बचत करुन संस्था चालविण्यास महिला सक्षम पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींचे प्रतिपादन

 एकसंबा - प्रतिनिधी (अमर माने)


बचतीचे बाळकडु महिलांना जन्मताच असते त्यामुळे त्यांना बचतीच्या उपदेशाची गरज नसते. हेड, हार्ट आणि हँड हे तिन्ही घटक चांगले असल्यास व्यवहार चांगले होतात. विश्वासावर चालणाऱ्या संस्था चालविण्यास महिला सक्षम असतात. पैशाचा सदुपयोग करुन जीवनात आर्थीकमान उंचावता येणे शक्य असते. त्यासाठी पैसा खेळता रहावा असे प्रतिपादन निडसोशी येथील सिध्द संस्थान मठाच्या श्री. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींनी केले.

एकसंबा येथे धनश्री महिला सहकारी संघाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. प्रारंभी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. महास्वामींची पादपूजा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. छाया इंगळे व अजित इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर मराठा भवनात कार्यक्रम झाला. महास्वामी व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना नणदी येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत समयीताराजे निंबाळकर यांनी महिला आता चुल आणि मुलापुरत्या मर्यादित नसून ज्ञानार्जनाने सक्षम बनल्या आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि दुर्गा स्वरुपी महिला आता सर्वच क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवुन देत आहेत. महिला शिक्षण व ज्ञानामुळे आता पुरुषांच्या बरोबरीने गतीसोबत प्रगतीची जबाबदारी पार पाडत आहेत. महिलांनी बचतीसोबत आपल्याकडे असलेल्या कला, कौशल्याचा वापर करुन छोट्या मोठ्या व्यवसायांना सुरुवात करावी. तसेच समाज माध्यमातून जागृती करावी असे आवाहन केले.

टाकळीवाडीच्या गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबन चौगुले यांनी सहकाराच्या माध्यमातून समाजाचा विकास शक्य आहे. महिलांना सहकारी क्षेत्रात काम करण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दुधगंगा नदीचे पाणी इतरत्र वळविण्यात येत असल्याने आपल्या भागातील शेतीला पाणी अपुरे पडणार असल्याने याचा विरोध करण्यासाठी सोमवारी सर्वानी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

डॉ. प्रगती पाटील यांनी बोलताना महिलांच्या बचतीचा कोरोना संकटकाळात सर्वच कुटुंबाना लाभ झाला. इतर देशात तसे झाले नाही. महिला सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने आघाडीवर आहेत. अधिक व्याजाच्या मागे न लागता विश्वासावर आपल्या ठेवी ठेवाव्यात असे आवाहन केले.  

यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बाळासाहेब पाटील, चिदानंद कोरे साखर कारखान्याचे संचालक ए. ए. इंगळे, संस्थेच्या उपाध्यक्षा संगीता हिरेकुडे, संचालिका मनिषा बाकळे, सुजाता हिरेमठ, कावेरी नाईक, दिपाली मुतालिक, सुनिता माळगे, सौम्या सातवर, नीता खोत, दिपाली खोत, रुक्मीनी चक्रे, दिपाली दामडे, अनिता कोळी, गीता बाकळे, दिपाली धनगर, अजित इंगळे, महेश बाकळे यांच्यासह एकसंबा नगर पंचायतीचे सदस्य, नागरीक, एकसंबा, मलिकवाड, नणदी, यादनवाडी, उळागड्डीवाडी येथील नागरीक, विविध संघसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक श्री. कॅरगुत्ते यांनी सुत्रसंचालन तर दिपाली खोत यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.