पोस्ट्स

सामाजिक बांधीलकीमुळे मिळाले यश! :- मा. प्रतापराव जाधव

इमेज
हुपरी सागर पाटील. -  ‘हुपरीमध्ये ग्रामपंचायत पासून ते नगरपरिषदमध्ये एक सेवाभावी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले श्री. रामचंद्र मुधाळे हे निस्वार्थ स्वभावामुळे लोकप्रिय आहेत. त्यांनी दमदार आमदार मा. राजूबाबा आवळे यांच्या फंडातुन संत बाळुमामा मंदिरासाठी जी मदत लाभली ती मिळवून देण्यामध्ये कार्यालयीन तांत्रिक कागदोपत्री जी काय मेहनत रामचंद्र मुधाळे यांनी घेतली ती खुप महत्वाची आणि आदर्शवत आहे. एक जीवलग मित्र, सामाजिक भान असणारे व्यक्तीमत्व आणि हुपरी शहराच्या विकासासाठी तत्पर असणारे असे अधिकारी हुपरीला लाभावेत अशी आमची धारणा आहे. अशा कर्मचारी अधिकारी यांच्यामुळे अनेक विकासकामे तडीस नेता येतात. त्यांना त्यांच्या यशाबद्दल हुपरी शहर कॉंग्रेसतर्फे अनेक हार्दिक शुभेच्छा! ’, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे हुपरी शहराध्याक्ष मा. प्रतापराव जाधव यांनी केले. ते श्री. रामचंद्र मुधाळे यांची प्रशासक कर वसुली अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मानपत्र व पुष्षगुच्छ देवून हुपरी कॉंग्रेस तर्फे सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष मा. अनिल म्हातुगडे, शहर उपाध्यक्ष...

सिने अभिनेता सुरज जाधव खाकी... लय भारी मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार...

इमेज
कवि सरकार इंगळी  शेवगाव पांडुरंग गोरे - निर्माता लेखक दिग्दर्शक यांच्या   मुंबई येथून ब्लॉग... करणारे सिने अभिनेते सुरज जाधव यांची खाकी ...लय भारी या मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटांमध्ये त्यांचा महत्त्वाचा निगेटिव्ह रोल आहे ,या चित्रपटांमध्ये त्यांची खलनायक डेंजर( डिगंबर उर्फ टग्या...) भूमिका आपणास पाहायला मिळणार आहे  दिग्दर्शक पांडुरंग गोरे, गणेश मुंडे नागेश गोरे व निर्माता सतीश खाडिलकर कास्टिंग डायरेक्टर उद्धव पांगळा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बनत असलेला मराठी चित्रपट देशभक्ती वरती आधारित खाकी... लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लाय डेंजर ही कॅचलाईन घेऊन येत असलेला मराठी चित्रपट मध्ये मुंबई येथील सिने अभिनेता सुरज जाधव यांची निवड करण्यात आली आहे व त्या निवडीचे अभिनंदन मराठी फिल्म इंडस्ट्री मधून होत आहे  आजपर्यंत स्वतःच्या हिमतीवर व जिद्दीने मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या नावाची मोहोर उठवली आहे व आपल्या नावाचा धबधबा मराठी  चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या हिमतीने...संघर्षाने केला आहे असे  कौतुकास पात्...

सौ. किरण वाघ यांची खाकी... लय भारी मराठी चित्रपटासाठी निवड

इमेज
कवि सरकार इंगळी  लेखक निर्माते दिग्दर्शक शेवगाव पांडुरंग गोरे - अहमदनगर जिल्ह्यातील नागेश प्रोडक्शन व जगदंबा आई भवानी प्रोडक्शन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्मित होत असलेला देशभक्तीवर आधारित खाकी... लय भारी या मराठी चित्रपटासाठी मुंबई येथील उत्कृष्ट सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या आईच्या रोडसाठी सौ किरण वाघ यांची सर्वानुमते निवड झाली आहे,  सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित या सेलिब्रिटी सोबत भूमिका करण्याचा आनंद व सुवर्ण संधी मिळणार आहे, तसेच दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी भूमिकेची वारंवार विचारणा केली आहे, करून त्यांच्या शब्दाला मान देऊन , या निवडीसाठी संपादक साहेब श्री उद्धव फंगाळ सर यांनी व खाकी...लय भारी या मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक पांडुरंग गोरे व सुदामजी संसारे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे,  विविध प्रसिद्ध दैनिक मध्ये संपादिका तसेच पत्रकार म्हणून नियुक्त असलेले सौ. किरण वाघ यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या खाकी... लय भारी हा देशभक्ती वरती चित्रपट असल्याने व चित्रपटाची वन स्टोरी ऐकून चित्रपटासाठी होकार दिला आहे, या चित्रपटात...

मानोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, दोन महिला गेल्या वाहून.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  मानवत तालुक्यात मुसळधार पावसाची बॅटिंग; एक महिला बचावली. मानवत : दि. 10 जून सोमवार रोजी मानवत तालुक्यातील मानोली शिवारात  दुपारी चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस  झाला. या ढगफुटी पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात श्रीमती सुनिता धुराजी लव्हाळे (वय 40) या वाहून गेल्या तर रंजना भास्करराव सुरवसे या बचावल्या.दरम्यान, ग्रामस्थांनी पुरात वाहुन गेलेल्या सुनिता लव्हाळे यांचा शोध सुरु केला असून त्या कामी प्रशासनानेही धाव घेतली आहे. तर रंजना सुरवसे यांना बेशुध्द अवस्थेत मानवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत आहेत. गेल्या काही तासां पासून या परिसरात ढगाळ वातावरण पसरले होते. पाठोपाठ पावसास प्रारंभ झाला. पावसाने अचानक जोर धरला अन् मुसळधार पावसाने मानोली परिसरास अक्षरशः झोडपून काढले. या प्रकाराने ग्रामस्थ अक्षरशः हादरले आहेत.

