अकिवाट ग्रामपंचा़यतीच्या उपसरपंच पदी प्रकाश रायनाडे(सावकार) यांची बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी / रमेशकुमार मिठारे



    अकिवाट तालुका शिरोळ येथील यड्रावकर गटाचे प्रकाश राजगोंडा रायनाडे (सावकार) यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सुकाणू समितीच्या ठरलेल्या मुदतीत सौ रत्ना रमेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदासाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात अकरा वाजता विशेष सभा सरपंच सौ.वंदना सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत प्रकाश रायनाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर सरपंच वंदना पाटील,इकबाल बैरगदार, आप्पासो बडबडे, शितल हळीगळे, सुहास पाटील, ताजुद्दीन तहसीलदार, गणपती कागे, बाबासो उमाजे यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभिनंदन व शुभेच्छा दिले उपसरपंच प्रकाश रायनाडे (सावकार) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गटाच्या नेत्यांना व सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावच्या विकास कामात झोकून घेऊन काम करण्याची ग्वाही दिली
निवडी वेळी ॲड. अरुण कल्लण्णावर, आप्पासो दानोळे, नेमगोंडा पाटील, श्रणीक चौगुले, सागर रायनाडे, युनूस तहसीलदार, सुरेश सावंत, अविनाश रायनाडे, अमोल कांबळे संजय रायनाडे उपस्थित होते आभार ग्रामविकास अधिकारी एन पी निर्मळे यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.