मलिकवाड येथील बागेतली महालक्ष्मी मंदिर परिसरात ओम गणेश तरुण मंडळ व बालवीर मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण
मलिकवाड प्रतिनिधी - (अमर माने) दि.28, मलिकवाड येथील बागेतली महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदीर परिसरात ओम गणेश तरुण मंडळ व बाल वीर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले.मंदिर परिसर सुशोभित करण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे भाविकांना सावली उपलब्ध होणे व पर्यावरण विषयक जागृती करणे अशा उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून वृक्षारोपणाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे हा संदेश देण्यासाठी व पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.वृक्षारोपणामुळे या परिसराला अल्हाददायक वातावरण मिळणार असून भविष्यात हा परिसर उत्तमरीत्या सुशोभित होणार आहे यामुळे परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे व मंडळांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.
यावेळी सुभाष वडगावे, किसन खोत, धनंजय पाटील,संजय वडगावे, रंजीत देशपांडे, संजय कुन्नुरे, संदीप वडगावे, प्रशांत करजगे, अजित पाटील, आनंद पाटील, शरद पाटील, अभय खोत, किरण हिरेकुडे, प्रदीप हरोले,दादासो वडगावे, संजय करजगे, सुभाष पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या