पोस्ट्स

सामाजिक बांधिलकी वाढवावी--इंजि.बी.एस.कोलते.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलूत अभियंता दिनानिमित्त अभियं त्यांचा कार्य गौरव. श्रीराम कंस्ट्रक्शनचा उपक्रम. सेलू : समाज व देशा च्या सांस्कृतिक व भौतिक विकासात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, आधु निक काळातील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन काम करण्यासाठी  सामाजि क बांधिलकी वाढवावी असे आवाहन इंजि. भास्करराव कोलते यांनी केले. येथील श्रीराम कंस्ट्रक्शन व स्टोन क्रशरच्या वतीने अभियंता दिन व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त १५ सप्टेंबर रविवार रोजी कुपटा येथे आयोजित  सत्कार समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सां.बा. विभागा चे उपअभियंता बळीराम माने, इंजि. सतिश बलदवा, इंजि. दिपक कुपटेकर, इंजि. संग्राम सोनी, शामराव मते माजी बांधकाम सभापती, ज्ञानेश्वर राऊत संचालक कृषी उत्पन बाजार समिती, इंजी. पृथ्वीराज भांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियंता दिना निमित्त श्रीराम कंस्ट्र क्शनच्या वतीने सेलू- जिंतूर तालुक्यातील सर्व अभियंत्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वे...

इंगळी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
इंगळी ता चिक्कोडी येथील कर्जबाजारी शेतकरी सचिन राजू पाटील (वय ३२) या शेतकऱ्याने  जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली गावातील विविध आर्थिक सहकारी संस्थेमधुन शेतीसाठी 8 ते 10 लाख रुपयांचा कर्ज  घेऊन आपल्या वडीलार्जीत जमीन कसत होता मात्र अलीकडे कृष्णा नदीला आलेल्या महापुरात संपूर्ण शेती उध्वस्त झाल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवेचनातून सचिन पाटील यांनी आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्यांची पत्नी राणी पाटील यांनी अंकली पोलीस स्थानकात दिली आहे अंकली पोलीस स्थानकाचे फोजदार व पोलिस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून पुढील तपास चालू ठेवला आहे सचिन पाटील यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ व दोन मुले आहेत.

प्रसिद्ध अभिनेते श्री विकास वायाळ यांचा काळभैरवनाथ पतसंस्थेमार्फत सत्कार करण्यात आला

इमेज
पुणे प्रतिनिधी संतोष लांडे  अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना ( आमदार बच्चू कडू साहेब )   मुंबई प्रदेश अध्यक्ष व दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते श्री विकास वायाळ यांचा काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष उद्योजक बिल्डर श्री भरत शेठ तुकाराम भोर व काळभैरवनाथ नगरी अवसरी गावचे माजी सभापती व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय श्री आनंद शिंदे  यांच्यावतीने कालभैरवनाथ पतसंस्थेच्या  33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  सानपाडा नवी मुंबई येथे सत्कार करण्यात आला  श्री विकास वायाळ सदर पतसंस्थेचे माजी संचालक आहेत तसेच ते माहिती अधिकार पत्रकार व पोलीस मित्र फाउंडेशनचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष आहेत व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांचे सदस्य आहेत त्यांनी अनेक मालिका चित्रपट जाहिरात व नाटकात सह कलाकार  म्हणून अनेक विविध उत्कृष्ट भूमिका साकार केल्या आहेत . तसेच ते डान्सर सिंगर अँकर रायटर डिरेक्टर म्हणून  काम करत  आहेत.

किसान पीकेपीएसला ७.८५ लाखांचा नफापुंडलिक खोत : संघाची २८ वी वार्षिक सभा

इमेज
मलिकवाड, ता. १५ : गेल्या २८ वर्षांच्या कालकिर्दीत लोकांचा विश्वास संपादन करत यंदा किसान प्राथमिक कृषी सहकारी संघाला ७.८५ लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक खोत यांनी दिली. ते संघाच्या २८ व्या वार्षिक सभेत बोलत होते. मुख्य कार्यनिर्वाहक संभाजी माने म्हणाले, संघाचे सभासद ९०५, शेअर भांडवल ४५ लाख ६३ हजार, निधी ६३ लाख ६९ हजार, ठेवी ७ कोटी ९९ लाख ११ हजार, गुंतवणूक ५९ लाख ८४ हजार, शिल्लक ८ लाख ४२ हजार, कर्जवितरण ९ कोटी ७४ लाख ७० हजार, सभासदांना ९ टक्के लाभांश दिला जाणार आहे. ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्षा सिंधुताई पाटील, संचालक कुमार बाकळे, निवास करजगे, सावकर कुडचे, प्रकाश कोळी, बाबासो कोळी, आप्पासो संकपाळ, कृष्ण शिंदे, गणपती वडगावे, प्रकाश इंगळे, शंकर मंगावे, रणजित देशपांडे, भीमा वडगावे, सर्जेराव पाटील, कृष्णा आंबी, दत्ता वडगावे, भीमराव नाईक, सी. एम. कुडचे, बशीर मुल्ला, के. के. देशपांडे, कृष्णा संकपाळ, अमन इंगळे, आप्पा करजगे, भारत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वनाथ पाटील यांनी ...