निमशिरगांव येथे गणधरवलय विधानादी मांगलिक कार्यक्रम संपन्न

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी : निमशिरगांव ता. शिरोळ येथे आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज , निर्यापकश्रमण धर्मसागरजी महाराज , विद्यासागर महाराज, सिध्दांतसागर महाराज व संघ यांच्या सानिध्यात श्री श्रूतपंचमी श्रूत आराधना व भव्य जैनेश्वरी दीक्षा समारोहाच्या पहिल्या दिवशी गणधरवलय विधान भक्तीमय वातावरणात सानंद संपन्न. सकाळी मंगल निनाद , मंडप शुध्दी , आहारचर्चा संपन्न झाले. ध्वजारोहन गिरीश पाटील तर मंडपाचे उद्घाटन अभयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर गणधरवलय विधान 48 बीजाक्षरांचे झाले या विधानास निमशिरगांव तसेच परिसरातील बहुसंख्य श्रावक श्राविका उपस्थित होते. हे विधान प्रामुख्याने जे जैनेश्वरी मुनि दिक्षा ग्रहण करणार आहेत असे दीक्षार्थी श्री विद्याधर पाटील अंकली , राजकुमार जैन बिना मध्यप्रदेश यांनी केले.यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराज , विद्यासागर महाराज यांचे मंगल प्रवचन झाले. सायंकाळी दीक्षार्थींची विविध सुक्या मेव्यांनी गोदभराई करण्यात आली  , सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या विधानाचे प्रतिष्ठाचार्य अजित भैय्या तर संगीतकार सचि...

उदगांवमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना परतवलेजुन्या बायपासवरून महामार्ग न्या : चौपट भरपाई द्या

इमेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सोमवारी उदगांव (ता. शिरोळ) येथे मोजणी करण्यासाठी प्राधिकरण अधिकारी व भूमि अभिलेखचे अधिकारी आले होेते. यावेळी उदगांव परिसरातील शेतकरी एकत्रित येऊन सध्या असलेल्या बायपास महामार्गावरूनच होणारा मार्ग न्या व शेतकर्‍यांना बाजारभावाच्या चौपट भरपाई द्यावी. या मागणीसाठी मोजणीला आलेले अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी परतवून लावले.  उदगाव येथे शेतकर्‍यांना सोमवारी मोजणी होणार असल्याच्या नोटिसा शनिवारी व रविवारी मिळाल्या आहेत. एकीकडे प्राधिकरण विभागाने शेतकर्‍यांना विश्वासात न घेता महामार्ग करण्याचा घाट घातला आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या जमिनी मोजण्यासाठी किमान सात दिवस अगोदर नोटिसा देणे आवश्यक असते. मात्र एक किंवा दोन दिवस अगोदर नोटिसा देऊन प्राधिकरण विभागाने मनमानी कारभार सुरू करीत असल्याचा आरोप करून सकाळी दहा वाजता सर्व शेतकरी उदगांव ग्रामपंचायतीमध्ये जमले. त्यानंतर हे अधिकारी सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर उदगांव हद्दीत मोजणीला सुरूवात करणार असल्याचे कळाल्यानंतर शेतकर्‍यांनी शेतात धाव घेतली. यावेळी भारतीय किसान संघाच...

जयसिंगपूरमध्ये तेजा फोटोग्राफी फर्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात

इमेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी येथील सहाव्या गल्लीतील फॉर्च्यून प्लाझा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवारांच्या उपस्थितीत तेजा फोटोग्राफी फर्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला . या फर्मचे प्रमुख तेजस भंडारे यांच्या मातोश्री सौ प्रभावती भंडारे व वडील अरुण भंडारे या दाम्पत्यांच्या हस्ते तेजा फोटोग्राफी फर्मचे उद्घाटन झाले .           यावेळी सिनेअभिनेते डॉ दगडू माने म्हणाले , युवा उद्योजक तेजस भंडारे यांचे फोटोग्राफी व्यवसायात चांगले कौशल्य आहे. उद्योग व्यवसायातील स्पर्धा व आव्हाने स्वीकारून अनेक तरुण उद्योजक स्वतः ची ओळख निर्माण करीत आहेत . अशाच पद्धतीने जयसिंगपूर परिसरात तेजा फोटोग्राफी फर्म  ही नवी ओळख निर्माण करेल. माणसाच्या आयुष्याच्या फोटो आणि शूटिंग रूपाने प्रत्येक क्षणाच्या आठवणींचा एक अल्बम असतो . त्यामुळे आठवणीचा हा दस्तऐवज कौटुंबिक आणि मित्र परिवाराच्या नात्यामध्ये अधिक जिव्हाळा निर्माण करीत असतो. त्यामुळे युवा फोटोग्राफर तेजस भंडारे यांनी फोटोग्राफी - व्हिडिओग्राफी अशा नवनवीन साधनांच्या माध्यमातून चांगली ग्राहक सेवा करून व्यवसाय...

यड्राव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या .

इमेज
यड्राव (प्रतीनिधी ) येथील इंदिरानगर (बेघर वसाहत ) मधील एकाने रहात्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली . सचिन मल्लाप्पा वाघमारे (वय ३७ वर्षे ) असे त्याचे नाव आहे . सदर घटनेची भाऊ सागर वाघमारे यांने शहापूर पोलीस ठाणेत फिर्याद दिली .                        घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी , मयत सचिन वाघमारे हा इंदिरानगर (बेघर वसाहत ) येथे आपल्या कुटूंबासोबत रहात होता . पत्नी व मुले सुट्टीला गावी गेले होते . यातच मयत सचिन यांने अति मद्य प्राशन करून नशेत काल  ( रविवार दि . ९ ) रोजी  रात्री रहात्या घरी तुळीस ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सकाळी मयत सचिन याचा भाऊ सागर वाघमारे यांने अजून दरवाजा बंद असल्याचे पाहून त्यांने सचिन यास आवाज दिला पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने सागर यांने दरवाजाच्या फटीतून पाहीले असता सदरची घटना निदर्शनास आली . घटनास्थळी शहापूर पोलीस व पोलीस पाटील जगदिश सपकाळ येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल येथे  पाठविण्यात आल...

