आरडगांवच्या पाणी प्रश्नाचे ग्रहण केंव्हा सुटणार.... कोणी पाणी देता काहो पाणी पाण्यासाठी आरडगांवकरांची आर्त हाक.....
लोणंद प्रतिनिधी - (दिलीप वाघमारे) फलटण तालुक्यातील आरडगांव या गावाला एक राजकीय वारसा आहे .
मात्र याच गावाला सद्या पाणीप्रश्नाने हैराण केले आहे. या वर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.
गावाच्या जवळच दोन धरणे आहेत त्यातील एक म्हणजे तांबवे धरण व दुसरे धरण म्हणजे लेंढीचे धरण मात्र ही दोन्हीही धरणे यावर्षी पाऊस अगदी कमी पडल्याने पूर्णतः पाण्याविणा कोरडी ठणठणीत पडली आहेत त्यामुळे दोन्ही धरणे गावच्या उशाला मात्र कोरड पडली लोकांच्या घशाला अशी वेळ आलेली आहे.
पाऊस नसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी राजा तर आ पासून पावसाची प्रतीक्षा करत आहे पाऊस नसल्याने शेतकरी राजाची अवस्था चिंतातुर जंतूसारखी झालेली आहे.
आरडगाव ,चव्हाणवाडी, कापडगाव या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा लेंडीच्या धरणातून खोदलेल्या विहिरीतूनच केला जातो मात्र यावर्षी वर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने या भागातील आरडगावचा पाणी प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. दरवर्षीच पाऊस न पडल्यानंतर आरडगावची अशीच पाण्याची बोंबाबोंब असते .आतातर पाऊस या भागात न पडल्याने या भागातील चव्हाणवाडीजवळ असणारे लेंढीचे धरण पाण्यावीणा विना कोरडे पडले आहे. आरडगांवला तर पाणी दहा दिवसातून एकदा येत असल्याने परस्थीती मोठी गंभीर झाली होती.
मात्र सद्या वरील विदारक परिस्थितीचे चित्र फलटण कोरेगाव तालुक्याचे जननायक आमदार दिपक चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे आमच्या प्रतिनिधीने सांगितल्यानंतर तत्पर फलटण प्रशासनामार्फत आरडगावला दर दिवशी दोन टँकरच्या( अंदाजे पाणी ४४ हजार लीटर ) पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सद्यस्थीतीला मिटलेला आहे.त्यामुळे वेळेत आमदार साहेबांनी पाण्याच्या टँकरची सोय केल्याने ग्रामस्थांमधून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. आरडगावला जल जीवन मिशन हर घर जल, नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता दि. २७ जुलै २०२२ला मिळालेली आहे.तांबवे धरणात विहीर खोदून ते पाणी पाईपलाईनव्दारे या गावी आनले जाणार आहे.त्याचा खर्च अंदाजे १ कोटी ८४लाख ९९ हजार ५७० एवढा आहे. त्याला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली असून ते काम पूर्णत्वास होण्यासाठी दि. २५ मे २०२४ चा कालावधी दिलेला आहे हे काम पूर्ण होणेसाठी नऊ महीन्याचाच कालावधी राहीला आहे.
गावच्या लगतच वनविभागाची हद्द लागते व याच वनविभागातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खोदून आनावयाची आहे यासाठी वनविभागाची परवानगी लागते. वन विभागाने अजुनही परवानगी न दिल्याने या जल जीवन मिशनच्या कामाला ब्रेक लागला आहे बाकी कामे सुरू आहेत मात्र हे काम जलद होणेसाठी रामराजे नाईक निंबाळकर माजी विधान परिषदेचे सभापती तसेच लोकप्रिय आमदार दिपक चव्हाण, माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर या सर्वांनी विशेष लक्ष घालुन ही वन विभागाची लागणारी परवानगी मिळवावी म्हणजे या कामास गती येईल व आरडगांवचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल.
(चौकट- सद्या धोम बलकवडी धरणातील पाणी कॅनालव्दारे सोडले गेले आहे तेच पाणी तांबवे धरणात सोडून तांबवे धरण भरून घ्यावे व तांबवे धरणातील पाणी पोटफाटयाने सोडून लेंढीचे धरण भरावे म्हणजे सद्यातरी असणारी पाणीटंचाई दूर होईल यासाठी पाणी सोडणेसाठी समंधीत अधिकाऱ्यांना लोकप्रतीनिधीनी तशा सुचना द्याव्यात अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेमधून होत आहे -सुभेदार भोईटे माजी सरपंच आरडगांव )

टिप्पण्या