मलिकवाड रयत सौहार्दला १३ लाखांचा नफाअध्यक्ष भाऊसो कुडचे : १५ वी वार्षिक सभा

इमेज
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड. मलिकवाड, ता. १५ : येथील रयत क्रेडिट सौहार्द सहकारी संघाला यंदा १३ लाख ६ हजारांचा नफा झाला असून, सभासदांना २५ टक्के लाभांश दिला जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भाऊसो कुडचे यांनी दिली. ते संघाच्या १५ व्या वार्षिक सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक पुंडलिक खोत होते. विश्वनाथ पाटील यांनी स्वागत केले मुख्य व्यवस्थापक प्रशांत मठपती अहवाल वाचनात म्हणाले, संघाचे सभासद ७०३, शेअर भांडवल ७ लाख ३ हजार, राखीव व इतर निधी ७७ लाख १९ हजार, ठेवी ९ कोटी ६० लाख १३ हजार, कर्जवितरण ६ कोटी ८७ लाख २० हजार, बँक ठेव गुंतवणूक ३ कोटी ४० लाख २० हजार असून वडगोल, केरुर शाखा उत्तमरित्या कार्यरत आहेत. काशिनाथ कुडचे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. निलकंठ निडगुंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष बाळू पाटील, संचालक आप्पासो नाईक, आनंदा पाटील, सुभाष खोत, उमेश मठपती, प्रमोद टाकमारे, संजय कट्टीकर, कुमार जाधव, जयश्री पाटील, अश्विनी करजगे, संभाजी पाटील, शिवचंद एकुंडे, प्रवीण नोकरे, यलगौंडा पाटील, तोसिफ बेळकुडे, कुमार मांगतुरे, रावसाहेब धनवडे, ऐनूल मुल्ला, राजशेखर बाकळे, र...

डॉक्टर दिपाली कुलकर्णी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू येथील डॉक्टर दिपाली संतोष कुलकर्णी हिची हेडेल बर्ग युनिव्हर्सिटीजर्मनी येथे इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ या विषयावर स्नातकोत्तर शिक्षणासाठी निवड झाली असून ती रवाना झाली. या विषयासाठी संपूर्ण जगातून वीस जागा असून भारता मधून तिची निवड झाल्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेलू शहरातील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी व शिक्षक वसंतराव कुलकर्णी यांची ती नात आहे. भविष्यात WHO मध्ये सेवा व संशोधन करण्याचा तिचा उद्देश आहे.तिने मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी सुद्धा प्राप्त केली आहे.शिक्षण संभाजीनगर येथून केले आहे.

पूर्व जोगेश्वरीचा गणनायकाचे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात साजरा

इमेज
प्रतिनिधी किशोर गुडेकर मुंबई जोगेश्वरी पूर्व  मंगलमूर्ती गणरायाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन जनता कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ६६ व्या वर्षात  पदार्पण  करताना अत्यानंद होत आहे. हा आनंद जरी आम्ही साजरा करीत असलो तरी हा आनंद पूर्व जोगेश्वरीतील तमाम जनतेचा आहे. ज्यांनी या मंडळावर प्रेमाची सावली ठेवून व यथाशक्ती सहकार्य करून हे महान  कार्य  वृद्धिगंत करण्याचे कार्य केले आहे. त्यामुळेच मंडळाला उज्वल परंपरा लाभली आहे. या पुढेही आपल्या आशिर्वादांच्या  विश्वासावर आमची वाटचाल सुरूच राहणार आहे.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला पाहिजे या चळवळीतून मंडळाची स्थापना झाली. त्या चळवळीतून प्रेरणा घेवून  लहान थोर कार्यकर्त्यांनी हा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सेवेचा वसा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जपला आहे. गेल्या ६५ वर्षातील मंडळाच्या कार्याचा विस्तार पाहता इवल्याशा रोपाचे वटवृक्षातील रूपांतरात आपण तन,मन, धन अर्पण करून सहकार्य केलेले आहे.  आबालवृद...

कुरूंदवाड शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद.

इमेज
कुरूंदवाड प्रतिनिधी - कुरूंदवाड शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे त्यांच्यावर हल्ला करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत शिवाय आठ दिवसात म्हशीच्या गोठ्यात शिरून दोन रेडकांना त्यांनी ठार मारल्याने शहरातील नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून होत आहे.    कुरुंदवाड येते भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात झाल्याने आठ दिवसापूर्वी बाळू देवकाते यांची 1 वर्षाची रेडी कुत्र्याने फाडून ठार केली तसेच शनिवारी सकाळी चेतन माळी व तुषार पट्टेकरी यांच्या प्रत्येकी एक रेडी गोट्यामध्ये शिरून हल्ला करत त्यांना ठार केल्याने जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे भटक्या कुत्र्यांचा वावर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे.   लहान मुलांना चावणे त्यांच्या अंगावर हल्ला करणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत मोठ्या माणसांच्या ही अंगावर धावून जाण्याच्या घटनाही घडत आहेत रिंग रोड आदर्श नगर जिजाऊ नगर यशस्वी नगर या उपनगरातून असे प्रकार घडत आहेत वारंवार तक्रार करून ही नगरपालिका प्रशासन ...

