निपाणी टाकळी ता.सेलू साखळी उपोषणाचा तिसरा दिवस.
शिवाजी शिंदे सेलू तालुका प्रतिनिधी सेलू : दि.29 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोनाच्या समर्थनार्थ शासनाला चाळीस दिवसाची मुद्धत देऊन हि शासनाने कुठलीच हलचाल केली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाराजीचे सूर उमटले असून गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांना,पुढऱ्यांना गाव बंदी प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले आहे. जो पर्यंत मराठा समाजास कुणबी मध्ये आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्याच परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे. त्याचेच पडसाद सेलू तालुक्यात निपाणी टाकळी,करडगाव,कवडधन,आंबेगाव, गोगलगाव, काजळी रोहिणा आदी ग्रामीण भागामध्ये उमटले असून मराठा समाजात तीव्र संताप निर्माण झाल्यामुळे सर्वांनी मनोज जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निपाणी टाकळी येथे साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करण्याचा निर्धार घेतला आहे. यासाठी त्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यामध्ये जाऊन लोकामध्य...