ताराबाई आण्णासाहेब नरदे हायस्कूलची कु.समीक्षा चौगुले प्रथम

 


नांदणी वार्ताहर (अजितबुबणे > नांदणी- नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात 2023 -24 अंतर्गत "भरड धान्य -एक उत्कृष्ट पौष्टिक आहार की भ्रम "या विषयावर महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेमध्ये ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणीची विद्यार्थिनी कु.समीक्षा संजय चौगुले हिने प्रथम क्रमांक मिळवून तिची विभागीय वक्तृत्व स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली. या स्पर्धेचे स्वरूप लेखी चाचणी,वक्तृत्व स्पर्धा आणि नंतर तोंडी प्रश्न असे होते.या स्पर्धेसाठी तिला विज्ञान विभागाच्या सौ.एस.एस पाटील,श्री.ए.ए.शिरगावे,सौ.पी.आर.पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच मुख्याध्यापिका सौ.पी.पी.देसाई यांचे प्रोत्साहन  व संस्थेचे अध्यक्ष श्री.आदिनाथ  नरदे,उपाध्यक्ष श्री.अजित कुरडे,श्री.कुमार हातगिणे व श्री.सागर संभूशेटे यांच्यासह सर्व संचालक व सदस्य  यांची प्रेरणा मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.