विरांगणा करिअर अकॅडमीची गगन भरारी झेप.,पहिल्याच बॅचमध्ये 7 जणांची निवड : यशस्वी विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक , सत्कार


 कारदगा / प्रतिनिधी

कारदगा तालुका निपाणी येथील विरांगणा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच फेरीत गगनभरारी झेप घेतली आहे. या अकॅडमीचे हे पहिलेच वर्ष आहे. पहिल्याच बॅचमध्ये तब्बल 7 उमेदवारांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने विरांगणा अकॅडमी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत घेण्यात आलेल्या SSD - GD 2022 परीक्षेत विरांगणा करिअर अकॅडमीतर्फे यश संपादन करून भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कारदगा येथील 5 युवक - सुरज निकम ( BSF), रोहित कुंभार ( Assam Rifles), प्रमोद गावडे ( BSF), प्रदीप कुंभार (CRPF), शुभम निकम ( Assam Rifles) व प्रणाली वराळे ( SSB), या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. तसेच बेडकिहाळ येथील साक्षी गायकुडे ( Assam Rifles) या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेले ओंकार नरगट्टे(CA), मारुती गावडे (BSF ),

आशुतोष बुडके (CA), आदिती अ. मुराबट्टे व आदित्य आ. पुजारी यांची MBBS साठी निवड झाले बद्दल, श्रद्धा सा. केसरकर बेडकिहाळ हीची NIT मध्ये निवड झालेबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील मराठा भवन येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वक्ते अशोक दास सर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भागवत पंडित( निवृत्त सुभेदार) उपस्थित होते. प्रारंभी स्वागत दत्तात्रय धनगर यांनी केले. प्रास्ताविक अशोक थोरबोले सर यांनी केले. यावेळी अकॅडमीचे प्रमुख रणजीत थोरबोले, अशोक दास व माजी सैनिक भागवत पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विरांगणा करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक रणजीत थोरबोले, दत्तात्रय सावंत, कल्पना रायजाधव, नितीन कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले. वैष्णवी जाधव यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमा कांबळे,रामेश्वरी हिरिकुडे आणि दीपाली मगदूम यांनी केले. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघ - संस्थांचे पदाधिकारी, वीरांगणा मित्रपरिवार, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋषिकेश गायकवाडे यांनी आभार मानले.ङू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.