औद्योगिक वसाहतीचे तोटे पहाता अकिवाट येथील गावकऱ्यांनी केला कडाडुन विरोध व ग्रामसभेत केला ठराव नामंजूर

 अकिवाट /रमेशकुमार मिठारे




शिरोळ तालुक्यातील अकिवाट   गावांमध्ये एमआयडीसी आणण्यासाठी राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे 74.94 हेक्टर आर जमिन अधिग्रहित करण्यासाठी ग्रामपंचायतीला नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, या एमआयडीसीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवण्यासाठी न भूतो न भविष्यते अशी गर्दी या गाव सभेला केली.  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. अकिवाट येथील एम.आय.डी.सी हद्दपार करण्यासाठी  ग्रामस्थानी एकीची वज्रमूठ दाखवून दिली.एम.आय.डी.सी आम्हाला नकोच अशी हाक सर्वांनी दिली.केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी एम.आय.डी.सी साठी समर्थन दर्शवले. गावांमधील ग्रामस्थांनी भक्कमपणे एकजुट करत एकीचे दर्शन घडवले.  एम.आय.डी.सी साठी सहमत असणाऱ्या समर्थकांनी एमआयडीसी परिसरातील नागरिकांच्या साठी पोषक कशी ठरते हे समजावण्याचा प्रयत्न केला तर एम.आय.डी.सी.साठी विरोध असणाऱ्या नागरिकांनी त्याचे तोटे सुद्धा सांगितले त्यामुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त असल्यामुळे आमच्या गावात एम.आय.डी.सी .नकोच असा एकच सुर उमटला. त्याचबरोबर गायरान जमिनीवर असणारे शेतीसाठीचे अतिक्रमण काढून  त्या जमिनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना फाळापट्टीने कसन्यास देण्याचा ठरावही यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला. अतिक्रमण धारकांच्या घराला धक्का न लावता औद्योगिक वसाहतीसाठी परवानगी द्यावी.असा प्रस्ताव एम.आय.डी.सी. समर्थकांनी ग्रामस्थांसमोर मांडला. पण एम.आय.डी.सी मध्ये घर ठेवून एमआयडीसी होईलच कशी या प्रश्नांनी अनेकजण अनुत्तरीत झाले. त्यामुळे जमलेल्या नागरिकांपैकी 90 टक्के लोकांनी एमआयडीसीला कडाडून विरोधच केला.

       सुरवातीला स्वर्गाय गुरुदत्त शुगर्स चे संचालक-  संजयकुमार गायकवाड व मयत झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर नुतन उपसरपंच प्रकाश रायनाडे यांचा अकिवाट गायरान बचाव कृती समिती कडून सत्कार करण्यात आला.या गावसभेस गावातील अबाल वृद्धापासून जेष्ठ मंडळी, नेते मंडळी उपस्थित होते.शेवटी ग्रामसभेचे अध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना सुहास पाटील यांनी ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहतीस बहुसंख्येने विरोध केल्याने ठराव नामंजूर झालेचे स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.