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि रतनगड किल्ल्यावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

इमेज
शिवाजी विद्यापीठ व ठाकरे वाईल्ड लाईफच्या संशोधकांचे यश कोल्हापूर, दि. ८ जून: महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई आणि रतनगड किल्ल्यावरुन गोल बुबुळांच्या प्रदेशनिष्ठ पालींच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश आलेले आहे. दोन्ही प्रजाती उंच शिखरांच्या टोकांवरील बेसाल्ट दगडांच्या अधिवासात आढळतात. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन आणि शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा सहभाग होता. सदरचे संशोधन हे अक्षय खांडेकर यांच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे आणि प्रा. डॉ. सुनिल गायकवाड त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यासोबतच या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे  संशोधक तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, सत्पाल गंगलमाले आणि सौरभ किनिंगे यांचा सहभाग आहे. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजातींचा समावेश 'निमास्पिस' या कुळामधे केला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड किल्ल्यावरुन शोधलेल्या पालीचे नामकरण 'निमास्पिस बेसाल्टीकोला' असे करण्या...

पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत थोडी वाढ.शेतकऱ्यांचे पंपसेट्स पाण्याखाली गेले

इमेज
रायबाग;: तालुक्यातील बावन सौंदत्ती येथे महाराष्ट्र घट्ट प्रदेशातील पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी थोडी वाढल्याने शेतकरी पंपसेट काढत आहेत.  कृष्णा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी नदीत जेथे पाणी आहे तेथे पंपसेट सोडले होते.  मात्र रात्रभर पडलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात थोडी वाढ झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांचे पंपसेट्स पाण्याखाली गेले आहेत.  आणखी काही शेतकरी ते नदीतून बाहेर काढताना दिसले.

कोल्हापुरात अवैध गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर कारवाई

इमेज
प्रतिनिधी;रियाज जैनापुरे  -                                              कोल्हापुरात अन्य धान्य वितरक पुरवठा अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी अवैध गॅस पुरवठा करणाऱ्यांच्या वरती धाड टाकण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली ही पाच ठिकाणी धाड टाकण्यात आले यामध्ये एकूण 74 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आव्हान केलेला आहे की असे  अवैध गॅस कोठे पुरवठा करत असतील तर त्यांनी अन्य धान्य वितरण पुरवठा अधिकारी यांना किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे असे आव्हान देखील त्यांनी केली आहे.

उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव एसएससी बॅच 1983 - 84 विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी - उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव एसएससी बॅच 1983 84 विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा  ८ जून 2024 रोजी उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव येथे पार पडला. विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे पुष्प वर्षावाने स्वागत करण्यात आले देसाई शाळेच्या शिक्षिका उमराणे  व मगदूम मॅडम हजर होत्या. शाळेची प्रार्थना झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. सर्वांनी मनमोकळेपणाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला बऱ्याच विद्यार्थिनी ना अश्रू अनावर झाले. तसेच फनी गेम्स व गीत गायनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन त्रिश ल चौगुले यांनी अतिशय सुंदर रित्या पार पाडले. त्रिश ल पोवळे कांबळे मॅडम यांनी अतिशय सुंदर गायनाचा कार्यक्रम सादर केला.सदर कार्यक्रमाचे नियोजन रामभाऊ बंडगर इलाई जमादार शरद वरेकर चंद्रकांत गडकरी दिलीप सूर्यवंशी जहांगीर मुजावर सुरेश कांबळे शोभा फडतरे व सुलोचना कोळी यांनी केले. सर्वच विद्यार्थिनी व विद्यार्थी सायंकाळी फार मोठी ऊर्जा घेऊन सर्वांनी. परत परत अशाच पद्धतीने एकत्र येऊ असा निर्धार ...

सिने अभिनेत्री ऋतुजा आहेर यांची ही खाकी ..लय भारी मध्ये जबरदस्त एंट्री

इमेज
कवि सरकार इंगळी  महाराष्ट्रील आघाडीची चित्रपट अभिनेत्री ऋतुजा आहेर यांची निर्माते दिग्दर्शक पांडूरंग गोरे यांच्या आगामी  १५ ऑगस्ट पासून चित्रकरणास प्रारंभ होणाऱ्या खाकी... लय भारी " या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून जबरदस्त एन्ट्री ... होणार आहे . खरंच त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या चित्रपटासाठी चार दिवसाच्या शूटिंगसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे  व व खाकी ...लय भारी म्हणजे देशाच्या गद्दारांसाठी ...लय डेंजर या चित्रपटाचा मुहूर्त क्लप 15 आॅगसट रोजी मॅडमच्या हस्ते होणार आहे, या चित्रपटासाठी त्यांची छोटीशी परंतु महत्वपूर्ण भूमिका आहे... का स्टिंग दिग्दर्शक - उद्धव फंगाळ सर   प्रोडक्शन मॅनेजर - कांचनजी शिरभे  निर्माते - रवीशा तेलधुणे सर  सह निर्माते - सतिश खाडिलकर  सह निर्माते - दिलीप वनवे सर  निर्माते - दिग्दर्शक पांडुरंग गोरे सर सहदिग्दर्शक- मफिज इनामदार सर सहदिग्दर्शक -डि ओ पी नागेश गोरे सर दिग्दर्शक - गणेशजी मुंडे सर मार्गदर्शन उमेश वानखेडे सर , पत्रकार संजय लहासे  सर , पत्रकार इंगळी सरकार

बावनसौंदत्ती; मंत्री सतीश जारकीहोळी व मान्यवरांनी तलाव भरण्याचा प्रकल्प पाहणी.

