद्ध उभे होते विशेष म्हणजे सर्वांच्या डोक्यावरती भगवा रंगाचा फेटा परिधान केला होता त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच डोळ्याचे पारने फेडणारा शोभा आली. गावातील सर्व तरुण युवक-युवतींनी मोठ्या संखेने प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे गावातील सर्व युवकांनी कोणत्याही प्रकारे राजकीयदृष्ट्या विचार न करता आपआपसातील वादविवाद बाजूला ठेऊन या झालेल्या श्री दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होऊन या दौड ची शोभा वाढवली व एक चांगल्या रीतीने श्री दुर्गामाता दौड ला पहिल्याच वर्षी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रतिसाद दिला.
टिप्पण्या