चंद्रयान-3 यशस्वी लँडिंग झाल्याने हुपरीत आनंद उत्सव साजरा


 हुपरी प्रतिनिधी - ( सागर पाटील ) जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चंद्रयान-3 चे लँडिंग अखेर यशस्वीरित्या पार पडले भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. आणि सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश इस्त्रोचे संपूर्ण जगाने आज कौतुक केले आहे.         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग येथून लाईव्ह लँडिंग पाहत संपुर्ण शास्त्रज्ञ यांचे मनापासून अभिनंदन करत भारताने इतिहास रचला आहे. त्याची नोंद जगभरात झाली  चंद्रावर तिरंगा मोठ्या डौलाने फडकत राहील असा विश्वास व्यक्त केला. आज त्याचा जल्लोष संपूर्ण देशात साजरा झाला. 

        यावेळी हुपरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्र येत जुने बस स्थानक येथे रांगोळी काढून फटाक्यांची आतिशबाजी करत पेढे व साखर वाटप केले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक राजाराम देसाई,विद्याधर कांबळे,नानासो भोसले,सुदर्शन खाडे,अजित सुतार,नितीन गायकवाड,किरण हुपरीकर,धनंजय खाडे, सातारा गायकवाड,बाळासाहेब कंगने,पत्रकार बाळासाहेब कांबळे,सागर पाटील,महादेव पाटील, गुरुप्रसाद पाटील,वसवाडेमामा व शेतकरी संघटनेचे पाटीलसाहेब आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.