महाआरोग्य शिबिर लाटेत मोठ्या उत्साहात संपन्न. हजारो नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

इमेज
अब्दुललाट प्रतिनिधी - जागृती युवक संघटना, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लाटेत महा-आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर  * गुरुकुल स्कूलच्या आवारात * मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. जागृती युवक संघटनेचे * मा. रोहन ठिकणे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ क्षमा ठिकणे यांच्या संकल्पनेतून * या शिबिराचे आयोजन केले गेले होते. या दोघांचा व मंडळातील कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. महाआरोग्य शिबिरात जिल्ह्यातील * पायोस हॉस्पिटल, जे जे मगदूम हॉस्पिटल, स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दीप सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सी पी आर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अ.लाट * या दवाखान्यांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी, औषधी, इसीजी व कन्सल्टिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या. * शिबिरात न्यूरो सर्जन, मेडिसिन, ऑर्थोपेडिक, नेत्रतज्ञ, कान नाक घसा तज्ञ, हृदयरोग तज्ञ व जनरल सर्जन * अशा प्रकारचे विविध तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते. शिबिराचे उद्घाटन * लोकप्रिय खासदार मा. धै...

अभियंतांमध्ये बलशाली आधुनिक भारत निर्माण करण्याची क्षमता : के एम भोसले, न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरमध्ये अभियंता दिन साजरा

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : देशाच्या यशस्वी प्रगतीसाठी अनेकांचे योगदान कारणीभूत ठरत आहे तसेच देशातील सर्वच अभियंतांमध्ये बलशाली आणि आधुनिक भारत निर्माण करण्याची क्षमता आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी केले  मौजे आगर (ता शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात रोटरी क्लब ऑफ हेरिटज सिटी शिरोळ व विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने अभियंतादिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ सौ निता माने माने केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ अभिजीत माने  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या शिक्षिका सौ जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रस्तावित केले  अभियंता दिनाचे औचित्य साधत शिरोळ व मौजे आगर येथील अभियंता नितीन शेट्टी लक्ष्मण भोसले गजानन पाटील विक्रमसिंह भोसले कुशल पाटील वैभव माने स्वप्निल ढेरे सत्यजित...

भादोले येथे भव्य रक्तदान शिबिर

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे इस्लाम धर्माचे प्रेषित(धर्मगुरू) मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पेठ वडगाव येथील भादोले या गावातील समस्त मुस्लिम समाजातर्फे सोमवार दिनांक १६/०९/२०२४ रोजी सकाळी ९ पासून सायंकाळी ४ वाजे पर्यंत मारुती चौक येथील जामा मस्जिद या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण समाजाचे काही तरी देणे लागते आणि आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी चांगले होईल या विचाराने पंचक्रोशितील युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन भादोले येथील मुस्लिम समाजातर्फे करण्यात आले आहे.

नागपूर येथील दिंघोरी सर्वश्री नगर बाल गणेश मंडळाला हुडकेश्वर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली भेट.

इमेज
नागपूर येथील दिंघोरी सर्वश्री नगर बाल गणेश मंडळाला आदरणिय हुडकेश्वर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांन वेळात ला वेळ काढून मडळाला भेट दिली. आणि लहान मुलाना बशिष वितरण करण्यात आले आणि कलकत्त्यात जी महीलानवर जी घटणा झाली त्या वर एक नाटकाच सादरीकरण करण्यात आले महीलानवर अत्याचार होतात आणि समाजामध्ये वाईट वृतीचे लोक आहे त्यावर आडा बसावा म्हणून ते नाटक लोकान समोर सादर करण्यात आले आणि भेदोडकर साहेवानी महीलानवर अत्याचार संदर्भात खुप सुंदर माहिती लाहान मुली आणि महिलाना खुप माहीती सादर केली आणि मंडळातर्फे आदणिय भेदोडकर साहेबाचा सत्कार करण्यात आला सत्कार पञकार सतिश कडूनी केला मंडळाचे कार्यकर्ते निंबाळकर आषिश हर्षल पुड समय पवन गौर गौर मैडम कडु मैडम सर्व मंडळाचे कार्यकरते उपस्थित होते.

जिंतूर मध्ये 1 हजार 430 मुस्लिम बांधवांचे रक्तदान.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. जिंतूर :दि.14 मिला दुन्नबी निमित्त शहरा तील जामा मस्जिद प्रांगणात सकल मुस्लि म समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.13) महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 1 हजार 430 महिला, तरुणांनी रक्तदान करुन शिबीरा स जोरदार प्रतिसाद दिला.इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंम्बर यांचा या महिन्यात जन्म असून त्याचे औचित्य साधत सकल मुस्लिम समाजा तील तरुणांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  रक्तपेढीचे कर्मचारी कमी अस ल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त झाल्याने शिबिर सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरु होते. या शिबीरात एकूण 1 हजार 430 तरुणांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांमध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लक्षणीय असून जवळपास 150  महिलांनी रक्तदान केले.  विशेष म्हणजे या शिबिरात माजी आमदार विजय भांब ळे,पृथ्वीराज भांबळे, गणेशराव काजळे, अ‍ॅड. मनोज सारडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला.रक्त संक लित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णा लयातील रक्तपेढी, जिंतूर ग्रामीण रुग्णा लय, बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्म...

