पाणीपट्टी व बेकायदेशीर गाळा भाडेवाढ रद्द करणे बाबत मनसे, शिवसेना (शिंदे गट),व स्वाभिमानी शेतकरी संघटना,यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील.दि.31, हुपरी नगरपरिषद यांनी पाणीपट्टीदरामध्ये 2300 व गाळा भाडेवाढमध्ये 2000 अशी दुपटीने वाढ केलेली आहे.
ती तात्काळ थांबवुन लोकांना वेठीस धरू नये.
अन्यथा या विरोधी उग्र आंदोलन करण्यात येईल व मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल.
असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील (अण्णा) यांनी दिला.
यावेळी मनसे,शेतकरी संघटना, शिवसेना (शिंदे गट) यांनी
मुख्याधिकारी अशोक कुंभार यांना निवेदन दिले.
यावेळी मुख्याधिकारी यांना ही वाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा गाव बंद व आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
पाणीपट्टी वाढ करून पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा सोडले जाते पाण्याची बोंबाबोंब ऐन पावसाळ्यात सुरुवात झाल्याने लोकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
त्यावेळी प्रशासकीय अधिकारी यांना काहीच उत्तर देता आले नाही.
पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी वाया जाते.टाक्याची गळती काढता येत नाही.लोकांचा विरोध डावलुन जनतेचा रोष अंगावर घेऊन नंतर मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण मोहीम राबवली ती पण अर्धवट सोडून दिली. तरी यामधे नुतन मुख्याधिकारी यांची कसोटी लागणार हे निश्चित
व पाणीपट्टी व गाळा वाढ केली आहे. तरी याला आमचा विरोध व निषेध आहे.
असा मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील शिवसेना तालुकाध्यक्ष अजिक सुतार,शेतकरी संघटना अध्यक्ष राजाराम देसाई, अनंत बल्लोळे,पद्माकर चौगुले, नितीन गायकवाड,सुनील धोंगडे, महादेव पाटील,उमाजी पाटील,अजित उगळे, किरण हुपरीकर, पुष्पराज शेटके,अनिल धोंगडे,दीपक परीट,नेमिनाथ वसवाडे, दादासो पाटील,आदिनाथ वसवाडे,शशिकांत वाघे,सागर खैरे प्रभाकर इंगळे,राजेंद्र पाटील,सुमित शेटके,बाळासो मोरबाळे, वसु बेंद्रे,महेश गिरी,आदीं निवेदनकर्ते व सर्व पक्षीय पदाधिकारी व गावभागातील व माळभागातील गाळाधारक व उपस्थित होते.

टिप्पण्या