पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाणीपट्टी व बेकायदेशीर गाळा भाडेवाढ रद्द करणे बाबत मनसे, शिवसेना (शिंदे गट),व स्वाभिमानी शेतकरी संघटना,यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

इमेज
  हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील.दि.31, हुपरी नगरपरिषद यांनी पाणीपट्टीदरामध्ये 2300 व गाळा भाडेवाढमध्ये 2000  अशी दुपटीने वाढ केलेली आहे.  ती तात्काळ थांबवुन लोकांना वेठीस धरू नये.  अन्यथा या विरोधी उग्र आंदोलन करण्यात येईल व मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल.  असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील (अण्णा) यांनी दिला.  यावेळी मनसे,शेतकरी संघटना, शिवसेना (शिंदे गट) यांनी  मुख्याधिकारी अशोक कुंभार यांना निवेदन दिले.  यावेळी मुख्याधिकारी यांना ही वाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा गाव बंद व आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.  पाणीपट्टी वाढ करून पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा सोडले जाते पाण्याची बोंबाबोंब ऐन पावसाळ्यात सुरुवात झाल्याने लोकांनी प्रशासनाला धारेवर धरले.  त्यावेळी प्रशासकीय अधिकारी यांना काहीच उत्तर देता आले नाही. पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी वाया जाते.टाक्याची गळती काढता येत नाही.लोकांचा विरोध डावलुन जनतेचा रोष अंगावर घेऊन नंतर मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण मोहीम राबवली ती पण अर्धवट सोडून दिली. तरी यामधे नुतन मुख्याधिकारी य...

बांधकाम कामगारांच्या विविध मागणीसाठी निपाणी लेबर ऑफिस वर मोर्चा

इमेज
 जनवाड प्रतिनिधी - (शितल कुडचे) बेळगाव जिल्हा लाल बावटा कामगार संघटनेच्या विविध प्रमुख मागण्यासाठी निपाणी लेबर ऑफिस वर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये निपाणी व चिकोडी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने हजर होते   निवेदनामध्ये कामगारांच्या प्रमुख मागण्या  1. कार्डाचे नुतनीकरण पगार आणि हजेरी यादी रद्द करा  2, बांधकाम कामगारांचे सर्व कुटुंबासाठी दवाखाना चालू करा 3, भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करा 4,घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे 5, पेन्शन अर्ज करण्याची कालमर्यादा रद्द करा 6, बांधकाम कामगार निधीचा गैरवापर थांबवा अशा विविध प्रमुख मागण्यासाठी लालबावटा बांधकाम कामगार ऑफिस पासून मुख्यमार्गावरून लेबर ऑफिसला कामगारांच्या घोषणा देत धडक मोर्चा निघाला यावेळी बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड धनाजी कांबळे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नेताजी कोळी यांनी मोर्चाचे नियोजन करून आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कॉम्रेड परवीन नाईकवाडे कॉम्रेड शितल कुडचे बाबुराव कदम संदीप कांबळे दस्तगीर सनदे शिवाजी कांबळे   मानले व ...

लहानग्या कु. अक्षरा गुरवचे आगळे वेगळे रक्षाबंधन

इमेज
म्  सिंधुदुर्ग वृत्तसेवा - कु.अक्षरा गुरव रा. साळस्ते ता. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग, येथील गेल्या दोन-तीन वर्षापासून अक्षरा गुरव नावाची मुलगी आपल्या कल्पकतेच्या बळावर असाच एक वेगळा उपक्रम राबवत आहे .कोरोना काळापासून ती दरवर्षी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवत आहे .अक्षरा ही सध्या नववी मध्ये शिकत आहे .कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये ती कणकवली तालुक्यातील साळस्ते या गावी आपल्या आजी-आजोबाकडे राहायला गेली. यावेळी लॉकडाऊनच्या काळात काहीतरी करावे अशी तिला वाटले त्यातूनच राख्या तयार करून त्या भारतीय सैनिकांना पाठविण्याचे तिच्या आजोबांनी तिला सुचविले आणि तिचा हा उपक्रम तेव्हापासून चालू झाला. ती दरवर्षी सैनिकांना शंभर ते दोनशे राख्या पाठवत असून यावर्षी तिने दोनशे राख्या तयार केल्या आहेत .या राख्या सोबत ती एक सुंदर चित्र काढून त्यामागे सैनिकांना एक पत्र देखील लिहिते. या उपक्रमामुळे अनेक सैनिक तिच्या संपर्कात आहेत .त्यांच्याकडून तिला अनेक प्रतिक्रिया देखील येत असतात. या सगळ्याबरोबरच शालेय शिक्षण, चित्रकला, मेहंदी, डान्स याची सुद्धा अक्षराला आवड आहे. आपली बु...

डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाची किल्लेश्री पन्हाळगड मोहीम यशस्वीरीत्या संपन्न

इमेज
  कोल्हापूर कोल्हापूर वृत्तसेवा  डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एमएस्सी रसायनशास्त्र व एमएस्सी फूड सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांची किल्लेश्री पन्हाळगड मोहीम इतिहास अभ्यासक प्रसाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली. कुलगुरू डॉ.के प्रथापन व कुलसचिव डॉ जयेंद्र खोत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद जोशी हे इतिहास अभ्यासक असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनावर डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठांमध्ये पीएचडी शिक्षण घेत आहेत. २०१६ सालापासून त्यांनी आजवर अनेक गड-किल्ल्यांवरती मोहिमा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांना पन्हाळगडावरती असणाऱ्या राजखिंड,  पुसाटी बुरुज, मसई पठार,  सदर, छत्रपती यांचे घर, शिवकालीन महादेव मंदिर, वीर शिवा काशीद यांचे योगदान, अशी बरीच ठिकाणे दाखवून प्रत्येक ठिकाणावर घडलेला सर्व इतिहास पुराव्यानिशी सांगितला व विविध लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्...

बचत करुन संस्था चालविण्यास महिला सक्षम पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींचे प्रतिपादन

इमेज
 एकसंबा - प्रतिनिधी (अमर माने) बचतीचे बाळकडु महिलांना जन्मताच असते त्यामुळे त्यांना बचतीच्या उपदेशाची गरज नसते. हेड, हार्ट आणि हँड हे तिन्ही घटक चांगले असल्यास व्यवहार चांगले होतात. विश्वासावर चालणाऱ्या संस्था चालविण्यास महिला सक्षम असतात. पैशाचा सदुपयोग करुन जीवनात आर्थीकमान उंचावता येणे शक्य असते. त्यासाठी पैसा खेळता रहावा असे प्रतिपादन निडसोशी येथील सिध्द संस्थान मठाच्या श्री. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींनी केले. एकसंबा येथे धनश्री महिला सहकारी संघाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. प्रारंभी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. महास्वामींची पादपूजा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. छाया इंगळे व अजित इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर मराठा भवनात कार्यक्रम झाला. महास्वामी व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना नणदी येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत समयीताराजे निंबाळकर यांनी महिला आता चुल आणि मुलापुरत्या मर्यादित नसून ज्ञानार्जनाने सक्षम बनल्या आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि दुर्गा स्वरुपी महिल...

साखरवाडी महावितरण शाखा अभियंता चांगण यांचे खुर्ची सोडून पलायन चांगण यांची बदली करण्याची सतीश माने यांची मागणी

इमेज
 साखरवाडी प्रतिनिधी  - गेले कित्येक दिवस साखरवाडी होळ खामगाव पिंपळवाडी व परिसरात शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठ्या मुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे अशातच शेतकऱ्यांची पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत गेले दोन-तीन महिने झाले पावसाअभावी पिके जळून चालली आहेत अशा परिस्थितीमध्ये विद्युत महामंडळाकडून‌ येथील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी वीज मिळत नसल्याने  शेतकरी हातघाईला आला आहे आठ तास टिकणारी वीज दोन तासावर आली असल्याने शेतातील वीज पंप बंद पडू लागले आहेत अशा परिस्थितीमध्ये अधिकारी मात्र बेसावधपणाची भूमिका घेत असल्याने होळ साखरवाडी पिंपळवाडी खामगाव येथील शेतकरी आपले निवेदन घेऊन साखरवाडी येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर एकजुटीने गेले असता शाखा अभियंता यांचा तपास नव्हता तरीही शेतकरी साहेबांना निवेदन देण्यासाठी वाट बघत कार्यालयाच्या बाहेर थांबले होते काही तासांनी शाखा अभियंता अमोल चांगण साहेब आपल्या कार्यालयाची दारे बंद करून आत बसल्याचे निदर्शनात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला अशा परिस्थितीमध्ये फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सतीश माने व त्यांचे सर्व सहकारी साहेबांच्या खोली...

शिरोळात यादव प्रेमी ग्रुपच्या वतीने गुणीजनांचा सत्कार

इमेज
 शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ येथे यादव प्रेमी ग्रुपतर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुनिजनांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ व हातकणंगले तालुका सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरोळचे नगरसेवक पंडित काळे यांचा तर युरोपमध्ये शिष्यवृत्ती मिळवत पीएचडीसाठी निवड  झाल्याबद्दल प्रियंका विजय पवार यांचा आणि सलग एक तास स्केटिंग करून विश्वविक्रम केल्याबद्दल विवांश किरण पाटील  सार्थक संतोष कोळी हर्षवर्धन काकासो कोळी यांचा व केंद्रीय राखीव पोलीस दलात कु.गायत्री अरुण माने निवड झाल्याबद्दल शिरोळ तालुका भाजप नेते अनिलराव यादव  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या वेळी दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने युवा नेते विराजसिंह सामाजिक कार्यकर्ते अमर उर्फ नाना कदम बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर दरगु पाटील विजय पवार सतीश जाधव,अमर संकपाळ, किरण पाटील, रवी जाधव, काकासो कोळी, संतोष कोळी अरुण माने सचिन उर्फ...

लोणंद- नीरा रोडवरील अपघातातील फरार ट्रकचालक ट्रकसह पोलीसांच्या ताब्यात; परजिल्ह्यातून घेतले ताब्यात.

