शिवचरण उज्जेनकर फौंडेशनचे खामगांव येथे साहित्य संमेलन संपन्न.
कवि सरकार इंगळी.
शिवचरण उज्जेनकर फौउंडेशन मुक्ताईनगर जळगांव या संस्थेच्या माध्यमातून दुसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा साहित्य संमेलन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भवनजी अर्जनजी खिमजी व्यासपीठ ,ए.के.नॅशनल हायस्कूल व ज्यु.काॅलेज मुक्तेश्वर आश्रमासमोर खामगाव जि.बुलढाणा येथे संपन्न झाले.
सकाळी ८वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरवात झाली. सकाळी ९वाजता श्री अशोक अग्रवाल,महाराजा अग्रेसन रिसोर्ट चिखली मेहकर यांचे हस्ते करण्यात आले. संमेलन अध्यक्षा लता गुठे,भरारी प्रकाशन मुंबई। यांनी भुषविले. तर स्वागताध्य किशोर गरड,लायन्स कल्ब डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन हे होते.आणि प्रमुख उपस्थीती म्हणून प्रसिद्द कांदबरीकार लेखक ,श्रीकांत पाटील कोल्हापूर,श्री.सतीश तराळ,राज्यस्तरीय अध्यक्ष,डाॅ. प्रतिभा इंगोले, डाॅ. सुभाष बागल हे होते.प्रास्ताविक शिवचरण उज्जेनकर यांनी केले.व विविध मान्यवर यांचा सन्मानचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करणेत आले.यावेळी कवि सरकार इंगळी, कोल्हापूर यांचा ही विषेश सत्कार करणेत आले.
संमेलन निमंत्रक प्रा.प्रविणा शहा,संयोजक प्रविण क्षिरसागर,ए.के.हायस्कूल खामगाव, विनोद डिडवानीया,डाॅ. दिपक पाचपोर,प्रा.डाॅ. किशोर वानखेड़े, डाॅ. निवृती जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डाॅ. श्रीकांत पाटील कोल्हापूर, संमेलन उद्घाटक अशोक अग्रवाल यांनी साहित्य विषय मौलिक विचार मांडले.तर संमेलन अध्यक्षा लता गुठे यांनी अध्यक्षीय भाषणात राज्यस्तरीय संमेलन भरवून साहित्य विचारातून समाज परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. असे सांगितले.
संमेलनात बाल,किशोर,व युवा साहित्य वास्तव व अपेक्षा या विषयावर परिसंवाद घेणेत आला.यात अध्यक्ष राजेश राजोरे,संपादक,दैशोउन्नती बुलढाणा आवृती,सहभाग वक्ते ज्योतीताई ठाकरे मुंबई।, डाॅ. राम देशमुख जळगांव, सुरेश साबळे, बुलढाणा,शैलजा पाटील जळगांव, डाॅ. मनिषा रिठे हिंगणघाट, अशोक शिरसाठ अकोला,डाॅ. अजय पाटील, प्रा.डाॅ. ज्ञानेश्वर गाडे आवरा आश्रम.यांनी आपले विचार मांडले. दुपारच्या सत्रात कथाकथन लेखक रामदादा मोहीते कथाकार खामगाव, लेखक परशराम आंबी कोल्हापूर , प्रमोद पिवटे,जयंत बोदडे मुक्ताईनगर आदिनी आपले कथाकथन करून रसिकांचे मनोरंजन केले. व विविध मनोरंजन कलात्मक कलाकारांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात शाहिर मनोहर पवार,शाहिर ईश्वर मगर,आरोही देवगिरीकर,गीतकार.व गायक जगदीश वेदपाठक,पुजा प्रसाद गायकी,सर्जेराव साळवी आदीनी आपल्या कला सादर केले. समारोप डाॅ. सतीश तराळ यांनी केले.संमेलनात डाॅ. मधूकर हुजरे धाराशीव,लेखक अशोक कोकाटे,कोल्हापूर ,कवि सरकार इंगळी, राजेश उज्जेनकर, डाॅ ज्योती खेडेकर,किरण झरकर,सुरेश पाचकवडे,अनिल अमरकर आदि उपस्थीत होते.


टिप्पण्या