रायबाग येथील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयाच्या आवारात अध्यापन कक्षाच्या बांधकामाचे उद्घाटन

इमेज
रायबाग : शहरातील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून उच्च दर्जाचे करण्यात येत आहे, असे आमदार डी.एम.  ऐहोळे म्हणाले.  शनिवारी शहरातील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयाला विशेष अनुदान म्हणून कर्नाटक गृह मंडळाने 75 लाख मंजूर केले.  त्यांनी 3 अध्यापन खोल्यांचे बांधकाम खर्चात सुरू करून ठेकेदाराने दर्जेदार काम करावे, अशी सूचना केली.  यावेळी प्राचार्य डॉ.अरुण कांबळे, अण्णासाहेब खेमलापुरे, सदाशिव घोरपडे, सदानंद हळिंगळी, संगण्णा दत्तवडे, दत्ता जाधव, सुरेश माळी, जियाउल्ला मुल्ला, महेश करमाडी, महेश कुलगुडे, भारती लोहार, मुरुगेश माळी, रितेश आवळे, प्रेमा साने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

एकसंबाचे नूतन नगराध्यक्ष सुनील सप्तसागर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य विजय खोत यांच्या हस्ते सत्कार

इमेज
 एकसंबा नगराध्यक्षपदी सुनील सप्तसागर बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य व महालक्ष्मी पि.के. पी एस. चे अध्यक्ष विजय खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यादनवाडी तालुका चिकोडी येथील एकसंबा नगराध्यक्षपदी सुनील सप्तसागर यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य व महालक्ष्मी पि .के. पी. एस. चे अध्यक्ष विजय खोत यांच्या फार्म हाऊस व त्यांचे फॅमिली व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात  आले. यावेळी राजू अण्णा कराले, अण्णा गीड्ड, संजित देसाई, रवी माळी, अरुण मगदूम, सदस्य अंकुश खोत, ज्योती सात्वर् ,रवी खोत. स्वागत व परिचय भाषण रमेश शिंदे सर, यांनी केले. यादनवाडी चे सर्व वडीलदारी व युवक ग्रामस्त हजर होते. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने एकसंबा.

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

इमेज
मुंबई, दि. १४  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, ...

RK नगर विद्या मंदीर विद्यार्थ्यांकडून लेझीम खेळाची प्रात्यक्षिक सादर.

इमेज
अकिवाट प्रतिनिधी - सचिन मठपती. मजरेवाडी ता. शिरोळ येथील R K नगर विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी इयत्ता 1 ली ते 4 थी या वर्गातील विद्यार्थी खुप छान लेझिम खेळाचे प्रत्याशिके दाखविले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना प्रणित शिव माथाडि कामगार सेना जिल्हा प्रमुख कृष्णात भेंडे यांच्या कडुन सिलिंग फँन भेट देण्यात आले.व मंडळा कडून लहान मुलांना खाऊ व शालेय साहित्य देण्यात आले.सवगावे सर खुप छान आपले कार्य आहे.माळ भाग R K नगर भागातील सर्व मंडळांचे नागरिकांच्या  कडून शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे कौतूक होत आहे. 

लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळाचा घाला.

इमेज
लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. अवैध उत्खनन केलेल्या खाणीत गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्याने बापलेकाचा बुडून मृत्यू झाला. बेडसे (ता. मावळ) येथे घरघुती गणपती विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (दि. १२) रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.  संजय धोंडू शिर्के व आदित्य संजय शिर्के (वय २१, रा. बेडसे, ता. मावळ) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत. वन्यजीव रक्षक व आपदा मित्र मावळ या रेस्क्यू टीमच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सर्वत्र लाडक्या बाप्पाला भक्तिभावात निरोप देत असताना बेडसे (ता. मावळ) गावात गणपती बुडवताना घडलेल्या दुर्घटनेने ऐन उत्सवात गावावर शोककळा पसरली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत घराजवळील अवैध उत्खननात साचलेल्या पाण्यात घरातील गणपती बुडवण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वत्र हर्षाचे वातावरण असताना या दुर्घटनेने मात्र शिर्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गणपती बुडवण्यासाठी...

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थितीत 15 सप्टेंबर रोजी साजरा होणार अभियंता दिन

इमेज
नागपूर,दि. 13 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सर्वश्री सदाशिवराव साळुंखे, संजय दशपुते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सचिव सतीश कोळीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, विकास रामगुडे, अधीक्षक अभियंता जनार्दन भानूसे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव या समारंभात केला जाणार आहे.

शासकीय कार्यालयात तोडफोड प्रकरणी एकास अटक...

इमेज
खोतवाडी तालुका हातकणंगले  येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रिंटर व प्लॅस्टिक खुर्च्यांची तोडफोड प्रकरणी स्वप्निल उर्फ बबन एकनाथ खोत यांचे विरोधात ग्रामपंचायत लिपिक नानासो कांबळे यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल उर्फ एकनाथ खोत त्यांना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की खोतवाडी येथील वार्ड नंबर एक गट नंबर 144 मध्ये एक विहीर असून त्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीकडून गावातील घनकचरा व मुरूम टाकून ती विहीर मुजवण्याचे काम चालू होते परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यामुळे सदरच्या विहिरीत पाणी साठल्यामुळे व घनकचरा असल्यामुळे सदरच्या विहिरीतील पाण्याची दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वप्नील उर्फ बबन खोत यांनी ग्रामपंचायत खोतवाडी येथे जाऊन सदरच्या कामाबाबत विचारणा केली असता व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दमदाटी करून ग्रामसेवक कोठे आहे तुम्ही ग्रामसेवक आल्यानंतर या असे म्हणून ग्रामपंचायत लिपिक यांना दमदाटी करत टेबलवरील प्रिंटर व दोन खुर्च्या बाहेर घेऊन येत असताना ग्रामपंचायत शिपाई यांनी अडवणूक केलेले असताना देखील ग्रामपंचायतच्या बाहेरील आ...

एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल मध्ये अत्याधुनिक रोबोटिक जिनियस हबचे भव्य उद्घाटन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :  दि १३ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्या तील नामांकित शाळां पैकी एक असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल मध्ये आज रोबोटीक जिनिय स हबचे भव्य उद्‌घाटन हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात आला. हा कार्यक्रम शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी एक नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे. कार्यक्र माचे उद्घाटन डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, शासकीय मेडिकल कॉलेज परभ णी यांच्या हस्ते कर ण्यात आले. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे डॉ. सदानंद मोरे, मेडिकल सुपरी टेंड, महिला हॉस्पिटल, परभणी, डॉ. गणेश पारवे, डॉ. ऋतुराज साडेगावकर,डॉ.अपूर्वा रोडगे-पारवे,मिलिंद पवार, सतीश करवा, वीरू पौळ, मगर, काकडे, प्रा. महादेव साबळे,प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा.  प्रगती क्षीरसागर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी ही रोबोटीक लॅब तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची संधी ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांच्या मा...

मोफत रक्त तपासणी शिबीरात 107 नागरीकांची रक्त तपासणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. या स्तुत्य उपक्रमास नागरीकांचा उस्फूर्त प्रतीसाद. सेलू : समता गणेश मंडळ व महा लॅब उपजिल्हा रूग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत भव्य रक्त तपासणी शिबीर संपन्न  दि 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी मोफत रक्त तपासणी शिबीरात 107 जणांची रक्त तपासणी करण्यात आली. या मध्ये  सी,बी,सी, के,एफ टी,एल,एफ टी,टी एफ ,टी,एच ,बी एच,1 सी,लिपीड प्रोफाईल, सि,ए 125 , युवरीक अॅसीड, सीरम कॅल्शियम, सी,आर पी, एकुण 13  रक्त तपासण्या करण्यात आल्या, महा लॅब चे चैतन्य निकम,रंजना शेळके, अनूज डख, ओम भाबट यांनी रक्त तपासणी केली असून या शिबीरात मा.बांध काम सभापती अशोक काकडे, पांडूरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, सचिनधापसे,अनिकेत शिंदे,सचिन चव्हाण, राहुल कदम,राजकुमार वखरे,गोविंद आबुज, वैभव वरकड,किरण ठाकरे,बालाजीआबुज,स्वप्नील शहाणे,प्रकाश मुसळे, आदि उपस्थित होते.

चिंचली, कंकणवाडी आणि कब्बूर नगरपंचायतीतील लोकांना पिण्याच्या पाण्याची सतत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत 2.0 प्रकल्पांतर्गत काम सुरू.

इमेज
रायबाग : आमदार डी.एम.ऐहोळे म्हणाले की, मतदारसंघातील चिंचली, कंकणवाडी आणि कब्बूर नगरपंचायतीतील लोकांना पिण्याच्या पाण्याची सतत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत 2.0 प्रकल्पांतर्गत काम सुरू आहे.  बुधवारी त्यांनी तालुक्यातील चिंचली शहरात कर्नाटक नागरी पाणी पुरवठा व मलनिस्सारण ​​मंडळातर्फे अमृता २.० प्रकल्पांतर्गत शहरासाठी पिण्याच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.  तहसीलदार सुरेश मुंजे, प.प.मुख्याधिकारी व्यंकटेश बेल्लारी, एईई उमेश शिगीहल्ली, एईई राजू हीरेमठ, अंकुश जाधव, सदाशिव घोरपडे, अण्णासाहेब खेमलापूरे, सुभाष कोरे, नवीन पाटेकर, फेरोज मकानदर, राजू पोळ, अजित कुमार तरागर, अजित कुमार ता. लक्ष्मण तुलसीगेरी, मल्लेश कामते, बाळू नंदानी, सोमशेखर जोरे व इतर पीपीएम सदस्य उपस्थित होते.

सेलूत संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर सुंदर देखाव्याचे सादरीकरण.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :सेलू येथील अरुण रामपूरकर   दरवर्षी गौराई समोर समाज प्रबोधनपर देखावा सादर करत असतात.यावर्षी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर देखा व्याचे सादरीकरण केले आहे. पर्यावरण रक्षण, भूतदया, समाजातील अनिष्ट रूढींवर संत तुकाराम महाराज यांनी आप ल्या अभंगाद्वारे केलेले समाज प्रबोधन, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट,संत तुकारा म महाराज यांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज,पालखी सोहळ्यातील रिंगण, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन या सर्व बाबींचा अंतर्भाव करत सजीव देखावा अरुण रामपूरकर यांनी साकारला आहे. देखा वा बघण्यासाठी फूलारी गल्लीतील त्यांच्या घरी झुबंड उडाली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात साडी खरेदी करताना महिला कर्मचारी यांचा फोटो वायरल ... जिल्हाधिकारी यांचे कार्यालय बनले व्यवसायाचा अड्डा....