इमेज
 लोणंद, प्रतिनिधी . दि.२६लोणंद ते नीरा रोडवर पालखी मार्गावरील बाळुपाटलाची वाडी हद्दीत दि.१६ ऑगस्ट रोजी भवानीमाता मंदिराजवळील उतारावर कोरेगाव येथील युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला अनोळखी ट्रक कसून शोध घेत लोणंद पोलीसांनी परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले. लोणंद नीरा या पालखीमार्गावर दि.१६ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कोरेगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. सदर अपघातातील अज्ञात वाहन अपघात करून निघून गेले होते. सदर अपघात रात्रीच्या वेळेस झाल्याने सीसीटिव्ही फुटेजमधे वाहनांचा नंबर येत नसल्याने या अपघातातील फरार वाहन व ट्रकचालक निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान लोणंद पोलिसांसमोर होते. सदर अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्याकडून तपासासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानूसार लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी दोन ...

मालवण तालुक्यातील आचरा पिरवाडी येथील ग्रामोन्नती मंडळा मार्फत ज्येष्ठ नागरिक वारकरी दिंडीचे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरास भेट व श्रावण मास दर्शन सोहळा संपन्न.

इमेज
सदलगा प्रतिनिधी  - (आण्णासाहेब कदम) दि. 27 मालवण तालुक्यातील  पिरावाडी या गावातील  ग्रामोन्नती मंडळाने यावर्षी श्रावण मासातील एकादशीनिमित्त पंढरपूर वारीला ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे नियोजन केले आहे. या वारीतून धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा व पर्यावरण संरक्षण या विषयाचे प्रबोधन करीत ही वारकरी दिंडी पंढरपूर येथे जाणार आहे. वाटेत या दिंडीने ऐतिहासिक वास्तू असलेल्या कोपेश्वर मंदिराला भेट दिली. व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. त्याप्रसंगी सदलगा शहरातील आर के फाउंडेशन यांच्यावतीने त्या सर्व वारकरी दिंडीचे स्वागत  आर के फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सीमा कदम, श्री अण्णासाहेब कदम, श्री रमेश कुमार मिठारे (ज्येष्ठ पत्रकार) सामाजिक कार्यकर्ते सुनील धनवडे , (नरसोबावाडी) वडगोले परिवार ,सदानंद मुतनाळे, श्री शितल कुडचे, यांच्या हस्ते सर्वांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी ओळखून आर के फाउंडेशन यांनी उपवासानिमित्त फळे, त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य याचेही वितरण यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्...

टाकळीवाडी येथील गणेश मूर्ती कर्नाटकात व महाराष्ट्रात प्रसिद्ध..

इमेज
 टाकळीवाडी वार्ताहर - तालुका शिरोळ येथील श्री गणेश मूर्ती कर्नाटकातील चिकोडी तालुका, रायबाग तालुका ,व महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यात प्रसिद्ध आहेत.    टाकळीवाडी मध्ये दीड फुटापर्यंत गणपती तयार केले जातात. तसेच अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती चे कलर काम केले जातात.   यांचा लहानपणापासून चा हा व्यवसाय आहे. गेली 50 वर्षे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे.   अतिशय सुबक व अत्यंत सुंदर अशा मूर्ती बनवली जातात. सध्या काही दिवसात गणेश चतुर्थी येऊन ठेपलेली आहे.   त्या दृष्टिकोनातून त्यांचे कार्य जोरात चालू आहे. अनेक मूर्तींना मागणी वाढत आहे. कुंभार समाजाचे कार्य आता सध्या वीस तास काम चालत आहे.    कुंभार समाजाचा उदरनिर्वाह या गणेश मूर्तीवर चालतो. मूर्ती घडवण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे सुद्धा त्यांनी सांगितले. संपूर्ण कुंभार समाज लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गणेश मूर्ती बनवण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत.

शिवचरण उज्जेनकर फौंडेशनचे खामगांव येथे साहित्य संमेलन संपन्न.

इमेज
 कवि सरकार इंगळी.     शिवचरण उज्जेनकर फौउंडेशन मुक्ताईनगर  जळगांव या संस्थेच्या माध्यमातून दुसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा साहित्य संमेलन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भवनजी अर्जनजी खिमजी व्यासपीठ ,ए.के.नॅशनल हायस्कूल व ज्यु.काॅलेज मुक्तेश्वर आश्रमासमोर खामगाव जि.बुलढाणा येथे संपन्न झाले.     सकाळी ८वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरवात झाली. सकाळी ९वाजता श्री अशोक अग्रवाल,महाराजा अग्रेसन रिसोर्ट ‌चिखली मेहकर यांचे हस्ते करण्यात आले. संमेलन अध्यक्षा लता गुठे,भरारी प्रकाशन मुंबई। यांनी भुषविले. तर स्वागताध्य किशोर गरड,लायन्स कल्ब डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन हे होते.आणि प्रमुख उपस्थीती म्हणून प्रसिद्द कांदबरीकार लेखक ,श्रीकांत पाटील कोल्हापूर,श्री.सतीश तराळ,राज्यस्तरीय अध्यक्ष,डाॅ. प्रतिभा इंगोले, डाॅ. सुभाष बागल हे होते.प्रास्ताविक शिवचरण उज्जेनकर यांनी केले.व विविध मान्यवर यांचा सन्मानचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करणेत आले.यावेळी कवि सरकार इंगळी, कोल्हापूर यांचा ही विषेश सत्कार करणेत आले. संमेलन निमंत्रक प्रा.प्रविणा शहा,संयोजक प्रविण ...

राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण.

इमेज
 लोणंद प्रतिनिधी - अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित गेली ५ वर्षे गोरगरीब आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी उघडण्यात आलेली संघटना म्हणून नावारूपाला आलेली राजवंश आठवडा बाजार संघटना व या संघटनेचे संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण आज  करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील आठवडा बाजार करणारे नागरिक उपस्थित होते. राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार यांच्या माध्यमातून या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली व कोरोनाच्या कार्यकाळामध्ये अगदी गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेली संघटना म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी संघटनेतील एका व्यापाऱ्याचा आकस्मितरित्या मृत्यू झाला होता त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यानी मिळून संघटनेच्या माध्यमातून आपल्या बांधवाला आर्थिक मदत संघटनेच्या माध्यमातून केली व ही मदत संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार व पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या घरी जावून द...

विरांगणा करिअर अकॅडमीची गगन भरारी झेप.,पहिल्याच बॅचमध्ये 7 जणांची निवड : यशस्वी विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक , सत्कार

इमेज
 कारदगा / प्रतिनिधी कारदगा तालुका निपाणी येथील विरांगणा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच फेरीत गगनभरारी झेप घेतली आहे. या अकॅडमीचे हे पहिलेच वर्ष आहे. पहिल्याच बॅचमध्ये तब्बल 7 उमेदवारांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने विरांगणा अकॅडमी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत घेण्यात आलेल्या SSD - GD 2022 परीक्षेत विरांगणा करिअर अकॅडमीतर्फे यश संपादन करून भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कारदगा येथील 5 युवक - सुरज निकम ( BSF), रोहित कुंभार ( Assam Rifles), प्रमोद गावडे ( BSF), प्रदीप कुंभार (CRPF), शुभम निकम ( Assam Rifles) व प्रणाली वराळे ( SSB), या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. तसेच बेडकिहाळ येथील साक्षी गायकुडे ( Assam Rifles) या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेले ओंकार नरगट्टे(CA), मारुती गावडे (BSF ), आशुतोष बुडके (CA), आदिती अ. मुराबट्टे व आदित्य आ. पुजारी यांची MBBS साठी निवड झाले बद्दल, श्रद्धा सा. केसरकर बेडकिहाळ हीची NIT मध्ये निवड झालेबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यां...

मलिकवाड येथील बागेतली महालक्ष्मी मंदिर परिसरात ओम गणेश तरुण मंडळ व बालवीर मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण

इमेज
 मलिकवाड प्रतिनिधी - (अमर माने) दि.28, मलिकवाड येथील बागेतली महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदीर परिसरात ओम गणेश तरुण मंडळ व बाल वीर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले.मंदिर परिसर सुशोभित करण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे भाविकांना सावली उपलब्ध होणे व पर्यावरण विषयक जागृती करणे अशा उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून वृक्षारोपणाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे हा संदेश देण्यासाठी व पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.वृक्षारोपणामुळे या परिसराला अल्हाददायक वातावरण मिळणार असून भविष्यात हा परिसर उत्तमरीत्या सुशोभित होणार आहे यामुळे परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे व मंडळांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. यावेळी सुभाष वडगावे, किसन खोत, धनंजय पाटील,संजय वडगावे, रंजीत देशपांडे, संजय कुन्नुरे, संदीप वडगावे, प्रशांत करजगे, अजित पाटील, आनंद पाटील, शरद पाटील, अभय खोत, किरण हिरेकुडे, प्रदीप हरोले...

आरडगांवच्या पाणी प्रश्नाचे ग्रहण केंव्हा सुटणार.... कोणी पाणी देता काहो पाणी पाण्यासाठी आरडगांवकरांची आर्त हाक.....

इमेज
 लोणंद प्रतिनिधी - (दिलीप वाघमारे) फलटण तालुक्यातील आरडगांव या गावाला एक राजकीय वारसा आहे .  मात्र याच गावाला सद्या पाणीप्रश्नाने हैराण केले आहे. या वर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. गावाच्या जवळच दोन धरणे आहेत त्यातील एक म्हणजे तांबवे धरण व दुसरे धरण म्हणजे लेंढीचे धरण मात्र ही दोन्हीही धरणे यावर्षी पाऊस अगदी कमी पडल्याने पूर्णतः पाण्याविणा कोरडी ठणठणीत पडली आहेत त्यामुळे दोन्ही धरणे गावच्या उशाला मात्र कोरड पडली लोकांच्या घशाला अशी वेळ आलेली आहे. पाऊस नसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी राजा तर आ पासून पावसाची प्रतीक्षा करत आहे पाऊस नसल्याने शेतकरी राजाची अवस्था चिंतातुर जंतूसारखी झालेली आहे. आरडगाव ,चव्हाणवाडी, कापडगाव या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा लेंडीच्या धरणातून खोदलेल्या विहिरीतूनच केला जातो मात्र यावर्षी वर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने या भागातील आरडगावचा पाणी प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. दरवर्षीच पाऊस न पडल्यानंतर आरडगावची अशीच पाण्याची बोंबाबोंब असते .आतातर ...