इमेज
रायबाग : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी तीन महिन्यांत तलाव भरण प्रकल्पाचे काम पूर्ण करून लोकांना पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.   रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावात बांधण्यात येत असलेल्या तलाव भरण्याच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली आणि सांगितले की, 2017 मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना तालुक्यातील 17 गावांतील 39 तलाव भरण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.  त्यादिवशी सुरू झालेल्या कामाला उशीर होऊन तलावांना पाईपलाईन जोडण्याचे काम पूर्ण झाले असले तरी प्रामुख्याने नदीचे पाणी उपसून तलावांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी जॅक वेल बांधण्याचे काम लांबले होते.  हे माझ्या निदर्शनास आल्यानंतर आता काम जोरात सुरू आहे.  इमारतीचे काम पूर्ण झाले असून यंत्रसामग्रीचे काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी अर्जुन नायकवडी, एन.ए.मगदुमा, बावुसाहेब पाटील, अण्णाप्पा भुवी, नामदेव कांबळे, दिलीपा जमादरा, मुजीब सय्यदा, निर्मला पाटील, रंजीता शिरसेठ, कुमार हारुगेरी, अनंतकुमार बकुडा आदींसह शामा घाटातील नागरिक उपस्थित होते.  -----------...

रायबाग : देखभाल दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडित राहील.

इमेज
रायबाग;   110 / 11 बोमण्णाळ येथील केव्ही पॉवर डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये उपकरणे आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर ज्युनियरची तिमाही देखभाल केली जाते.  7 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होळकारा फार्म, कित्तोरे फार्म, पाटील फार्म, आणि सांतागोळा फार्म, धर्मती फार्म या भागातील वीज पुरवठा खंडित राहील.  जनतेने सहकार्य करावे, असे हेस्कॉमच्या अधिकाऱ्याने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

प्रभाग क्रमांक 01 मधील सिमेंट रोडचे उद्घाटन.साईनगर सप्तपदी मंगल कार्यालय जवळील सिमेंट रोडचे उदघाटन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.    सेलू : आज दि. 06 जून रोजी सेलू प्रभाग  क्रमांक एक मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षापासून या प्रभागाची प्रलंबित असलेले प्रश्न यांच्या मागणी पूर्ण करत शिवसेना पक्षाच्या वतीने आज सिमेंट रस्त्याचे उद्घाटन माननीय माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते करून 80 लाख रुपये सिमेंट काँग्रेस रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बाबा काटकर शिवसेना तालुकाप्रमुख सेलू, पांडुरंग तात्या कावळे, शहर प्रमुख अविनाश शेरे माजी नगरसेवक ,धनंजय कदम, भास्करराव आढळकर ,प्रशांत थोरात,बाबाराव नकाते,उमेश नवल, निरज मोगल,सतीश कुलकर्णी,रामेश्वर वानखेडे,ठोंबरे सर, सुभाष गोंडगे,दत्ताराव जाधव,नाईकवाडे, फटाले सर, बोईनवाड सर,काकडे सर,अमोल ढेरे,चव्हाण सर, मामीलवाड सर,जाधव सर,मरमट सर आदी या प्रभागातील नागरिक यांची उपस्थिती होती.

44- सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल घोषितअपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी

इमेज
सांगली दि 4 :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात  अपक्ष उमेदवार  विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा 44-सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घोषित केले. त्यांना 5 लाख 71 हजार 666 इतकी मते मिळाली. विजयी उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विधानसभा मतदारसंघनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे. अ क्र. नाव पक्ष 281-मिरज (अ.जा.) 282-सांगली 285-पलूस- कडेगाव 286-खानापूर 287-तासगाव- कवठेमहांकाळ 288-जत टपाली मते एकूण 1. चंद्रहार सुभाष पाटील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 8021 7156 13859 16956 7949 6174 745 60860 2. टिपू सुलतान सिकंदर पटवेगार बहुजन समाज पार्टी 755 758 772 897 1147 1173 58 5560 3. संजय (काका) पाटील भारतीय जनता पार्टी 84029 85993 59376 75795 85074 79125 2221 471613 4. आनंदा शंकर नालगे बळीराजा पार्टी 633 478 519 691 589 621 9 3540 5. पांडुरंग रावसाहेब भोसल...

यड्राव येथे धैर्यशील माने यांच्या विजयाचा जल्लोष .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) हातकणगंले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे (शिंदे गटाचे ) उमेदवार धैर्यशील माने यांनी  निवडणूक लढविली होती . या निवडणूकीत धैर्यशील माने यांनी  १४७२३ मतांची आघाडी घेऊन विजयाची घोषणा होताच . यड्रावमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतीषबाजी , गुलालाची उधळन करून  विजयाची घोषणा करत  मोटरसायकल वरुन विजयाची जल्लोष रॕली काढण्यात आली .                                                  हातकणगंले लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून (उबाठा ) सत्यजित पाटील (सरुडकर ) यांचा पराभव करून महायुतीचे (शिंदे गटाचे ) धैर्यशील माने हे  १४७२३ मत्ताधिक्य घेऊन विजयी झाले .  यावेळी गावातील  महायुतीचे व धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विजयी जल्लोषात सहभागी होते .

कर्तव्यनिष्ठ पत्रकार : चंद्रकांत भाट. पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच निकोप समाज निर्मितीसाठी धडपडणारा सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले शिरोळचे कर्तव्यनिष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त.................. ....

इमेज
4 जून 1980 रोजी चंद्रकांत भाट यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे घरची परिस्थिती अतिशय बेताची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना त्यांना नेहमीच त्यांच्या मित्र परिवाराची साथ लाभत असते मात्र समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून समाजसेवेची लहानपणापासून प्रचंड आवड, त्यातून सामाजिक व सार्वजनिक कार्याची धडपड, या धडपडीला धार आली ती पत्रकारितेतून. गेली अनेक वर्षे पत्रकारितेत काम करताना आम्ही चंद्रकांत भाट यांना पाहतो. मुळातच सामाजिक सेवाभावाचा स्वभाव असल्याने, समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या धारदार लेखनशैलीचा वापर त्यांनी मोठ्या कौशल्याने केला आहे. शिरोळ शहर आणि तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीवर आपल्या लिखानातून त्यांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्या पत्रकारितेची वेगळी छाप समाज मनावर उमटवली आहे. सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकारिता या दोन्ही बाजूंचा समतोल राखताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी निष्ठा आणि व्रतस्थेची भूमिका ठामपणे घेतली आहे. यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा आपला हक्काचा...

