मालवण तालुक्यातील आचरा पिरवाडी येथील ग्रामोन्नती मंडळा मार्फत ज्येष्ठ नागरिक वारकरी दिंडीचे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरास भेट व श्रावण मास दर्शन सोहळा संपन्न.


सदलगा प्रतिनिधी  - (आण्णासाहेब कदम) दि. 27 मालवण तालुक्यातील  पिरावाडी या गावातील  ग्रामोन्नती मंडळाने यावर्षी श्रावण मासातील एकादशीनिमित्त पंढरपूर वारीला ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे नियोजन केले आहे. या वारीतून धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा व पर्यावरण संरक्षण या विषयाचे प्रबोधन करीत ही वारकरी दिंडी पंढरपूर येथे जाणार आहे. वाटेत या दिंडीने ऐतिहासिक वास्तू असलेल्या कोपेश्वर मंदिराला भेट दिली. व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. त्याप्रसंगी सदलगा शहरातील आर के फाउंडेशन यांच्यावतीने त्या सर्व वारकरी दिंडीचे स्वागत  आर के फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सीमा कदम, श्री अण्णासाहेब कदम, श्री रमेश कुमार मिठारे (ज्येष्ठ पत्रकार) सामाजिक कार्यकर्ते सुनील धनवडे , (नरसोबावाडी) वडगोले परिवार ,सदानंद मुतनाळे, श्री शितल कुडचे, यांच्या हस्ते सर्वांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी ओळखून आर के फाउंडेशन यांनी उपवासानिमित्त फळे, त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य याचेही वितरण यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार श्री मिठारे सर यांनी या खास वारकरी दिंडीचे स्वागत करताना ही दिंडी अनेक पैलूंचे प्रबोधन करीत पंढरपूर येथे जात आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगितले. आज धर्म ,अध्यात्म ,सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण रक्षण याचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने हे कार्य ही मंडळी करत आहे. खरोखरच हे कार्य कौतुकास्पद व उल्लेखनीय असे त्यांनी सांगितले.व वारकरी दिंडीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकरी संप्रदायाकडून नारळाची रोपं प्रत्येकानां भेट म्हणून देण्यात आली आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला .या दिंडीमध्ये 40 ज्येष्ठ नागरिकासह ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण कुबल , श्री मंदार खोबरेकर, श्री सतीश तळवडकर, श्री दादा धुरी, श्री जयदीप कुबल, श्री परेश तारी सोबत दादा गावकर , सूर्यकांत धुरी, सौ गावकर सौ.धुरी, सुमन कुबल इत्यादी मंडळी उपस्थित होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.