साखरवाडी महावितरण शाखा अभियंता चांगण यांचे खुर्ची सोडून पलायन चांगण यांची बदली करण्याची सतीश माने यांची मागणी
साखरवाडी प्रतिनिधी -
गेले कित्येक दिवस साखरवाडी होळ खामगाव पिंपळवाडी व परिसरात शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठ्या मुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे अशातच शेतकऱ्यांची पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत गेले दोन-तीन महिने झाले पावसाअभावी पिके जळून चालली आहेत अशा परिस्थितीमध्ये विद्युत महामंडळाकडून येथील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी वीज मिळत नसल्याने शेतकरी हातघाईला आला आहे आठ तास टिकणारी वीज दोन तासावर आली असल्याने शेतातील वीज पंप बंद पडू लागले आहेत अशा परिस्थितीमध्ये अधिकारी मात्र बेसावधपणाची भूमिका घेत असल्याने होळ साखरवाडी पिंपळवाडी खामगाव येथील शेतकरी आपले निवेदन घेऊन साखरवाडी येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर एकजुटीने गेले असता शाखा अभियंता यांचा तपास नव्हता तरीही शेतकरी साहेबांना निवेदन देण्यासाठी वाट बघत कार्यालयाच्या बाहेर थांबले होते काही तासांनी शाखा अभियंता अमोल चांगण साहेब आपल्या कार्यालयाची दारे बंद करून आत बसल्याचे निदर्शनात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला अशा परिस्थितीमध्ये फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सतीश माने व त्यांचे सर्व सहकारी साहेबांच्या खोलीमध्ये गेले त्यानंतर शाखा अभियंता अमोल चांगण बाहेर आले त्यावेळी चांगण यांना निवेदनाला उत्तर देण्याची सर्वांनी मागणी केली परंतु या निवेदनाला मी काय उत्तर देऊ सध्या पाऊस पाणी नसल्याने हे असेच चालणार मिळेल तेवढीच वीज सगळ्यांनी वाटून घ्या नाहीतर ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितले आहे त्यांच्याकडे जावा असे शाखा अभियंता यांनी सांगितले त्यानंतर शेतकरी संतापून गेले सर्वांनी एकच गोंधळ केल्यानंतर चांगण साहेबांच्या राजीनामाची मागणी झाली शेतकऱ्यांची आक्रमकता वाढीस लागलेली पाहून विद्युत अभियंता चांगण यांनी तेथून पळ काढला त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावाने चांगण यांची ताबडतोब बदली करा अशी मागणी करून शाखा अभियंता चांगण यांना साखरवाडी कार्यालयात येऊ देणार नाही असा इशारा दिला
यावेळी राहुल भोसले नितीन भोसले बाळासाहेब भोसले माऊली भोसले दिलीप भोसले संतोष भोसले अशोक सिताराम भोसले निलेश भोसले प्रशांत भोसले तानाजी भोसले गणेश भोसले रणजीत भोसले राजेंद्र भोसले इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या