लहानग्या कु. अक्षरा गुरवचे आगळे वेगळे रक्षाबंधन

म्









 सिंधुदुर्ग वृत्तसेवा - कु.अक्षरा गुरव रा. साळस्ते ता. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग, येथील गेल्या दोन-तीन वर्षापासून अक्षरा गुरव नावाची मुलगी आपल्या कल्पकतेच्या बळावर असाच एक वेगळा उपक्रम राबवत आहे .कोरोना काळापासून ती दरवर्षी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवत आहे .अक्षरा ही सध्या नववी मध्ये शिकत आहे .कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये ती कणकवली तालुक्यातील साळस्ते या गावी आपल्या आजी-आजोबाकडे राहायला गेली. यावेळी लॉकडाऊनच्या काळात काहीतरी करावे अशी तिला वाटले त्यातूनच राख्या तयार करून त्या भारतीय सैनिकांना पाठविण्याचे तिच्या आजोबांनी तिला सुचविले आणि तिचा हा उपक्रम तेव्हापासून चालू झाला.


ती दरवर्षी सैनिकांना शंभर ते दोनशे राख्या पाठवत असून यावर्षी तिने दोनशे राख्या तयार केल्या आहेत .या राख्या सोबत ती एक सुंदर चित्र काढून त्यामागे सैनिकांना एक पत्र देखील लिहिते. या उपक्रमामुळे अनेक सैनिक तिच्या संपर्कात आहेत .त्यांच्याकडून तिला अनेक प्रतिक्रिया देखील येत असतात. या सगळ्याबरोबरच शालेय शिक्षण, चित्रकला, मेहंदी, डान्स याची सुद्धा अक्षराला आवड आहे. आपली बुद्धिमत्ता व शारीरिक क्षमता यांच्या जोरावर तिने विविध स्तरावरती मेडल प्राप्त केले आहेत. एवढ्या लहान वयात असलेली तिची सामाजिक सजगता नक्कीच सर्वाना प्रेरणादायी ठरते.

असेच एक दिवशी अक्षरा गुरव हिचे राखीचे पत्र सैनिक परंपरा असलेल्या सैनिक टाकळीचे जवान हवलदार संजय निकम हे सेनाभवन, दिल्ली येथे ते कार्यरत असताना त्यांच्या हाती पडले आणि तेथूनच अक्षरा गुरव आणि सैनिक टाकळीच्या जवानांचे ऋणानुबंध वाढण्यास सुरुवात झाली. सैनिक टाकळी येथील बन्याच जवानांच्या बरोबर अक्षराचे नेहमी संभाषण होत असते. या गावातील जवान आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस दल (CRPF, BSF, RPF, CISF, SRPF and Maharashtra Police ) देश सेवा करतात. आज पूर्ण भारतात असे एकही असे सैनिक स्थळ नाही कि जिथे या गावातील जवानाने सेवा बजावलेली नाही. अगदी ब्रिटीश काळापासून येथील तरुणांनी लष्कराची वाट धरली आहे. या गावची लोकसंख्या पाच ते सहा हजार त्यापैकी जवळ जवळ १००० ते १२०० माजी सैनिक व ३०० ते ४०० सैनिक आता सध्या शिपाई पदापासून ऑफिसर्स पदापर्यंत सेवा बजावत आहेत. सण १९११ पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारी नुसार आज पर्यंत ह्या गावाने असंख्य धाडशी जवान सैनिक म्हणून देशाला पुरविले आहेत. सैनिक टाकळीच्या शेकडो सुपुत्रांनी रणभूमीवर आपल्या पराक्रमाने गावाचे नाव अजरामर करून ठेवले आहे. आज पर्यंत ह्या गावचे १८ जवान शहीद झाले आहेत. यावर्षी सुद्धा अक्षराकडून या गावचे जवान जेथे जेथे कार्यरत आहेत तेथे राख्या पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या कर्तुत्वाला सैनिक टाकळी या गावच्या सर्व जवानाकडून व ग्रामस्थांकडून तिला सलाम

हजारो मैलांचे अंतर पार करून दूरच्या दुर्गम प्रदेशात एक धागा पोहोचतो आणि दोन अनामिक व्यक्तीमध्ये निर्माण होत ते स्नेहाचे व विश्वासाचे अतूट बंधन हे असते राखीचे बंधन. देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत घरदार विसरून प्राणाची बाजी लावणाऱ्या त्या अनाम जवानासाठी कोणीतरी आठवणीने प्रेमाने राखी पाठवलेली असते, प्रेमाचे चार शब्द लिहिले असतात ते बघून एरव्ही आपल्या माय भूमीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रूचा कर्दनकाळ असलेला रांगडा गडी हळवा व भावुक होतो. नवी उर्मी घेऊन आनंदाने नाचतो, गातो. आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर लढत असलेल्या जवानाना या राखीचे अप्रूप असते म्हणूनच अगदी आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात. जवानाबद्दल आपला आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य जनता ही आतुर असते पण आपली भावना कशी व्यक्त करावी.

 त्यांना माहीत नसते .पण राखीच्या प्रेम धाग्याने भावबंद जुळण्याची संधी दिली आहे. हा बंध जुळवण्यासाठी जवान आणि सर्वसामान्य नगरीक यांच्यातील दुवा बनली आहे ती कोकणातील अक्षरा गुरव. डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणारे बहाद्दर सैनिक सणासुदीला आपल्या कुटुंबियांपासून लांब असतात, पण त्यांची आठवण ठेवत त्यांना सणासुदीला शुभेच्छा पाठवण्याचं काम अक्षरा गुरव सारखी मुली न चुकता करतात. गेल्या तीन वर्षांपासून राखी पौर्णिमला सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्याचं काम हि मुलगी करत आहे.

एका ठराविक पत्त्यावरच लष्करातील जवानांना राख्या पाठवाव्या लागतात. जवानांचे, रेजिमेंटचे पोस्टिंग कुठल्या ठिकाणी आहे, हे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून माहिती नसते. त्यामुळे लष्करातील सांगितलेल्या विशिष्ट पत्त्यावर ती राख्या पाठविते. तेथून एखादी रेजिमेंट ज्या ठिकाणी आहे, तेथे त्या राख्या लष्कराकडून पाठविल्या जातात. जवानांचे अधिकाऱ्यांचे जेव्हा राखी पोहोचल्याचे फोन तिला येतात, तेव्हाच तिला कळते कि आपल्या राख्या नेमक्या कुठे गेल्या आहेत, अशी माहिती अक्षरा हिने दिली.

अक्षरा गुरव तुला आम्हा सैनिक टाकळीच्या जवानाकडून सलाम तु सतत असाच उपक्रम राबवत जा आणि आम्हा सैनिकांचे मनोधैर्य वाढवत जा जेणेकरून आम्ही सर्वजण भारत मातेच्या सेवेसाठी तत्पर राहीन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.