भाजपाद्वारे परभणी व सेलूत विरोधकांना जोडेमारो आंदोलन.
शिवाजी शिंदे
नोकरभरतीतील कंत्राटीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी चाच, उलट्या बोंबां विरोधात जोरदार घोषणाबाजी.
परभणी : दि.21 नोकर भरतीत कंत्राटी करणाचा निर्णय घेवून पुन्हा उलट्या बोंबा मारणार्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या पोस्टरला भारतीय जनता पार्टीच्या संतप्त पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त केला.भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली सेलूत तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, अर्जून बोरुळ, भागवत दळवे, गणेश काटकर, मयूर वाघ, संजय गाडेकर, पंजाब पौळ, कपील फुलारी, अशोक आंबोरे, शिवहरी शेवाळे, दगडोबा जोगदंड, रुपाली ठाकूर, संदीप बोकन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारत निषेध व्यक्त केला.
परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर आदींनी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या दुटप्पी भूमिकांवर कडाडून टिका केली. कंत्राटी करणाचा निर्णय हा महाविकास आघाडी नेच घेतल्यानंतरसुध्दा उलटपक्षी बोंब सुरु केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात मोहन कुलकर्णी, रोहित जगदाळे, संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर, उमेश शेळके, मनोज पोरवाल, मंगला मुदगलकर, छाया मोगले, अभिषेक वाकोडकर, संजय कुलकर्णी, अक्षय डहाळे, प्रियांका खडके, अजिंक्य औंढेकर, रामदास पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी होते.
टिप्पण्या