इमेज
पुणे : जिल्हा अधिकारी कार्यालयात कार्यलयीन कामकाजा व्यतीरिक्त चक्क कार्यलयातच स्वतःला खरेदी करण्याचा अजब गजब शाॅपींग चालत आहे.                     ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता शासकिय योजनेची माहीती घेण्यासाठी कार्यालयात नागरीक गेले असता चक्क कार्यालयात साडी विक्रेता आणून खरेदी करताना जिल्हाधिकारी कार्यालयात A विंग चौथा मजला संजय गांधी योजना कार्यालयात साडी खरेदी / शाॅपींग करताना महिला कर्मचारी मग्न होत्या. साडीचा कलर, किंमत करण्यात इतक्या दंग होत्या कि आपण शासनाचे कर्मचारी आहोत हे विसरल्या....          नागरिक माहिती घेत असताना तेथील महिला कर्मचारी नागरिकांकडे दुर्लक्ष करून शासकीय कार्यालयात शासकीय वेळेत चक्क शाॅपींग करत होते. त्यावेळी संजय गांधी योजनेच्या तहसीलदार रजेवर असताना त्यांच्या परस्पर कर्मचारी शासनाचा पगार घेऊन असा प्रकार होणे म्हणजे एक प्रकारे कार्यालयाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार चालला होता. असे नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वार्ताहर यांना माहिती दिली.      ...

पट्टण कोडोली मधील शाहु पार्क बेघर वसाहती मध्ये पहिल्यांदा गणपती मुर्ती प्रतिष्ठापना

इमेज
पट्टण कोडोली, प्रतिनिधी -   मौजे पट्टण कोडोली येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज पार्क बेघर वसाहतीमध्ये पहिल्यांदाच नवीन मंडळ स्थापन करून गणपतीची  मोठी मुर्ती  बसवण्यात आली आहे MIDC रोड कॅनॉल ब्रीज येथे बेघर वस्ती आहे लाईट आणि पाण्याची सोय झाल्यामुळे अनेक गावातील लोक आपल्या प्लॉट वर घरे बांधुन राहत आहेत मागच्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी भरपुर घरे झाली आहेत       अश्यातच सर्व कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन ह्या वर्षी गणपती मुर्ती बसवली आहे त्यामूळे बेघर वसाहती मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे त्या मुळे अजु बाजूचे सर्व लोक ह्या मध्ये उत्साहाने भाग घेत आहेत तसेच महीला वर्ग गौरी ची गाणी म्हणण्याचा कार्यक्रम देखील होत आहे ज्या ओसाड माळावर कधी काळी चिट पाखरू देखील फिरत न्हवते तिथे आज मात्र नंदनवन फुलले आहे त्या मुळे सर्व कुटुंबातील लोक आरती साठी व इतर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थितीत राहत आहेत व लहानांपासून ते मोठ्या पर्यन्त सर्वजण मंडळा मध्ये सहभागी होत आहेत आणि पहिल्यांदाच महाप्रसाद चे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे त्या साठी सर्वांनी देणगी व ध...

"लाडकी बहिण' सारखे मानधनाची विमा सुरक्षा कवच पत्रकारांनाही द्या !

इमेज
ऑल इंडिया संपादक संघाचे राज्यपालांना निवेदन छरुपती संभाजीनगर (प्रतिनिधी)  पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्र‌कार शासकीय योजनांची माहितीजनतेपर्यंत पोहचवतो. जनतेवर झालेल्या अन्यायाल वाचा फोडतो. अशा या संघर्ष  प्रिय पत्र‌कारांना योग्य आर्थिक संरक्षण, मनधान, विमा सुरक्षा कवच शासनात‌र्फे देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मंगळवारी  करण्यात आली. राज्यपाल महोदय छत्रपती   संभाजीनगर येथे आलेले असताना ऑल इंडिया संपादक संघाने त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले, निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोर्डे, शहर अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हा सचिव रवी बनकर, ऍड,संतोष मिमरोट यांच्या निवेदनावर सह्या आहेत

लाडक्या बाप्पासाठी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर , दिग्गज गायक सुदेश भोसले आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया घेऊन आले आहेत "बाप्पाचा बोलबाला"

इमेज
प्रतिनिधी संतोष लांडे  दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना फार आनंद देतात. पण मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात "बाप्पाचा बोलबाला" हे गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार सुद्धा आहे. "बाप्पाचा बोलबाला" हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. पॉवर पॅक्ड आणि एनर्जी ने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर हे आहेत. दिग्गज गायक सुदेश भोसले ह्यांनी सुद्धा ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सुदेश भोसले ह्यांनी आपल्या आवाजाने आजवर गणेश उत्सवाची शान वाढवली आहे. इतकच नव्हे तर प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया पहिल्यांदाच सिंगर म्हणून या विडिओ द्वारे पदार्पण करत आहे. आरजे अर्चनाला स्वतः विश्वास बसत नव्हता कि त्यांना ही सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यांचं म्हणणं आहे कि "गणपती बाप्पा ने मला दुसऱ्यांदा  संगीतकार स्वरूप भालवणकर ह्यांच्या मुळे निवडला आहे."  बॉलीवूड गीतकार कुमार यांनी या गाण्याचे बोल अगदी अप्रतिमपणे लिहिले आहे. युनिव्हर्स व्हायब्रंट आणि मोरया क्रिएशन्सद्वारे हे गाणं रिलीझ केलं गेलं आहे. ...

