बांधकाम कामगारांच्या विविध मागणीसाठी निपाणी लेबर ऑफिस वर मोर्चा
जनवाड प्रतिनिधी - (शितल कुडचे) बेळगाव जिल्हा लाल बावटा कामगार संघटनेच्या विविध प्रमुख मागण्यासाठी निपाणी लेबर ऑफिस वर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये निपाणी व चिकोडी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने हजर होते
निवेदनामध्ये कामगारांच्या प्रमुख मागण्या
1. कार्डाचे नुतनीकरण पगार आणि हजेरी यादी रद्द करा
2, बांधकाम कामगारांचे सर्व कुटुंबासाठी दवाखाना चालू करा 3, भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करा 4,घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे 5, पेन्शन अर्ज करण्याची कालमर्यादा रद्द करा 6, बांधकाम कामगार निधीचा गैरवापर थांबवा अशा विविध प्रमुख मागण्यासाठी लालबावटा बांधकाम कामगार ऑफिस पासून मुख्यमार्गावरून लेबर ऑफिसला कामगारांच्या घोषणा देत धडक मोर्चा निघाला यावेळी बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड धनाजी कांबळे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नेताजी कोळी यांनी मोर्चाचे नियोजन करून आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कॉम्रेड परवीन नाईकवाडे कॉम्रेड शितल कुडचे बाबुराव कदम संदीप कांबळे दस्तगीर सनदे शिवाजी कांबळे मानले व मोर्च्याची सांगता केले.

टिप्पण्या