श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि.शाखा सेलूचा वर्धापन दिन मोठ्या उत्सावात साजरा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू: दि. 06 ऑक्टो. शुक्रवार रोजी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि. शाखा सेलूचा वर्धापन दिन सकाळी ठीक 11वाजता मोठ्या उत्सवात  साजरा  करण्यात आला. कार्यकामासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबेजोगाई शाखा येथील हेड ऑफिसर राम आपेट सर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संलग्न मुंबई सेलू तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे  अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन,सदस्य डॉ. शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सेलू शाखेचे शाखाधिकारी संदेश कापुरे यांनी समाजिक जाणीव ठेवून एका छोटयाखांनी आपल्या प्रास्ताविकात बँक शहरातील सामाजिक,सांस्कृतिक कार्यामध्ये नेहमीच आपले योगदान देत आली आहे.बँकेने वेळोवेळी खातेदारांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न केलेला  आहे.खातेदारांना आणी शहरातील नागरिकांना नेहमीच चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.  बँकेचे वरिष्ठ अधिकारी राम आपेट सर म्हणाले की, बँके तर्फे ज्या काही योजना खातेदारांना, आणी नागरिकांना देण्यात येतात या सर्व योजना विषयी सखोल माहिती आणी मार्गदर्शन केले.पत्रकार संघा तर्फे लक्ष्मण बागल यांनी बँकेच्या सर्व योजनांचा लाभ खातेदारांनी व नागरिकांनी घेऊन वेळेवर कर्जाची रक्कम परतफेड करणे गरजेचे आहे त्यामुळे आपला ही विकास होईल आणि बँकेचापण उत्कर्ष होण्यास मदत होईल.तत्पूर्वी सेलू तालुका पत्रकार संघा तर्फे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन सदस्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी  बँकेच्या शाखधिकारी सह सर्व  कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. कार्यकामाचे सूत्र संचालन बँकेचे रोखाधिकारी वर्षा घुले यांनी केले.आभार प्रदर्शन संभाजी रोडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे सर्व कर्मचारी, सदानंद गडदे,शेख शाकेर आदीनी केले. कार्यक्रमाला बँकेचे खातेदार,महिला,नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.