शिरोळात यादव प्रेमी ग्रुपच्या वतीने गुणीजनांचा सत्कार
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ येथे यादव प्रेमी ग्रुपतर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुनिजनांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिरोळ व हातकणंगले तालुका सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरोळचे नगरसेवक पंडित काळे यांचा तर युरोपमध्ये शिष्यवृत्ती मिळवत पीएचडीसाठी निवड झाल्याबद्दल प्रियंका विजय पवार यांचा आणि सलग एक तास स्केटिंग करून विश्वविक्रम केल्याबद्दल
विवांश किरण पाटील सार्थक संतोष कोळी हर्षवर्धन काकासो कोळी यांचा व केंद्रीय राखीव पोलीस दलात कु.गायत्री अरुण माने निवड झाल्याबद्दल शिरोळ तालुका भाजप नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने युवा नेते विराजसिंह सामाजिक कार्यकर्ते अमर उर्फ नाना कदम बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर दरगु पाटील विजय पवार सतीश जाधव,अमर संकपाळ, किरण पाटील, रवी जाधव, काकासो कोळी, संतोष कोळी अरुण माने सचिन उर्फ बंटी कोळी रावसाहेब समडोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या