प्राथमिक आरोग्य केंद्र प. कोडोलीच्या गुणवत्तेत वाढ, अल्पावधीतच कायापालट
कवि सरकार इंगळी.
प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टण कोडोली येथील उपकेंद्र
कोडोली रुई, चंदूर, इंगळी ., तळंदगे , या पाच गावातील रुग्णांना / लाभार्थ्यांना वरदान ठरलेल्या या आरोग्य केंद्राच्या लौकिकात भर पडत आहे. त्यामुळे रुग्न्याच्याकडून समाधानाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित आरोग्य सेवेच्या कामाचा आलेख वाढवतच आहेत. दैनंदिन - १५० ते २०० रुग्ण ओ. पी. डी . ला येऊन उपचार घेत आहेत.
येथील प्रत्येक रुग्णांची वैयक्तिक तपासणी रक्तदाब, शुगर, आवश्यकतेनुसार इतर सर्व २५ तपासण्या मोफत केल्या जात आहेत.
कुटुंब कल्याण अंतर्गत फक्त ४ महिन्याच्या कालावधीत १८० स्त्री शस्त्रक्रिया तसेच २ पुरुष शस्त्रक्रिया करून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकांवर आहे.
प्रसूतीच्या बाबतीत एका दिवसात ८ प्रसूती स्वतःच्या आरोग्य केंद्रात करून जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड केले आहे. बरेच वेळा अनेक गुंतागुंत असलेल्या प्रसूतीसह ४ महिन्यात ५३ प्रसूती केल्या आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थींचे या मध्ये लाभार्थ्यांचा आर्थिक फायदा झाला आहे.
या व्यतिरिक्त प्रत्येक सोमवारी डोळ्यांची तद्यांकडून तपासणी करून मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे.
दैनंदिन ऍक्टिव्ह सर्वे द्वारे घरभेटीतुन २ कुष्ठरुग्ण तसेच 24 क्षयरुग्ण शोधून त्यांना मोफत उपचाराखाली आणले जात आहे. या कार्यक्षेत्रातील रुई गाव क्षयरोग मुक्त गावासाठी निवड केली आहे. त्यानुसार प्रयन्त सुरु आहेत.
क्षयरोग कार्यक्रमात जिल्ह्यामध्ये पहिल्या पाच मध्ये क्रमांक लागतो. गेल्या पाच वर्षांमध्ये प. कोडोली कार्यक्षेत्रामध्ये जलजन्य व कीटकजन्य आजाराची कोणतीही साथ होऊ दिली नाही. त्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांची तात्काळ अंमलबजाणी केली जाते.
गरोदर माता व लहान बाळाचे लसीकरण योग्य वेळी करून एक हि बाळ वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन अर्भक मृत्यू व माता मृत्यू रोखण्यात यश मिळवले आहे.
या आरोग्य केंद्रातील प्रत्येक केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी यांचे कडून रक्तदाब, शुगर, कॅन्सर या सारख्या असंर्गीक आजारांची तपासणी करून त्यांना जागेवरच उपचार केले जात आहे. तसेच गंभीर रुग्णांना संदर्भ सेवा दिली जाते. याशिवाय प्रसूती मातांना जे.एस. वाय . मातृवंदना योजना, गरोदर माताकरीता एक वेळेची मोफत सोनोग्राफी, आभा कार्ड, गोल्डन कार्ड, इत्यादी लाभ दिले जातात.
या आरोग्य केंद्राने " स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना " , "कायाकल्प " या मध्ये भाग घेऊन तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक घेतलेला आहे. याचे सर्व श्रेय येथील एकजूटीने काम करणारे सुपरवायजर, सि एच .ओ , GNM , ANM , MPW , गट प्रवर्तक, आशाताई, परिचर, ड्रायव्हर व डाटा ऑपरेटर यांना जाते.
जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय . डॉ. रणवीर साहेब, तालुका आरोग्य अधिकारी, आदरणीय डॉ. दातार साहेब याच्या मार्गदर्शनाखाली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर औंधकर व डॉ. श्रेयश चौगुले व त्यांचा कर्मचारी स्टाफ कार्यरत आहे.

टिप्पण्या