एकसंबा नगराध्यक्षपदी सुनील सप्तसागर,तर उपनगराध्यक्षपदी सुजाता चितळे : आमदार प्रकाश हुक्केरींकडून अभिनंदन

इमेज
फोटो एकसंबा :- नगराध्यक्ष सुनील सप्तसागर व उपनगराध्यक्ष सुजाता चितळे यांचे अभिनंदन करताना आमदार प्रकाश हुक्केरी व नगरसेवक.  एकसंबा प्रतिनिधी - अमर माने अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एकसंबा नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत नगराध्यक्षपदी सुनील विश्वनाथ सप्तसागर यांची तर उपनगराध्यक्षपदी सुजाता विनोद चितळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.           एकसंबा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपद सामान्य वर्गासाठी तर उपनगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. मंगळवारी सकाळी नगराध्यक्षपदासाठी व उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही जागांवर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर निवडणूक अधिकारी सी. ए .कुलकर्णी यांनी नगराध्यक्ष सुनिल सप्तसागर व उपनगराध्यक्षा सुजाता चितळे यांचा सत्कार केला. यावेळी सर्व नगरसेवकांकडूनही नूतन नगर...

संभाजीनगर ABS बाँईज मित्र मंडळची गणेश उत्सव मिरवणूक आगळी आणि वेगळी होणार.?

इमेज
अकिवाट प्रतिनिधी - सचिन मठपती  जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ या मंडळाची चर्चा गेली 20 वर्षे जयसिंगपूर शहरातच नाही तर शिरोळ तालुक्यात आहे. गणेश उत्सव मध्दे सामाजिक काम असो किंवा विसर्जन मिरवणुक असो ते फक्त संभाजीनगर ABS बाँइज मित्र मंडळचे नाव प्रसिध्द आणि नाव लौकिक आहे. ही 20 वर्षाची अखंडीत परंपरा चालू आहे. या वर्षी 2024 ची मिरवणूक सुध्दा तरुणांना नाचवणारी आहे. रशियन डि जे होलीस च्या वाद्याने धुम धडाक्याने वाजणार ही मिरवणूक लांब लचक कंटेनर वर, अधुनिक लाईट सिस्टीम, अधुनिक साऊंड सिस्टम असणार आणि DJ आँपरेटर वाजवणारी सुध्दा रशियन लेडी असणार आहे. रशियातून येवून महाराष्ट पध्दतीने नऊवारी साडी घालून , कोल्हापूरी फेटा घालून या पोशाखा मध्दे असणार आहे. रशियातून येवून महाराष्ट पध्दतीने होणार आणी महाराष्ट गाजणार , म्हणूनच दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि संभाजीनगर ABS बाँईज मित्र मंडळची गणेश उत्सव मिरवणूक आगळी आणि वेगळी होणार आहे. संभाजीनगर ABS बाँईज मित्र मंडळाचे अध्यक्ष अक्षय हडपद, उपाध्यक्ष सूरज आवळे, खजिनदार अभिषेक भंडारे , कार्याअध्यक्ष श्रावण काळ...

एकसंबा, मलिकवाडला गौरीचे थाटात आगमन

इमेज
प्रतिनिधी - अमर माने मलिकवाड, मलिकवाड, येथील एकसंबा, मलिकवाडसह, परिसरात पारंपरिक पद्धतीने महिलांकडून गौरीचे आगमन करून घरी आणण्यात आले.गेले दोन दिवसापासून परिसरातील महिलांनी चाफा, गोवर, हळदीचे पाणी, शंकरोबा,  दुर्वा, आगाडा मक्याचे तुरे यासह, गौरीसाठी लागणारे विविध साहित्याची जुळवाजुळवीच्या तयारी सुरु होते. मंगळवारी  सकाळी प्रत्येक गल्लोगल्ली महिला एकत्रित जमून गोवर भरणीच्या कामात गुंतले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता गौरीची गाणी गात गवापासून जवळ असलेल्या बोरवेल, विहिरी याठिकाणी जाऊन गौरीची पूजन करण्यात आले. यावेळी बाल चिमुकले विविध रंगीबेरंगी साड्या नेसून लुडबुड करताना दिसत होते. सायंकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य गौरी गणपतीला दाखवण्यात आले. रात्री सार्वजनिक गणेश मंडळा ठिकाणी झिम्मा फुगडी, घागर फुंकणे, गौरीची विविध गाणी गात फुगडीचा खेळ खेळण्यात आला. 

बिबट्यांनी घातला आहे मुळशी मालेगावात धुमांकुळ - शेतकरी नितीन आप्पा भामे

इमेज
मुळशी - गाव माळेगांव तालुका मुळशी पुणे सकाळी पहाटेच्या वेळेस आम्ही जनावरे रानामध्ये सोडल्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर ना संध्याकाळी परत आम्ही गुरे आणण्यासाठी घरी रानात गेल्यावर आम्हाला निदर्शनास आले की आमच्या गाई वरती हल्ला झालेला आहे ती साधारणतः एक अडीच ते तीन वर्षाची गाय आहे मग आम्ही तात्काळ आमचे गावचे उपसरपंच रवींद्र कडू यांना आम्ही कळवले कळवल्यानंतर ना त्यांनी घटनेची पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाईच्या आश्वासन दिल... गावातील वातावरण अतिशय भीतीदायक झालेले आहे कधी कुटून येईल बिबट्या सांगता येत नाही आज आमच्या गुरांवर हल्ला होताना आम्ही पाहत आहोत पण उद्या ग्रामस्थांवर ही  हल्ला होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.. याच्या अगोदर सुद्धा एक ते दोन कुत्र्यांवरती हल्ला करून वाघाने त्यांना खाल्लेला आहे असे मत शेतकरी नितीन आप्पा भामें यांनी व्यक्त केले आहे तरी यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे...

जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास!पूर्ण कर बाप्पा आता तुझ्या भक्तांची आस!!

इमेज
वडगाव धायरी - शिवसेनेचे मां.नगरसेवक व राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक मां. हरिश्चंद्र आण्णा दांगट पाटील यांच्या आग्रहखातर त्यांनी स्थापन केलेल्या शिवशक्ती मित्र मंडळाच्या अनावरण सोहळ्यानिमित्त मंडळाची आरती व मां. नगरसेवकांच्या घरची आरती करण्याचा योग डॉ. गणेश विठ्ठल राऊत ( शिवबां छावा ) महा. प्रदेश प्रवक्ते अखिल भारतीय छावा संघटना यांना आला... माणसातला माणूस भलेही थकला असला तरी आज ही आण्णा जाणीव विसलेले नाहीत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली या आरतीच्या वेळी त्यांच्या सौभाग्यवती सौ. अनीताताई दांगट, त्यांच्या मुली व आप्तेष्ट नातेवाईक तसेच आमचे मित्र सहिल सोनोने उपस्थित होते... गणेशाचरणी एकच मागणं आहे सुखी ठेव सर्व भक्तांना...

मलिकवाड येथे बुद्धीबळ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण.

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी - अमर माने. मलिकवाड येथील सरकार विजयगड सरकार शहीद भगतसिंग विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेशोत्सवानिमित बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी लहान गटात १० तर मोठा गटात ११ असे एकूण २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. राहुल देशपांडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिबळ स्पर्धेला सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात • आला. यासाठी प्रकाशराव देशपांडे, - संजय ठोंबरे, आसिफ मुल्ला यांनी बक्षिसाची रोख रक्कम दिली आहे. लहान गट स्पर्धेतील विजेते प्रथम आकाश नाईकवाडे असे (रा. गळतगावाडी) द्वितीय तन्मय टाकळे (रा. कारदंगा) तृतीय शौर्य पाटील याने क्रमांक पटकावला. प्रोत्साहनार्थ श्रुती कुन्नुरे, उत्तेजनार्थ वेदांत पाटील मोठा गट स्पर्धेतील विजेते असे प्रथम अभिजीत पाटील, द्वितीय मंजुनाथ कुंभार, तृतीय महेश फडतरे (रा.नणदी) प्रोत्साहनार्थ श्रेया नाईकवाडे, उत्तेजनार्थ अनिकेत पाटील या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला आहे. यावेळी युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इंदापुरात बॉम्ब सापडले पण एक-दोन नव्हे तर तब्बल ९ ...!

इमेज
इंदापुरात बॉम्ब सापडले पण एक-दोन नव्हे तर तब्बल ९ ...!  वालचंदनगर पोलिसांनी वेळीच केला गेम, आरोपींच्या आवळल्या मुसक्या. वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणेशोत्सव व ईद.ए मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे,

("जुन्नर तालुका येथील ("अलकनंदा हांडे") यांच्या घरातील "गणपती" चे हे सुंदर मनमोहक रूप!🙏🏻🥰💐

इमेज
("जुन्नर तालुका येथील ("अलकनंदा हांडे") यांच्या घरातील "गणपती" चे हे सुंदर मनमोहक रूप!🙏🏻🥰💐

खुन्याच्या गुन्ह्य़ात वापरलेले हत्यारसह एक आरोपी पकडण्यात हुपरी पोलीस यांना यश..

इमेज
हुपरी पोलीस यांनी ऋषिकेश दिवाण (रा.अंबाईनगर रेंदाळ) व आर्यन घुणके ( खुन्ह्यातील आरोपी)(रा.मानेनगर रेंदाळ)यांना खुन्ह्यातील वापरलेले हत्यार धार व दात्रे असलेला कोयता संगनमताने लपवुन ठेवल्याप्रकरणी आज सकाळी 10:30 वाजता ऋषिकेश याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर 260/2024 महाराष्ट्र पोलीस का.क 37(1)सह 135तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन याची फिर्याद पोलीस.कॉ.संदेश शेटे यांनी दिली असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे,पोसई प्रसाद कोळपे,पोसई रावसाहेब हजारे पो.कॉ.भागंरे,काबंळे,शेटे,होमगार्ड परशुराम चोपडे,बाळासो मुधाळे

"गणेश दळवी" यांच्या घरातील "गणपती" चे हे सुंदर मनमोहक रूप!

इमेज
" कळवा तालुका अध्यक्ष माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य" चे "गणेश दळवी" यांच्या घरातील "गणपती" चे हे सुंदर मनमोहक रूप!

सातगाव पठारावरील बटाटे काढणीसाठी कामाला वेग

इमेज
प्रगतिशील शेतकरी सुभाष तुकाराम गावडे यांच्या शेतात बटाटा शेती चे काम चालू असुन ह्या वर्षी पाऊस चांगला झाल्या मुळे पठार भागा मध्ये शेतीचे काम जोरात सुरू असल्याचे बघायला मिळत आहे