हुपरी येथे सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणीतील आरोपी ना अटक

इमेज
 हुपरी प्रतिनिधी - (सागर पाटील)   हुपरी येथे चोरीचे दागिने विकणे करता येणार असले बाबत खबरी कडून मिळालेल्या माहितीवरून मा. पीआय किशोर शिंदेसाहेब यांना माहिती मिळताच सापळा रचून  1)प्रवीण बाबुराव जाधव राहणार अंबाई नगर व  2)संदीप रामचंद्र ढेरे वय वर्षे 25, 3)संगीता रामचंद्र ढेरे वय वर्ष 23 यांना तपासांअंती ताब्यात घेतले असता संशयती थोडा घाबरल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  सदर आरोपी संदीप व संगीता ही नवरा बायको असून ते यामाहा मोटरसायकल वरून अपेक्षा कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.सदर आरोपी नंबर तीन संगीता ही आर के नगर येथे राहत असलेल्या अमर वायचळ प्लॉट नंबर 40 सोसायटी नंबर 2 यांच्या घरातून सोने चोरून ती आरोपी नंबर 2) संदीप याला राहणार आर के नगर (मुळगाव) इस्फुर्ली तालुका करवीर यास देऊन आरोपी दोन व तीन यांनी सदर सोने संगणमताने चोरीचे असताना त्यातील थोडे सोने हुपरी येथे दोन ज्वेलर्स मध्ये विकून त्यातून आलेल्या पैशातून नवीन मोटरसायकल घेऊन बाकीचे पैसे व सोने आरोपी यांच्या घरी असून उर्वरित आठ तोळे सोन्याचे दागिने (40000) किमतीचे हे फेडरल बँक हुपरी येथे...

ताराबाई आण्णासाहेब नरदे हायस्कूलची कु.समीक्षा चौगुले प्रथम

इमेज
  नांदणी वार्ताहर (अजितबुबणे > नांदणी- नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात 2023 -24 अंतर्गत "भरड धान्य -एक उत्कृष्ट पौष्टिक आहार की भ्रम "या विषयावर महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेमध्ये ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणीची विद्यार्थिनी कु.समीक्षा संजय चौगुले हिने प्रथम क्रमांक मिळवून तिची विभागीय वक्तृत्व स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली. या स्पर्धेचे स्वरूप लेखी चाचणी,वक्तृत्व स्पर्धा आणि नंतर तोंडी प्रश्न असे होते.या स्पर्धेसाठी तिला विज्ञान विभागाच्या सौ.एस.एस पाटील,श्री.ए.ए.शिरगावे,सौ.पी.आर.पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच मुख्याध्यापिका सौ.पी.पी.देसाई यांचे प्रोत्साहन  व संस्थेचे अध्यक्ष श्री.आदिनाथ  नरदे,उपाध्यक्ष श्री.अजित कुरडे,श्री.कुमार हातगिणे व श्री.सागर संभूशेटे यांच्यासह सर्व संचालक व सदस्य  यांची प्रेरणा मिळाली.

अकिवाट ग्रामपंचा़यतीच्या उपसरपंच पदी प्रकाश रायनाडे(सावकार) यांची बिनविरोध निवड

इमेज
  प्रतिनिधी / रमेशकुमार मिठारे     अकिवाट तालुका शिरोळ येथील यड्रावकर गटाचे प्रकाश राजगोंडा रायनाडे (सावकार) यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सुकाणू समितीच्या ठरलेल्या मुदतीत सौ रत्ना रमेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदासाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात अकरा वाजता विशेष सभा सरपंच सौ.वंदना सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत प्रकाश रायनाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर सरपंच वंदना पाटील,इकबाल बैरगदार, आप्पासो बडबडे, शितल हळीगळे, सुहास पाटील, ताजुद्दीन तहसीलदार, गणपती कागे, बाबासो उमाजे यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभिनंदन व शुभेच्छा दिले उपसरपंच प्रकाश रायनाडे (सावकार) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गटाच्या नेत्यांना व सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावच्या विकास कामात झोकून घेऊन काम करण्याची ग्वाही दिली निवडी वेळी ॲड. अरुण कल्लण्णावर, आप्पासो दानोळे, नेमगोंडा पाटील, श्रणीक चौगुले, सागर रायनाडे, युनूस तहसीलदार, सुरेश सावंत, अविनाश रायनाडे, अमोल कांबळे संजय रायनाडे उपस्...

अल्टरनेटिव्ह मेडिसीन ऑफ आयुष भारत च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी डॉ विनायक मेथे यांची निवड

इमेज
रेंदाळ प्रतिनिधी - (सचिन कुंभार) दि.29 अल्टरनेटिव्ह मेडिसिन ऑफ  आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी डॉ.विनायक मेथे (रेंदाळ ) यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुल्लाणी यांनी दिली.असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.एन.सुतार , राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.शाहीन मुलाणी राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा डॉ साक्षी सुतार,राष्ट्रीय कायदे प्रमुख वैद्य मेटकरी सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ वाघमारे सर राष्ट्रीय सचिव डॉ भोसले सर आदि पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने ही नियुक्ती करण्यात आली.या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.या निवडीनंतर डॉ.विनायक मेथे यांच्यावर विविध स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.     असोसिएशन सभासदांच्या वाढीसाठी व सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही अजून जोमाने प्रयत्न करणार असल्याचे नूतन राज्य अध्यक्ष डॉ विनायक मेथे यांनी बोलताना सांगितले.

