"महामानवाच्या बदनामी कारक पोस्ट वक्तव्ये या पासून तसेच महीला अत्याचार व मागासवर्गीय युवक हत्याकांड अशा वाढत्या घटनानमूळे बिघडत असणारा कायदा आणी सुव्यवस्था राखण्यामध्ये सरकारला येत असणारे अपयश याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन "

 


लोणंद प्रतिनिधी  - सातारा जिल्ह्याला पुरोगामीत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असताना आज अखेर महामानवांच्या बाबतीत बदनामीकारक प्रकार कधीच झाला नाही याचा विचार कर्ता छ.शिवाजी महाराज यांच्या बदनामीकारक पोस्ट करण्यात आली ज्यांनी कोणी हे दुष्टक्रूत्य केले त्याच्यावर कठोरात कठोर शासन व्हावे व त्याचा मास्टर माईंड जो कोन असेल त्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात यावी की पुन्हा असे धाडस कोणीही करणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागनी करणेत येते. 

        तसेच ही घटना घडल्यानंतर संविधानिक मार्गाने निषेध आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे.आम्ही सुद्धा या घटनेचा तीवृ शब्दात निषेध करतो परंतू कायद्याला न जूमानता ज्या पद्धतीने कायदा पायदळी तूडवत झुंडशाही करत जिल्हाधीकारी कार्यालयाच्या आवारात घूसून घोषणाबाजी करून जो काय प्रकार झाला याची ही सखोल चौकशी करून त्यांच्यावर ही कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने केली पाहीजे.कारण संविधानीक पद्धीतीने मोर्चे आंदोलने करणाऱ्यांना सुद्धा चार ते पाच जणानंचेच शिष्टमंडळ करूनच जिल्हाधीकारी कार्यालयात पाठविले जाते तसे न केल्यास कार्यकर्त्यानवर नोटीसा देऊन कारवाई केली जाते. ही बाब लक्षात घेता आशा झुंडशाही करणारांच्यावर ही कठोर कारवाई करणेत यावी अशी ही मागणी करणेत येते. 

       तसेच या राज्याचे माजी राज्यपाल यांनी सुद्धा छ.शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्ये केले होते त्यावेळी राज्यात निषेध आंदोलने झाली परंतू साताऱ्यात मात्र कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले नाही किंवा रोष व्येक्त केला नाही परंतू यावेळी मात्र अचानक लगेच ईतक्या मोठ्या प्रमाणावर युवक एकत्र येऊन बेकायदेशीर पणे आंदोलन करतात याचा गांभीर्याने विचार करून सातारची शांतता भंग करणाऱ्याचा नेमका हेतू काय आहे का?याचा ही शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा आणी दोषीनवर कठोर करवाई करणेत यावी अशी मागणी करणेत येते. 

      तसेच राज्यात अनेक ठिकाणी महीलांच्यावर मानवतेला लाजवणाऱ्या पद्धतीने अमानूष पणे अन्याय अत्याच्यार दिवसेंदिवस  कायदे कठोर करूनही वाढतानाच दिसत आहे त्या मुळे अन्याय करणारांच्यावर वचक बसेल आशा पद्धतीने कठोर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मागासवर्गीय युवकांच्यावर सामूहिक हल्ले हत्या कांड चे ही प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे तसेच फिर्यादीवर सुद्धा हल्ले करण्याची मानसीकता गुन्हेगारा मध्ये वाढत आहे याचाच अर्थ गुन्हेगारावर कायद्याचा वचक राहीलेला दिसत नाही त्या मुळे कायदा आणी सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडत चालली असल्याचे दिसत आहे. 

       तसेच महामानवांच्यावर बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या वाचाळ विरांच्यावर तसेच देशाच्या स्वातंत्र्यावर व देशाच्या राष्ट्रध्वजावर बेताल वक्तव्य करूनसूद्धा मनोहर भिडे यांच्या सारख्या वर कठोर कारवाई होत नाही हि सुध्दा निषेधार्ह बाब असून त्यांना ही तातडीने अटक करण्यात यावी. या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होऊन सुद्धा त्याच्या वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्या मुळे वाचाळ विरांचे बळ वाढत असल्याचे दिसत आहे त्या मुळे त्यांच्या वर ही कठोर कारवायी करून तातडीने अटक करणेत यावी आशी मागणी करणेत येते 

     सोशलमीडीयावर पोस्ट करणारांच्यावर जुजबी कारवायी करून तो विषय तेथेच सोडला जातो परंतू वाचाळ विरांच्यावर मात्र राजकीय दबावापोटी कोणतीच कारवायी होत नसल्याने सर्वसामान्या गुन्हेगारांच्यासाठी वेगळा कायदा आणी वाचाळ विरांच्यासाठी वेगळा कायदा आहे की काय आशी भावना निर्माण झाल्यानेच आशा दुष्टप्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढत आसुन ते सतत राज्यात कायदा आणी सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण करून सर्वसामान्य जनतेची शांतता भंग करण्याचे प्रकार वाढताना दिसत असल्याने आणी त्यावर राज्याचे गृहमंत्री गंभीर नसल्याने राज्यात कायदा आणी सुव्यवस्था सतत बिघडत चालली असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेऊन एक गंभीर अशा कायद्याचे राज्य निर्माण करण्याची मानसिकता असणारा गृहमंत्री राज्याला देण्यात यावा अशी मागणी करणेत येते. 

       वरील मागण्यांनचा गांभीर्याने विचार करून गुन्हेगारानवर कडक कारवाई करून कायद्याचे राज्य आणी सर्वांसाठी एकच कायदा आसल्याचा व सुरक्षेचा व शांततेचा  विश्वास जनतेला द्यावा अन्यथा या प्रश्नी जनतेत जाऊन जनजागरण करून तीवृ स्वरूपाचे जण आंदोलन करावे लागेल याची सर्व जबाबदारी शासनावर राहील याची कृपया नोंद घ्यावी आसा ईशारा ही रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी निवेदना द्वारे दीला 

       यावेळी आंदोलनास रिपब्लीकन सेनेचे संघटक गणेश कारंडे पुरोगामी संघटणेचे मिनाज सय्यद ओबीसी संघटणेचे भरत लोकरे मुस्लीम ओबीसी संघटनेचे रशीद बागवान लेकलाडकी आभीयानाच्या नेत्या अँड शैलाताई जाधव सम्याक नागरीक संघाचे बि.एल.माने भारतीय बौद्ध महासभेचे अँड.विजयानंद कांबळे धम्मबांधव गृपचे अनील विर सतीष माने विजय मोरे सुनील बडेकर सुनील निकाळजे वसंत खरात राजेंद्र सक्टे वसंत गंगावने निसार खान अँड वाघावकर मारूती भोसले दिलीप सावंत दिलीप फनसे प्रशात कांबळे दादासाहेब कांबळे मिलींद सावंत ईत्यादी पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्तीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.