वाचन उपक्रम राबवणाऱ्या शाळांना पुस्तक पेटी भेट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. जि.प. प्रा. शाळा कडसावंगी व मालेगाव तांडा येथे 100 पुस्तकांची ग्रंथ पेटी भेट. परभणी : दि. 2 मे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये ग्रंथालयातील पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेणाऱ्या जिंतूर तालुक्यातील जि प प्रा शाळा कडसावंगी आणि जि प प्रा शाळा मालेगाव तांडा या दोन शाळांना * होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज * (एचएआरसी) संस्थेतर्फे आनंदी ग्रंथ वाचन पेटी भेट देण्यात आली.या संस्थेमार्फत आनंदी ग्रंथ वाचन पेटी भेट देण्याचा उपक्रम मागील काही दिवसापासून सुरू आहे. आतापर्यंत परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातील 91 शाळांना ही आनंदी ग्रंथ वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाचे  प्रमुख अतिथी एचए आरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, अँड. प्रवीण कालानी, संदीप भडे,अक्षर आनंद चे जिल्हा समन्वयक प्रकाश डूबे, डॉ. अनुप सारडा, संदीप सारडा हे उपस्थित होते. यावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले की "विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून पुस्तकात काय आवडले ते लिहून वाचलेल्या कथेवर आधारित नवीन कथा तयार करा...

ताराबाई मगदूम यांचे निधन .

इमेज
यड्राव ( प्रतिनिधी ) येथील प्रतिष्ठीत जेष्ठ माता श्रीमती ताराबाई बाबू मगदूम यांचे ( वय ८५ वर्षे ) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्या शांत व मनमिळावू स्वभावाच्या होत्या .       त्यांच्या पश्च्यात दोन मुले , एक मुलगी , सूना व नातवंडे असा परिवार आहे .  माजी सरपंच  पुरंदर बाबू मगदूम यांच्या त्या मातोश्री होत .

सांवगीकरांचा पुलासाठीचा वनवास संपला.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  -७० वर्षापासून नव्हता कर्परा नदिवर पूल आणि रस्ता -मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूल 256 कोटी रुपये मंजूर -आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचा पूढाकार. सेलू: मागील ७० वर्षापासून पूलासाठी सावंगी (पि.सी.)येथील नागरीकांचे हाल होत असतांना मात्र मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पूढाकारमूळे  पूल मंजूर झाला असल्याने सावंगीकरांचा पूल आणि रस्त्यासाठीचा वनवास संपला आहे. मूख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २५६ कोटी रूपयाचा निधी रस्ते व पूलांसाठी मंजूर झाला असून शनिवार १ रोजी सदरिल रस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी डाँ.संजय रोडगे,दिनकर वाघ,अँड.दत्तराव कदम,माऊली ताठे,दिनकर पडघन,अनिल पवार,गणेश काटकर,सूंदर गाडेकर,भारत इंद्रोके,मयूर वाघ,भागवत दळवे,बाळू आघाव,नारायण ताठे,प्रकाश ताठे,लक्ष्मण ताठे आदींची उपस्थिती होती.मागील ७० वर्षापासून सांवगी पि.सी.ला जोडणारा रस्ता व पूल नसल्याने नागरीकांना पावसाळ्यामध्ये पाण्यात प्रवास करावा लागत होता.सदरिल रस्त्यामूळे खैरी, गिरगाव,निरवाडी व चारठाणा आदी गावांना जाण्यासाठी चा प्...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून ३३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिस्सी येथे घडली.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू :सेलू तालुक्या तील हिस्सी येथील वैभव रामप्रसाद गात (३३) यांची हिस्सी शिवारात तीन एकर शेती आहे. यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा, देऊळगाव गात बँकेकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान नापीकी, दुष्काळ यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत वैभव गात हे होते. असे कुटुंबियांनी सांगतले. दरम्यान गुरूवारी रात्री राहत्या घरातील छताच्या फनला दोरीच्या सहाय्याने  गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार वैभव गात यांच्या आईच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना  माहिती दिली. याप्रकरणी घटनेची नोंद सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वैभव गात यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हेस्कॉम कनिष्ठ अभियंता एस.आर.शिंदे, एक सौम्य स्वभावाचे आणि कार्यक्षम अधिकारी, निवृत्त

इमेज
रायबाग: हेस्कॉम कनिष्ठ अभियंता एस.आर.शिंदे, एक सौम्य स्वभावाचे आणि कार्यक्षम अधिकारी, निवृत्त झाल्यामुळे दु:ख झाले आहे, असे के. बलराम, बेंगळुरूचे सरचिटणीस के.व्ही.पी.एन.  निवृत्त होणारे हेस्कॉम कनिष्ठ अभियंता आणि चिक्कोडी सर्कल केव्हीपीआरएनआय नौकर संघाचे संघटक सचिव एस.आर.शिंदे यांच्या निरोप समारंभात ते गुरुवारी शहरातील हेस्कॉम कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित होते.     शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या संघटनेत नोकरीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे.  केव्हीपीआरच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संघटनात्मक शक्तीचा खूप फायदा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.  निवृत्त होत असलेल्या शिंदे यांना त्यांनी निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.  हेस्कॉम ईई आनंदा नाईक, बेसकॉमचे उपाध्यक्ष शिवराम, वरदराजू, पीजी अम्मीनाभावी, विजया गुंजीकारा, पी.एस.शिंदे, मारुती दोडामणी, आर.सी. काकलारा, दिलीपा दोडामणी, आर.एस.स्वामी, एम.डी. पाटील आदी उपस्थित होते.