"महामानवाच्या बदनामी कारक पोस्ट वक्तव्ये या पासून तसेच महीला अत्याचार व मागासवर्गीय युवक हत्याकांड अशा वाढत्या घटनानमूळे बिघडत असणारा कायदा आणी सुव्यवस्था राखण्यामध्ये सरकारला येत असणारे अपयश याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन "

इमेज
  लोणंद प्रतिनिधी  - सातारा जिल्ह्याला पुरोगामीत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असताना आज अखेर महामानवांच्या बाबतीत बदनामीकारक प्रकार कधीच झाला नाही याचा विचार कर्ता छ.शिवाजी महाराज यांच्या बदनामीकारक पोस्ट करण्यात आली ज्यांनी कोणी हे दुष्टक्रूत्य केले त्याच्यावर कठोरात कठोर शासन व्हावे व त्याचा मास्टर माईंड जो कोन असेल त्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात यावी की पुन्हा असे धाडस कोणीही करणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागनी करणेत येते.          तसेच ही घटना घडल्यानंतर संविधानिक मार्गाने निषेध आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे.आम्ही सुद्धा या घटनेचा तीवृ शब्दात निषेध करतो परंतू कायद्याला न जूमानता ज्या पद्धतीने कायदा पायदळी तूडवत झुंडशाही करत जिल्हाधीकारी कार्यालयाच्या आवारात घूसून घोषणाबाजी करून जो काय प्रकार झाला याची ही सखोल चौकशी करून त्यांच्यावर ही कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने केली पाहीजे.कारण संविधानीक पद्धीतीने मोर्चे आंदोलने करणाऱ्यांना सुद्धा चार ते पाच जणानंचेच शिष्टमंडळ करूनच जिल्हाधीकारी कार्यालयात पाठ...

मलिकवाड हायस्कूलमध्ये पालक सभा.,दहावीचा निकाल वाढवण्यासाठी प्रयत्न, सभेत विविध विषयावर चर्चा

इमेज
  मलिकवाड, (अमर माने ) ता. 29 : येथील हायस्कूलची पालक सभा नुकतीच पार पडली.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. आर.माने यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायले. त्यानंतर श्रुत रावसाहेब कुन्नुरे या लहान मुलांने संस्कृत स्रोत गायले. यावेळी त्याचे शिक्षक व पालकांकडून कौतुक करण्यात आले.  श्री. मुख्याध्यापक माने म्हणाले की, सध्या जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची असून येणाऱ्या  आयुष्याला कलाटनी देणारे आहे. त्यामुळे जिद्द, चिकाटी व धैर्याने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यंदा 2023 सालातील दहावी  परीक्षेचा निकालात भरघोस यश मिळवून शाळेचे नाव लौकिक करावे. त्यासाठी शिक्षक व पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश वैजे यांनी आठवी व नववी वार्षिक बोर्ड परीक्षेची माहिती दिली.     शिक्षक निवलगी म्हणाले, दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी  कष्ट करणे महत्त्वाचे आहे. दहावीचा निकाल हाच पुढील शिक्षण घेण्याचा भक्कम पाया असून आपले आयुष्य बदलते. अनेक वि...

आरडगाव पाणी टंचाई निवारणार्थ प्रांताधिकारी यांनी केली ग्रामस्थांशी चर्चा : टँकर खेपा वाढवून देणार

इमेज
  लोणंद प्रतिनिधी दि. २९ : आरडगाव, ता. फलटण येथील पाणी टंचाई बाबत माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत  बोडरे, महसूल मंडलाधिकारी राहुल खाडे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांच्या अपेक्षा समजावून घेतल्यानंतर तातडीने टँकरच्या खेपा वाढवून देण्याचे आश्वासन दिले.     आरडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत सरपंच रविंद्र शिर्के, उपसरंपच अरुणाताई भोईटे, मा.ग्रा.पं. सदस्य निलेश भोईटे, पत्रकार प्रतिक भोईटे, पोलीस पाटील अमित भोईटे, चंद्रकांत भोईटे, ग्रामविकासअधिकारी कर्णे, पत्रकार सुरेश भोईटे, विजय शिवाजी भोईटे,भिमराव भोईटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.     बैठकीत लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल याविषयी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांच्या अपेक्षा जाणून घेताना पाणी कोठून व कशा पद्धतीन आणल्यानंतर पाणी प्रश्न सुटेल याविषयी लोकांच्याबरोबर संवाद प्रस्थापित करीत प्रांताधिकारी सचि...

