हुपरी येथे सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणीतील आरोपी ना अटक

 हुपरी प्रतिनिधी - (सागर पाटील)   हुपरी येथे चोरीचे दागिने विकणे करता येणार असले बाबत खबरी कडून मिळालेल्या माहितीवरून मा. पीआय किशोर शिंदेसाहेब यांना माहिती मिळताच सापळा रचून  1)प्रवीण बाबुराव जाधव राहणार अंबाई नगर व  2)संदीप रामचंद्र ढेरे वय वर्षे 25, 3)संगीता रामचंद्र ढेरे वय वर्ष 23 यांना तपासांअंती ताब्यात घेतले असता संशयती थोडा घाबरल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 





सदर आरोपी संदीप व संगीता ही नवरा बायको असून ते यामाहा मोटरसायकल वरून अपेक्षा कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.सदर आरोपी नंबर तीन संगीता ही आर के नगर येथे राहत असलेल्या अमर वायचळ प्लॉट नंबर 40 सोसायटी नंबर 2 यांच्या घरातून सोने चोरून ती आरोपी नंबर 2) संदीप याला राहणार आर के नगर (मुळगाव) इस्फुर्ली तालुका करवीर यास देऊन आरोपी दोन व तीन यांनी सदर सोने संगणमताने चोरीचे असताना त्यातील थोडे सोने हुपरी येथे दोन ज्वेलर्स मध्ये विकून त्यातून आलेल्या पैशातून नवीन मोटरसायकल घेऊन बाकीचे पैसे व सोने आरोपी यांच्या घरी असून उर्वरित आठ तोळे सोन्याचे दागिने (40000) किमतीचे हे फेडरल बँक हुपरी येथे तारण ठेवले आहे. वरील दागिने हुपरी येथे ज्या ज्वेलर्समध्ये विकले त्यांना तपासांती बोलावून सोडून देण्यात आले. 


त्याबद्दल अधिक माहिती समजली नाही.  हुपरी पोलीस यांनी सोने व रोख रक्कम व मोटरसायकल असा 1086000 इतका मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हा करवीर पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने सदर गुन्हा करवीर पोलीस स्टेशन येथे दाखल करून आरोपी व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.