डीपी प्लॅननुसार सेलू तील रस्त्याचे रुंदीकरण करा,अन्यथा आंदोलन करू: माजी आमदार लहाने यांचा इशारा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  नूतन महाविद्यालय ते गोविंदबाबा चौक पर्यंत अतिक्रमण हटवण्यात सर्वांना समान हक्क द्यावा न दिल्यास आंदोलनाचा इशारा. सेलू : सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील 50 वर्षातील रहदारीसह विकासाच्या अनुसंगाने शासनाने शहराच्या चारीबाजूने डिपी प्लॅन तयार करून त्यानुसार रस्ते 24 मीटर रुंदीचे असून त्यात नाली,फुटपाथ, दुभाजक,विद्धूत पोल आदी बनविण्यासह रस्त्याच्या व शहराच्या सुशोभीकरणासाठी कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामाना तांत्रिक व प्रशासकीय  मंजुरी दिली आहे. मात्र पालिका प्रशासन मनाला वाटेल त्याचे बांधकाम पाडत आहे तर दुसरीकडे कोणाला सुट देत आहे.काही ठिकाणी अतिक्रमण न हटवता रस्ता कमी रुंदीचा करत आहे. शहरातील सर्व रस्ते डिपी प्लॅन नुसार करण्याची मागणी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी गुरुवारी मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली. यापूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका मार्ग परभणी रोड फिल्टर पर्यंत डिपी प्लॅननुसार रस्त्याची मान्यता दिलेली होती.परंतु शासकीय मान्यतेनुसार तांत्रिक,प्रशासकीय मंजुरीनुसार सदर...

मलिकवाड सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

इमेज
मलिकवाड - अमर माने मलिकवाड, ता. 31: येथील सरकारी मराठी, कन्नड प्राथमिक माध्यमिक व हायस्कूल शाळेत विविध कार्यक्रमानी  शुक्रवारी (ता.31) रोजी विद्यार्थ्यांचे प्रारंभोत्सव करण्यात आला. सर्वप्रथम शिक्षक,शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थित श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढण्यात आले. त्यानंतर मराठी, कन्नड व हायस्कूल मुला, मुलींना शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकाची वितरण करण्यात आले. यावेळी यंदाच्या 2024-25 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मंगळवारी (ता.28) रोजी गेले दोन दिवस शाळा स्वच्छ करणे, आवारातील कचरा गोळा करणे, झाडांना पाणी घालणे यासह, विविध शाळेतील कामे करण्यात आली होती.  यावेळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, एस.एन.निवलगी, एम.बी. केरुरे, शिरीष माने, आय.एम. नदाफ, मीनाक्षी ढवळे, बी.एल.बेदरकर, एस. बी.चौगुले, एस.एस.पंडित, लोकरे मॅडम, मोपगार, माळगे यांच्यासह, विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

वीरनगर, नंदीकुरळी गावचा कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा उद्घाटन सोहळा व पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न

इमेज
रायबाग    वीरनगर, नंदीकुरळी गावचा कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा उद्घाटन सोहळा व पुस्तक वाटप कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.  बसवराजा भीमा कब्बुरे, सुधा बसवराज कब्बुरे आणि प्रमोदा राजू संगोटे यांनी शाळेत शिक्षण घेऊन देणगी दिली.  बसवराज भीमा कब्बुरे पाहुणे म्हणून बोलत होते, मी व अनेक विद्यार्थी अमेरिकेत अभियांत्रिकीचे काम करत आहोत.  आमच्या शाळेला मदत करण्याच्या उद्देशाने प्रोटेबल साउंड, कंपास, ड्रॉईंग किट्स, पुस्तके, बुद्धिबळ बोर्ड आणि प्रमोद राजू संगोटे यांनी शाळेला 7000 ची देणगी दिल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी मुख्याध्यापक ए.डी.पट्टारा, एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष सिद्धू शिरोळे, ग्रामसदस्या सुनिला बिद्री, सहशिक्षिका चिन्नव्वा नायका, शांता खिलारे, सौजन्या पुजेरी, गावातील वडीलधारी मारुती दत्तवडे, मालती मठपती व शाळेतील अनेक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

शेकडो नदीचे घाट बांधकाम व सात-बारा उतारा निर्माण करणार्या राजमाता अहिल्यादेवी होळकर . ः कुणालसिंह नाईक निंबाळकर

इमेज
यड्राव  (प्रतिनिधी ) : 12 ज्योर्तिलिगांचा जिर्णोधार करणार्या महाराणी तसेच शेकडो नदीचे घाट बांधकाम व सात-बारा उतारा निर्माण करणार्या   राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय असे  प्रतिपादन व्यक्त केले. यड्राव (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कार्यक्रमात ते बोलत होते .   यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले .  सरपंच निंबाळकर पुढे म्हणाले, पेशवाई काळात त्यांनी चांगल्या प्रकारे आपले राज्यकारभार सांभाळळा, त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या मुलगा मालेराव यांने केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कडक शासन सुनावले होते. तसेच शेतीच्या विकासासाठी त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. माहेश्वर येथे त्यांनी हातमागावर साडया तयार करण्याचा मोठा उद्योग उभारला आजही माहेश्वर साडया प्रसिध्द आहेत. तसेच खासगी व सरकारी कोशासाठी व्यवस्था आखून दिली. आपल्या राज्यात कोणालाही दारिद्रय किंवा दु:ख भोगायला लागू नये यासाठी त्या नेहमी दक्ष असायच्...

सौ जयश्री पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा जयसिंगपूर  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री जगदीश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौडेंशन बेळगावी इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे सौ जयश्री पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित  जयसिंगपूर: प्रतिनिधी : येथील  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री जगदीश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौडेंशन बेळगावी इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे माजी खासदार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते कर्नाटक सरकारचे जिल्हा कमांडंट होमगार्ड डिपार्टमेंट अरविंद घट्टी   कोल्हापूरचे माजी...

