पतसंस्था सचिवावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरूंदवाड पोलीस स्टेशनला दिले मिवेदन.
कुरुंदवाड प्रतिनिधी - रमेशकुमार मिठारे.ता.23 कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील आदर्श पतसंस्था बुबनाळ या संस्थेचे सचिव- शेखर चंदूरे यांच्यावर १० ऑगस्ट २०२३ रोजी कर्जदाराच्या मुलाने अचानकपणे रात्री घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.हल्ला करणारी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असून चंदूरे कुटुंबीयांना दमदाटी व विळा कोयता घेऊन जीवंत सोडणार नाही असा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.असा घृणास्पद प्रकारचा पुन्हा उद्रेक होऊ नये याकरिता हल्ला करणार्या व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पतसंस्था सचिवास कायदेशीर संरक्षण मिळावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुंबई, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटना, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन व शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे वतीने कुरूंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणिस यांच्याकडे देण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक- फडणिस यांनी संबंधित हल्ला करणार्या व्यक्तीची चौकशी करून कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करण्याचे ग्वाही दिले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणिस यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेकडून शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार ही करण्यात आला.
निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष -रमेशकुमार मिठारे,शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष-संजय कुंभोजे,जनरल सेक्रेटरी -बाबासाहेब पाटील, खजिनदार -संजय पाटील, संचालक- राजेंद्र खोकाटे, शशिकांत कोडणीकर, आण्णासाहेब मगदुम, आदर्श पतसंस्था सचिव-शेखर चंदूरे, महादेव राजमाने, जयप्रकाश पतसंस्थेचे जनरल मॅनेजर-भुपाल बुबनाळे,शाहू पतसंस्थेचे -संजय गज्जन्नावर व परीसरातील पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या