एल. के.आर. आर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” या अभियांतर्गत विविध बँकेला भेट, स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि. 03 फेब्रुवारी शनिवार रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के.आर. आर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' या अभियांतर्गत विविध बँकेलाभेट,स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व, ओला कचरा व सुका कचरा व परस बाग इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.आय सी आय सी आय बँक, बँक ऑफ बडोदा, एच डी एफ सी बँक, सेलू तील या तीन बँकांना विद्यार्थ्यांनी भेट दिले.बँकेचे मॅनेजर व कर्मचारी यांनी बँकेतील व्यवहार ज्ञान व आर्थिक ज्ञान याची माहिती दिली.यामध्ये घरासाठी लोन (होम लोन), स्वतःसाठी लोन ( प्रायव्हेट लोन ), चेक न वटणे ( चेक बाउन्स ), धनादेश पडताळणे, धनादेशाची वैधता ( चेक व्हॅलिडीटी ), धाड पडणे ( रेड पडणे) इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. यातून वित्तीय सेवा ची माहिती मुलांना कळाली.'स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व ' रवळगाव येथील रामकिशन लिंगायत यांच्या 'कुंभार' व्यवसायाची माहिती मुलांना मिळाली. त्यात त्यांनी फुलदाणी, कुंडा, गल्ला, उदानी इत्यादी मातीचे वस्तू मुलांना प्रात्यक्षिक बनवून दाखवले. दत्...