सौ.इंदुमती शंकराव गाट इंग्लिश स्कूल रांगोळी चा दहावीचा निकाल 100%टक्के

इमेज
रांगोळी प्रतिनिधी      रांगोळी येथील इंदुमती शंकरराव गाट हायस्कूलचे एस.एस.सी परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100% लागला असून   यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यशस्वी होण्याची परंपरा कायम राखली आहे.      या इंग्लिश हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक आम्रपाली दगडू कांबळे 86.80%, द्वितीय क्रमांक अभिजीत अरुण यादव 84.00% ,तृतीय क्रमांक तस्मिया बकश मुल्लाणी 82.80%,चतुर्थ क्रमांक वैष्णवी भगवान हावलदार 73.80% गुणांसह क्रमांक पटकावले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ए आर कलाजे. पी एस पाटील,टी, एफ,  देसाई  येस, व्ही ,प्रज्ञासागर ,सी, बी, राजोबा , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले

अतिक्रमणामुळे युवकाचा आत्मदहनाचा इशारा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत अतिक्रमण हटवण्यात सर्वांना समान हक्क न दिल्यास आत्मदहनाचा इशारा. सेलू : सेलूतील नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत नवीन रोड बांधकाम सुरू असून ते नगर रचनेनुसार 24 मीटर रोड आहे. येथील अतिक्रमण हटवण्यात दिनांक 27 आणि 28 मे 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीतील होत आहे. मात्र अतिक्रमण हटवण्यात सगळे नियम मोडून मनाला येईल तेथे आपल्या आपल्या हित संबंध सांभाळून  वाटेल ते मनमानी करून एक लाईन रेषेत किंवा एक मोजमापाने न पाडता प्रशासक असून देखील राजकीय दबावापोटी स्पष्ट सर्व नागरिका समोर अन्याय करण्यात येत आहे ते अतिक्रमण हट्टविण्यात सुरुवात केली असता 18 मीटरने दोन घर पाडण्यात आली त्यानंतर लगेच दबाव आला आणि 16 मीटर करण्यात आले. चार घरे या मापाने पाडली की पुढे 20,22,24 मीटर पर्यंत वाढवत नेण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे माप मनमानी 20 आणि नंतर 16 मीटर असे करण्यात आले जर 16 मीटर एका ठिकाणी केले तर 24 मीटर वाल्यांचे घर का पाडले..? आणि 24 मीटर वाले पाडले तर सगळ्यांचे 24 मीट...

जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी घेतला अनोखा उपक्रम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  गुरुजी घेतात विद्यार्थी यांच्या गृहभेटी. मानवत : पी.एम श्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक रामराव सोळंके यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निकालपत्रासोबत वर्ग दुसरीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेला उन्हाळी अभ्यास दिला. तो अभ्यास विद्यार्थी पुर्ण करतायत का नाही ? हे पाहण्यासाठी हे शिक्षक 100 टक्के विद्यार्थ्यांना फोन करून संपर्क करतात. एवढेच नव्हे तर ते 100 टक्के विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेतात. पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यी सुट्टीत अभ्यासापासून दूर जावू नयेत. याची काळजी घेतात. सदरील शिक्षक हे मेंदू विकासावर सुद्धा काम करतात. या उपक्रम शील शिक्षकाचे शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर आणि मानवतचे नुतन गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी कौतुक केले.

यासेर उर्दू शाळेत आयशा उमीज चा पहिला क्रमांक.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.     सेलू : सेलू शहरातील  यासेर उर्दू  माध्यमिक शाळेचा निकाल 96.82 %  लागला असून दहावी  परीक्षेत  आयेशा उमीज हिने घवघवीत यश मिळवून  पहिला क्रमांक पटकावला. 27 मे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  औरंगाबाद च्या वतीने  मार्च  2024 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत  सेलू येथील  यासेर उर्दू स्कुल मधील विध्यार्थीनी व सेलू येथील गुलमोहर कॉलोनी येथील रहिवाशी पठाण आयेशा उमीज मुबीन खान विद्यार्थिनीने 92.40 %गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. शालेतून प्राविण्य प्राप्त  पठाण अरीना फातेमा मुबीन खान 80.80 %  तर जोया खानम निसार अहेमद हिला 73.40% मार्क मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आयशा उमीज चे  वडील  मोबीन खान,आजोबा हाजी अब्दुल रौफ आमन खान, छोटे खान काका निसार अहेमद, अन्वर अली खान, शेख जहीर, अजहर पठाण,शेख मोहसीन,मिरझा जहीर बेग, याकूब खान, आकेब खान,शेख असीम, इरफान जमीनदार आदिनी उत्तीर्ण झालेल्या अभिनंदन केले आहे.

तब्बल पंचवीस वर्षानंतर श्री गणेश विद्यालय,कुंभार गल्ली येथील शाळेतील माजी विद्यार्थी आले एकत्र

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे रोजच्या धावपळीच्या जीवनात आपापल्या कामात व्यस्त असणारे पण कुठेतरी लहानपणीच्या आठवणी मनात  साठवून असणाऱ्या म्हणजे बालपण अशा बालपणीच्या शालेय आठवणी जाग्या करण्यासाठी कोल्हापुरातील जुन्या काळातील प्रसिद्ध अशी अनंत रघुनाथ लाटकर नाना गुरुजी यांची श्री गणेश शाळा कुंभार गल्ली पापाची तिकटी येथील 1993 ते 1999 पर्यंतच्या पहिली ते सातवीतील एकत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षकांचा सत्कार पार पडला. यामध्ये सगळ्यात वयोवृद्ध अशा शिक्षिका देशपांडे बाई 85 वय, चव्हाण सर,नामदेव गुरुजी, सतारमेकर बाई,संध्या बाई, कांबळे सर यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी अरविंद कोळी, सुदर्शन कुंभार,तुषार पाडळकर स्वाती ससे, प्राजक्ता पाटील यांच्या सहयोगाने पार पडले.

उदगांव येथे तरूणांची आत्महत्या

इमेज
जयसिंगपूर : उदगांव (ता. शिरोळ) येथील राहूल ज्ञानदेव कुंभार (वय 39 रा.महावीर कॉलनी) याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुंभार हा दिलीप चौगुले यांच्या घरी भाड्याने राहणेस होता. याबाबतची वर्दी रमेश कुंभार (रा.नरवाड ता.मिरज) यांनी दिली.

