मलिकवाड हायस्कूलमध्ये पालक सभा.,दहावीचा निकाल वाढवण्यासाठी प्रयत्न, सभेत विविध विषयावर चर्चा

 


मलिकवाड, (अमर माने ) ता. 29 : येथील हायस्कूलची पालक सभा नुकतीच पार पडली.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. आर.माने यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायले. त्यानंतर श्रुत रावसाहेब कुन्नुरे या लहान मुलांने संस्कृत स्रोत गायले. यावेळी त्याचे शिक्षक व पालकांकडून कौतुक करण्यात आले. 

श्री. मुख्याध्यापक माने म्हणाले की, सध्या जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची असून येणाऱ्या  आयुष्याला कलाटनी देणारे आहे. त्यामुळे जिद्द, चिकाटी व धैर्याने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यंदा 2023 सालातील दहावी  परीक्षेचा निकालात भरघोस यश मिळवून शाळेचे नाव लौकिक करावे. त्यासाठी शिक्षक व पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश वैजे यांनी आठवी व नववी वार्षिक बोर्ड परीक्षेची माहिती दिली.

    शिक्षक निवलगी म्हणाले, दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी  कष्ट करणे महत्त्वाचे आहे. दहावीचा निकाल हाच पुढील शिक्षण घेण्याचा भक्कम पाया असून आपले आयुष्य बदलते. अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर सेवा बजावत असून त्यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवावे. त्यासाठी आमची नेहमी मदत असणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेची सविस्तर माहिती दिली. यावेळी पालक गंगाराम केरुरे व शिक्षक बाबासो मंगावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. 

     पालक सभेस संदीप भोजने, आप्पासो मंगावे, जंबु कुन्नूरे, परविन नदाफ, शिल्पा अंकले, अंजुम मुल्ला, भिसे, अमोल माने यांच्यासह, पालक, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक एम. बी. केरुरे यांनी सूत्रसंचालन केले तर एन. डी. निडसोशी यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.