अल्टरनेटिव्ह मेडिसीन ऑफ आयुष भारत च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी डॉ विनायक मेथे यांची निवड



रेंदाळ प्रतिनिधी - (सचिन कुंभार) दि.29 अल्टरनेटिव्ह मेडिसिन ऑफ  आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी डॉ.विनायक मेथे (रेंदाळ ) यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुल्लाणी यांनी दिली.असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.एन.सुतार , राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.शाहीन मुलाणी राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा डॉ साक्षी सुतार,राष्ट्रीय कायदे प्रमुख वैद्य मेटकरी सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ वाघमारे सर राष्ट्रीय सचिव डॉ भोसले सर आदि पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने ही नियुक्ती करण्यात आली.या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.या निवडीनंतर डॉ.विनायक मेथे यांच्यावर विविध स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    असोसिएशन सभासदांच्या वाढीसाठी व सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही अजून जोमाने प्रयत्न करणार असल्याचे नूतन राज्य अध्यक्ष डॉ विनायक मेथे यांनी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.