लोणंद- नीरा रोडवरील अपघातातील फरार ट्रकचालक ट्रकसह पोलीसांच्या ताब्यात; परजिल्ह्यातून घेतले ताब्यात.
लोणंद, प्रतिनिधी
. दि.२६लोणंद ते नीरा रोडवर पालखी मार्गावरील बाळुपाटलाची वाडी हद्दीत दि.१६ ऑगस्ट रोजी भवानीमाता मंदिराजवळील उतारावर कोरेगाव येथील युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला अनोळखी ट्रक कसून शोध घेत लोणंद पोलीसांनी परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले.
लोणंद नीरा या पालखीमार्गावर दि.१६ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कोरेगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. सदर अपघातातील अज्ञात वाहन अपघात करून निघून गेले होते. सदर अपघात रात्रीच्या वेळेस झाल्याने सीसीटिव्ही फुटेजमधे वाहनांचा नंबर येत नसल्याने या अपघातातील फरार वाहन व ट्रकचालक निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान लोणंद पोलिसांसमोर होते.
सदर अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्याकडून तपासासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानूसार लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी दोन तपास पथके तयार करुन मोरगाव ते लोणंद व जेजुरी ते निरा या मार्गावरील जवळपास ४० सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करून अपघातातील अज्ञात वाहन हे ट्रक असल्याचे निष्पन्न केले होते. मात्र रात्रीच्या अंधारात ट्रकचा नंबर दिसत नसल्याने सदर वाहन शोधने अवघड झाले होते. मात्र तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी चिकाटी न सोडता लोणंद ते सातारा तसेच लोणंद ते तासवडे टोलनाक या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज तपासून तसेच टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सदर वाहन हे हंगेश्वर प्रसन्न या ट्रान्स्पोर्टचे असून ते मौजे हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील असल्याचे शोधून काढत सदर अपघातातील ट्रक MH-16 T6655 आणि फरार ट्रकचालक संजय गोविंद रायकर, ( वय ३५ ) रा. हंगेवाडी ता श्रीगोंदा, जि अहमदनगर यांस हंगेवाडी येथून ताब्यात घेवून वाहनासह लोणंद येथे आणले.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशिल भोसले , तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, तसेच पोना. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, केतन लाळगे, अभिजीत घनवट, प्रमोद क्षीरसागर, अवधुत धुमाळ , महेश सपकाळ, अतुल कुंभार, गोविंद आंधळे, नितीन भोसले यांनी यशस्वी केला.

टिप्पण्या