नृसिंहवाडी येथे नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे नदीकाठावर पारायण करत बसलेल्या युवकाचा पाय घसरल्याने नदीपत्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. तेजस दीपकराव कुलकर्णी (वय वर्षे २२ रा. गंगाखेड औरंगाबाद) असे त्या युवकाचे नाव असून याबाबत शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड औरंगाबाद येथून चंद्रकांत जोशी , रोहिणी जोशी या आजी -आजोबांच्या बरोबर तेजस कुलकर्णी हा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आला होता.  सकाळपासून तो येथील  संगम काठावर पारायण करीत बसला होता. पारायण करीत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो नदीपत्रात बुडला व त्याचा यामध्ये मृत्यू झाला. यावेळी तेजस बुडल्याची माहिती कोणालाही नव्हती . त्याचे आजी - आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते. यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे रऊफ पटेल व त्यांच्या टीमला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपत्रात शोधा - शोध सुरू केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.       ...

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कुल ची 100% निकालाची परंपरा कायम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : आज दि .27 रोजी  एस . एस . सी बोर्ड2024 च्या जाहिर झालेल्या निकालात न्यू मॉडर्न  इंग्लिश स्कुल चा 100% निकाल लागला आहे.  कु .आरुषी अर्जुन बिडवे 94 .80 %( प्रथम), चि .राजेश काशिनाथ पल्लेवाड  92.80 (व्दितीय), कु .संस्कृती रुपेश भोवते 92.20%(तृतीय),चि .सर्वज्ञ अर्जुन निर्वळ 89%,कु .विधी बालाप्रसाद सोनी 88.60%,चि .वेदांत प्रवीण कुंभकर्ण 88.40%, चि.प्रथमेश रंगनाथ ढोले 86.20%, कु.विराज विष्णू शेवाळे 85.80%,कु.तनिष्का अमोल गाजरे 85.20%,कु.आर्या महेश खारकर 84.40%,कु.सृष्टी अशोक करवा  84%, चि.पुरुषोत्तम दिनकरराव साखरे 83.20%,चि.युवराज विजय वायाळ 83%, कु .सिद्धी पंकज झंवर 82.60%,चि.यश प्रफुल घेवारे 82.60%, चि.वरद अविनाश खरात 81.80%, कु.आरती अशोक केव्हारे 81.60%,कु. तन्वी सचिन धामणगावकर 81.60%,कु.राजनंदनी गजाननराव लिपणे 81.20%,चि.सोहम सचिन बोराडे, 80.80%, चि .आर्यन देविदास जाधव 80.40%,चि.उदय बाजीराव मगर 79.80%, चि.धनंजय विश्वनाथ बागल 78%,चि.पार्थ विनोद बोराडे 78%,चि.चैतन्य भगवान बोराडे 77.60%, कु.अलविरा आसिफ खान ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत(SSC) नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : सेलू येथील श्रीमती.लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेने SSC परिक्षा - 2024 मध्ये यशाची परंपरा कायम राखली असून प्रशालेचा एकूण निकाल 91.46% लागला असून प्राविण्य प्राप्त-107 विद्यार्थिनी प्रथम श्रेणी - 88 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी - 81 विद्यार्थिनी उत्तीर्ण श्रेणी  - 24 विद्यार्थिनी.1) कु.रोडगे ऋतुजा रामप्रसाद ( 97.40% ) या विद्यार्थीनीने प्रशाले मधून प्रथम क्रमांक मिळवला.2)कु.भुते समृध्दी कैलास ( 97.20% ) या विद्यार्थीनीने प्रशालेमधून द्वितीय क्रमांक मिळवला. 3)कु.कुलकर्णी गायत्री मधुकरराव(96.60%)या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला 4)कु.सोळंके श्रेया भगीरथ (96.60%)  या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला.सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,चिटणीस.प्राचार्य.डाॅ.व्ही.के.कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला लड्डा, उपमुख्याध्यापक डी. बी.घोगरे,...

दहावी बोर्ड परीक्षेत ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची तनिष्का डख जिल्ह्यातून प्रथम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम. सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानातीर्थ माध्यमिक विद्यालया तून  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत कु. तनिष्का डख हिने ९९.८०% मार्क घेऊन  जिल्ह्यातून प्रथम येणाचा मान मिळविला.तसेच आघाव ऋतुजा 98.00%, रोडगे जान्हवी 97. 20%, बोराडे श्रुती 96.20%, तौर पल्लवी 95.40%, जाधव विशाखा 95.00% जाधव  श्वेता 94.86%, हारकळ वैजनाज 94.08%, ढवळे सावता 91.00%, संध्या शिलार 88.60%, सोळंके श्रावणी 88.60%,  खंदारे समृद्धी 88.40%, आघाव स्नेहल 88.40%, कव्हळे दर्शना 87.40%, चट्टे प्रदूम्न 87.60%, निर्मळ श्रुती 87.80%,  कव्हळे मानसी 86.80%, चव्हाण पृथ्वीराज 84.60%, डख प्रज्वल 84.40%, कदम वेदिका 84.40% ठोके धनश्री 84.00%, सागर सोनवणे 83.20%, दिव्या निकम 82.20%, गोटमुकले ऋतुराज 81.60%,  मावई आकाश 81.40% मांडे मानसी 81.48% डक वेदिका 81.00% सोळंके समृद्धी 80.60%, सावते श्रद्धा 80.00% कवडे ऋतुजा 80.00% यासोबतच एकुण 40 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह...

समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्कार सौ शैलजा परमणे कोल्हापूर यांना प्रदान

इमेज
कवि सरकार इंगळी      कवि सरकार स्वामिनी वाचनालय यांचा कवियत्री व अध्यापिका सौ शैलजा मोहन परमणे कोल्हापूर यांना . राज्यस्तरीय समाज प्रबोधन प्रेरणा पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळा इंगळी येथील १७ व्या संमेलनात ॲड सर्जेराव साळवे छ संभाजीनगर . धुमाळकाका दिपक पवार अभिनेता गोपाळ वानखेडे अशोक मोहिते यांच्या हस्ते मोठया दिमाखात संपन्न झाला . शैलजा परमणे यांच्या काव्य क्षेत्रातील व शैक्षणिक  क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरावरील समाजप्रबोधन प्रेरणा हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले .त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेने विविध स्तरातून कौतुक होत आहे . कवि सरकार स्वाभिमानी वाचनाल इंगळी सदस्य व ग्रामस्थ उपस्थितीत होते