औद्योगिक वसाहतीचे तोटे पहाता अकिवाट येथील गावकऱ्यांनी केला कडाडुन विरोध व ग्रामसभेत केला ठराव नामंजूर

इमेज
 अकिवाट /रमेशकुमार मिठारे शिरोळ तालुक्यातील अकिवाट   गावांमध्ये एमआयडीसी आणण्यासाठी राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी अंदाजे 74.94 हेक्टर आर जमिन अधिग्रहित करण्यासाठी ग्रामपंचायतीला नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, या एमआयडीसीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवण्यासाठी न भूतो न भविष्यते अशी गर्दी या गाव सभेला केली.  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. अकिवाट येथील एम.आय.डी.सी हद्दपार करण्यासाठी  ग्रामस्थानी एकीची वज्रमूठ दाखवून दिली.एम.आय.डी.सी आम्हाला नकोच अशी हाक सर्वांनी दिली.केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी एम.आय.डी.सी साठी समर्थन दर्शवले. गावांमधील ग्रामस्थांनी भक्कमपणे एकजुट करत एकीचे दर्शन घडवले.  एम.आय.डी.सी साठी सहमत असणाऱ्या समर्थकांनी एमआयडीसी परिसरातील नागरिकांच्या साठी पोषक कशी ठरते हे समजावण्याचा प्रयत्न केला तर एम.आय.डी.सी.साठी विरोध असणाऱ्या नागरिकांनी त्याचे तोटे सुद्धा सांगितले त्यामुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त असल्यामुळे आमच्या गावात एम.आय.डी.सी .नकोच असा एकच सुर उमटला....

शिवकालीन पुरातन हुड्याची मोजणी न झालेस आमरण उपोषणाचा इशारा --शिवगर्जना व स्पोर्ट्स अकॅडमी

इमेज
 टाकळीवाडी -  नामदेव निर्मळे. दि.30  टाकळीवाडी येथील शिवकालीन पुरातन हुडा अनेक वर्षांपासून नादुरूस्त व दिवसेंदिवस हुड्याभोवती अतिक्रमण होत असलेने शिवगर्जना तरूण मंडळ व स्पोर्ट्स अकॅडमी चे तरूणांनी यांची दखल घेऊन वारंवार ग्रामपंचायतीकडे  हुडा मोजणीसाठी व  सुशोभीकरणासाठी तगादा लावल्यानंतर दि.21/4/2023ई रोजी उप अधीक्षक भुमी अभिलेख शिरोळ येथे सि.स.नं.1641,1642ची मोजणी फी भरलेली आहे.    परंतू अद्याप पर्यंत मोजणी झालेली नाही . वेळोवेळी विचारणा करून देखील ग्रामपंचायत व भुमी अभिलेख कार्यालय शिरोळ, दखल न घेता बेदखलपणाने वागत असलेने ,सर्व तरूणांनी तात्काळ मोजणी न झालेस ग्रामपंचायत टाकळीवाडी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिले आहे.    तसे तहसिलदार सो,शिरोळ,उपाधिक्षक भुमीअभिलेख,शिरोळ,ग्रामपंचायत,टाकळीवाडी,पोलीस निरिक्षक,पोलीस ठाणे,कुरूंदवाड यांना निशांत गोरे,कृष्णा कोळी,सौरभ शिंदे,भरत सलगरे,सुधीर गोरे,निलेश वनकोरे,दत्तात्रय बदामे,श्रीमंदर एक्संबे यानी निवेदन दिले आहे.

श्रीमती सुलोचना महारुद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

इमेज
  जनवाड वार्ताहर/,  टाकवडे येथील श्रीमती सुलोचना महारुद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या 86 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात मुले मुली सुना नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे त्या धार्मिक कार्यात नेहमी सर्वात मिसळत असत तसेच दान धर्म नेहमी करत होत्या त्यांच्या जाण्याने कोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे      “आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. आई.  भावपूर्ण श्रद्धांजली!

तळंदगे-रुई येथे मोबाईल जबरी चोरी प्रकरण दोघांना अटक

इमेज
  हुपरी सागर पाटील - तळदंगे कमानी जवळ भाजी घेऊन येत असताना अनिल अंन्तराम भरतवाज मुळ गाव रा बेलवरीया उत्तर प्रदेश सध्या साकडं कास्टिंग MIDC कागल हे जात असता जबरदस्ती (विवो) कपंनीचा मोबाईल स्पलेडंर वरून येऊन हिसकावून घेऊन पसार झाले प्रकरणी दिपक धोत्रे व शाईद पठाण दोघे (रा रुई) या दोघांना अटक करून कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

क्षेत्र वीर येथे शरद पवारांच्या हस्ते सवाई मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न.

इमेज
 लोणंद प्रतिनिधी - दि.25 श्रीक्षेत्र वीर ( ता, पुरंदर ) येथील देवस्थान ट्रस्ट संचलित सवाई मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा अत्यंत नियोजनबद्ध आणि थाटात संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या हस्ते सवाई मंगल कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गेले अनेक महिन्यापासून या सवाई मंगल कार्यालयाचे काम चालू होते. अनेकांनी या कार्यालय उभं करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. अनेक दानशूर भाविक भक्तांनी यासाठी आर्थिक हातभारही लावला तसेच पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही वेळोवेळी योग्य ती मदत केलेली आहे  त्यामुळे श्रीक्षेत्र वीर या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असे सर्व सोयी नियुक्त असे हे सवाई मंगल कार्यालय सर्वांसाठी आजपासून अत्यंत माफक दरात उपलब्ध झाले आहे. राष्ट्रवादीतील फुटी नंतर  खासदार शरद पवारांचा पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथे पहिलाच दौरा असल्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते परंतु पवारांनी कुठलेही राजकीय भाषण न करता धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर चर्चा न...

