क्षेत्र वीर येथे शरद पवारांच्या हस्ते सवाई मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.
लोणंद प्रतिनिधी - दि.25 श्रीक्षेत्र वीर ( ता, पुरंदर ) येथील देवस्थान ट्रस्ट संचलित सवाई मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा अत्यंत नियोजनबद्ध आणि थाटात संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सवाई मंगल कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गेले अनेक महिन्यापासून या सवाई मंगल कार्यालयाचे काम चालू होते. अनेकांनी या कार्यालय उभं करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. अनेक दानशूर भाविक भक्तांनी यासाठी आर्थिक हातभारही लावला तसेच पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही वेळोवेळी योग्य ती मदत केलेली आहे त्यामुळे श्रीक्षेत्र वीर या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असे सर्व सोयी नियुक्त असे हे सवाई मंगल कार्यालय सर्वांसाठी आजपासून अत्यंत माफक दरात उपलब्ध झाले आहे. राष्ट्रवादीतील फुटी नंतर खासदार शरद पवारांचा पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथे पहिलाच दौरा असल्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते परंतु पवारांनी कुठलेही राजकीय भाषण न करता धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर चर्चा नको असाच त्यांच्या बोलण्यातून सूर दिसत होता. श्रीक्षेत्र वीर येथील देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून उभं करण्यात आलेल्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नियोजित विकास आराखड्याचे भूमिपूजन त्यांनी केले. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचे पवारांनी कौतुक केले.
यावेळी सांगितले. त्या कार्यक्रमाचे प्रस्तावना विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ यांनी केले व देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ यांनी यावेळी सांगितले.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मा,मंत्री शशिकांत शिंदे, खासदार सुप्रियाताई सुळे आमदार संजय जगताप आमदार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमण, नंदूकाका जगताप, माणिकराव झेंडे पाटील, अभिजीत जगताप देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव खजिनदार सर्व विश्वस्त सर्व सल्लागार देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी अनेक देवाचे मानकरी सालकरी घडशी गोसावी तसेच श्रीनाथांचे भाविक भक्त यावेळी आवर्जून उपस्थित होते.

टिप्पण्या