अकिवाट येथील स्वर्गीय वैद्य वसंतराव गायकवाड यांचे बंधू संजयकुमार गायकवाड यांचे दुःखद निधन

इमेज
प्रतिनिधी - (रमेशकुमार मिठारे) अकिवाट तालुका शिरोळ येथील प्रसिद्ध अर्धांगवायूचे वैद्य स्वर्गीय वसंतराव रामू गायकवाड यांचे धाकटे बंधू, संजयकुमार गायकवाड यांचे वयाच्या 55 व्या वर्षी बुधवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे संचालक व राजमाता जिजाऊ महिला दुधसंस्थेचे संस्थापक होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुन,भाऊ, बहीण, पुतणे असा मोठा परिवार आहे.     शनिवार दिनांक 26ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता अकिवाट येथे रक्षाविसर्जन आहे.

चंद्रयान-3 यशस्वी लँडिंग झाल्याने हुपरीत आनंद उत्सव साजरा

इमेज
 हुपरी प्रतिनिधी - ( सागर पाटील ) जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चंद्रयान-3 चे लँडिंग अखेर यशस्वीरित्या पार पडले भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. आणि सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश इस्त्रोचे संपूर्ण जगाने आज कौतुक केले आहे.         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग येथून लाईव्ह लँडिंग पाहत संपुर्ण शास्त्रज्ञ यांचे मनापासून अभिनंदन करत भारताने इतिहास रचला आहे. त्याची नोंद जगभरात झाली  चंद्रावर तिरंगा मोठ्या डौलाने फडकत राहील असा विश्वास व्यक्त केला. आज त्याचा जल्लोष संपूर्ण देशात साजरा झाला.          यावेळी हुपरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्र येत जुने बस स्थानक येथे रांगोळी काढून फटाक्यांची आतिशबाजी करत पेढे व साखर वाटप केले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक राजाराम देसाई,विद्याधर कांबळे,नानासो भोसले,सुदर्शन खाडे,अजित सुतार,नितीन गायकवाड,किरण हुपरीकर,धनंजय खाडे, सातारा गायकवाड,बाळासाहेब कंगने,पत्रकार बाळासाहेब कांबळे,सागर पाटील,महादेव पाटील, गुरुप्रसाद पाटील,वसवाडेमामा व शेतकरी संघटनेचे पाटीलस...

प्राथमिक आरोग्य केंद्र प. कोडोलीच्या गुणवत्तेत वाढ, अल्पावधीतच कायापालट

इमेज
कवि सरकार इंगळी.  प्राथमिक आरोग्य केंद्र पट्टण कोडोली येथील उपकेंद्र    कोडोली रुई, चंदूर, इंगळी ., तळंदगे , या पाच गावातील रुग्णांना / लाभार्थ्यांना वरदान ठरलेल्या या आरोग्य केंद्राच्या लौकिकात भर पडत आहे. त्यामुळे रुग्न्याच्याकडून समाधानाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.  येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित आरोग्य सेवेच्या कामाचा आलेख वाढवतच आहेत. दैनंदिन - १५० ते २०० रुग्ण ओ. पी. डी . ला येऊन उपचार घेत आहेत.  येथील प्रत्येक रुग्णांची वैयक्तिक तपासणी रक्तदाब, शुगर, आवश्यकतेनुसार इतर सर्व २५ तपासण्या मोफत  केल्या जात आहेत.  कुटुंब कल्याण अंतर्गत फक्त ४ महिन्याच्या कालावधीत १८० स्त्री शस्त्रक्रिया तसेच २ पुरुष शस्त्रक्रिया करून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकांवर आहे.  प्रसूतीच्या बाबतीत एका दिवसात ८ प्रसूती स्वतःच्या आरोग्य केंद्रात करून जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड केले आहे. बरेच वेळा अनेक गुंतागुंत असलेल्या प्रसूतीसह ४ महिन्यात ५३ प्रसूती केल्या आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थींचे या मध्ये लाभार्थ्यांचा आर्थिक फायदा झाला आहे.  या व्यतिर...

पतसंस्था सचिवावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरूंदवाड पोलीस स्टेशनला दिले मिवेदन.

इमेज
कुरुंदवाड प्रतिनिधी - रमेशकुमार मिठारे.ता.23 कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील आदर्श पतसंस्था बुबनाळ या संस्थेचे सचिव- शेखर चंदूरे यांच्यावर १० ऑगस्ट २०२३ रोजी कर्जदाराच्या मुलाने अचानकपणे रात्री घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.हल्ला करणारी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असून चंदूरे कुटुंबीयांना दमदाटी व विळा कोयता घेऊन जीवंत सोडणार नाही असा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.असा घृणास्पद प्रकारचा पुन्हा उद्रेक होऊ नये याकरिता हल्ला करणार्या व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पतसंस्था सचिवास कायदेशीर संरक्षण मिळावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुंबई, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था कर्मचारी संघटना, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन व शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे वतीने कुरूंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणिस यांच्याकडे देण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक- फडणिस यांनी संबंधित हल्ला करणार्या व्यक्तीची चौकशी करून कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करण्याचे ग्वाही दिले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडण...