पोस्ट्स

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 16 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन.

इमेज
कुंभोज प्रतिनिधी (नंदिनी चव्हाण)  आपल्या हक्काच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 16 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करणे व आकृतीबंध सुधारणा करणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळणे, वसुलीचे अट रद्द करणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांना निवृत्तीवेतन लागू करणे यासह अन्य मागण्यांचे निवेदन हातकणंगले बीडीओ मोकाशी मॅडम यांना देण्यात आले. या बेमुदत संपासाठी संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा जाहीर होत आहे.

हुपरीत पुन्हा निनावी पत्राने खळबळ यावेळी पत्र जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन ते मुख्याधिकारी व पत्रकार दंडाधिकारी यांच्यासह बर्याच जणांना पोचले

इमेज
हुपरी - हुपरीचे माजी सरपंच व भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष सुभाष कागले  यांच्यावर या निनावी पत्राद्वारे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत  नगरपरिषद क्षेत्रामधील बांधकाम धारकांकडून खंडणी वसूल करत असल्याचे उल्लेख करत  काही लोक विनापरवाना बांधकाम करत असून त्यांच्या या अडचणीचा गैरफायदा घेऊन  माजी सरपंच सुभाष कागले हे नगरपरिषद अधिकाऱ्यांवर दबाव आणून बांधकामाबाबत कारवाई करायला लावतात  त्यानंतर ते स्वतः बांधकाम धारकाकडे तक्रार मिटवतो असे सांगून पैशाची मागणी करतात  असे अनेक प्रकार सर्रास होऊ लागले असून सुभाष कागले यांनी हा खंडणीचा व्यवसाय सुरू केला आहे का  असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे स्थानिक नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील समावेशना करिता पैशाची मागणी करत असल्याबाबतच्या तक्रारी ही आल्या आहेत  अनेक वैळा तक्रारी अर्ज त्यांनी दिलेले आहेत  पण सुभाषराव कागले यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही  कारण त्यांच्यावर भाजपच्या काही वरिष्ठ मंडळींचा हात असल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करत स्वीकृत नगरसेवक करून विद्य...

न्यू वाडदे व्यंकटेश नगर येथील समर्थ ग्रुपच्या पावती बुक पूजन सोहळा उत्साहात संपन्न

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील व्यंकटेश नगर न्यू वाडदे ता. करवीर जि.कोल्हापूर येथील समर्थ ग्रुप चे दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण झाले. समर्थ ग्रुप चे २०२४ चे अध्यक्षपदी श्री अमोल शेटके यांचे बिनविरोध निवड झाली.उपाध्यक्षपदी किरण कापसे,सेक्रेटरी प्रवीण बुटके,खजिनदार पदी गौरव इंगळे यांची निवड झाली. तसेच आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ८.४५ च्या शुभ मुहूर्तावर नवीन देणगी पावती बुक पूजन ज्येष्ठ नागरिक दादासो रड्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे सदस्य शितल येडेकर,सदाशिव बुटके,प्रभाकर भोंग,सखाराम फटकरे,उत्तम रड्डे,गणेश शेटके,प्रशांत रड्डे, राजकुमार कापसे,लक्ष्मण बुटके,रोशन बुटके,प्रथमेश बुटके,यशराज शेटके,अतुल पाटील,सुरेश माळी,अरिफ मकानदार,अरविंद माने व भागातील नागरिक महिला उपस्थित होत्या .

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे कोल्हापूर:-१५ ऑगस्ट   ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त   कोल्हापूर मानवअधिकारी संघटनेच्या वतीने कोल्हापूर शहर  अध्यक्ष अर्जुन बुचडे यांच्या सहयोगाने  राजारामपुरी  मातंग समाज  अंकुश कला क्रिडा संस्कृत मंडळ येथे ब्रह्मांड  आयुर्वेद आरोग्य शिबीर तसेच  राजारामपुरी पोलीस स्टेशन चे अधिकारी याचे सत्कार समारंभ व विद्यार्थी विद्यार्थिनींना  शालेय खेळ कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी जगन्नाथ बुचडे,अशोक बुचडे,समाज सेविका रेखा ताई बुचडे,छाया बुचडे,मा.हेमंत कवाळे,भाजप चे प्रमुख जिल्हा उपाध्यक्ष मा.प्रशांत अवघडे,  जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती युवा मोर्चा मा.राहुल सोनटक्के, दलित चळवळीचे नेते मा.अदीनाथ साठे,सामाजिक कार्यकर्ते मा.दाविद भोरे, मा.किरण बुचडे,सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन कवाळे, मा.युवराज बुचडे,मा.सुरज गस्ते,भाजप नेते मा.बापू पवार, मा.संदिप बुचडे, मा.रणजित बुचडे,क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान अध्यक्ष मा.अक्षय साळवी, मा.अमित मोहीते.आदी सह समाजातील सर्व नागरिक तसेच शिवसैनिक आणि भिम...

रांगोळी येथे बांधकाम कामगारांना संसारउपयोगी साहित्याचे वाटप

इमेज
रांगोळी प्रतिनिधी  राजेंद्र पुजारी :   रांगोळी  ता, हातकणंगले येथे  भारतीय कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगाराचा भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्या मध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय चौगुले दादा शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री साताप्पा भवान साहेब रांगोळी गावच्या सरपंच सौ संगीता नरदे उपसरपंच श्री शिवाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते  संसारउपयोगी साहित्य  वाटप करण्यात आले यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य  शिवसेना शहरप्रमुख श्री रजनीकांत माने मनोगत व्यक्त करताना बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त महाराष्ट्र  बांधकाम कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभ देण्याचे आश्वासन दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण कमते हुमायन मुल्लाणी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील माजी सरपंच श्रीकांत कांबळे संघटनेचे बागल माने स्वप्निल कांबळे पिंटू माने सूरज सोलगे दादासो माने विलास माने प्रफुल माने मायकल ऐवळे स्वप्नील माने अमित माने कविता कांबळे सुमन वजारे गीता कांबळे कोंडुबाई पुजारी कविता ...

यड्राव येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव येथे 78 वा  भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .                                          कुमार व कन्या विद्या मंदिर -- येथे ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .                                        यावेळी ग्रा .प . सद्स्या सौ . वैशाली काळगे , बापू उपाध्ये , दत्तात्रय साळोखे ,  शालेय  व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष चवगौंडा पाटील , सुनिता दानोळे  , मुख्याध्यापक डी . के . पाटील ,  बी . आय , आंबी ,  सर्व शिक्षक स्टाफ , विद्यार्थी -- विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थ उपस्थित होते .                                                ...

डॉ. काडय्या हिरेमठ यांना नाट्य महोत्सवात समाज सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

इमेज
रायबाग: तालुक्यातील डिग्गेवाडी गावातील वेदमूर्ती डॉ. काडय्या हिरेमठ यांना धारवाड येथील रंगायण मंडपम येथे 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून कर्नाटक नाट्य लोककलाकार विकास संघातर्फे आयोजित नाट्य महोत्सवात समाज सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. .  नाट्य कलावंत म्हैसूर हेलन, चित्रपट दिग्दर्शक नागेंद्र मगडी, कल्लमेश हमवेरापेटे, एन.ए.देसाई, डॉ.प्रकाश देसाई उपस्थित होते.

कारदगा ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीस कुलूप

इमेज
कारदगा प्रतिनिधी कारदगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील अंगणवाडी क्रमांक 190 या वर्गखोलीस कुलूप लावण्यात आले. सदर अंगणवाडीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी शिक्षिका श्रीमती सुजाता राजेंद्र पडलिहाळे यांची नियमाबाहेरित्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ती रद्द करण्यात यावी अन्यथा कुलूप काढण्यात येणार नाही असे लेखी निवेदनाव्दारे  ग्रामपंचायतीतर्फे वरीष्ठांना कळविण्यात आले आहे.         याप्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे यांनी ग्राम पंचायत अध्यक्षा व उपस्थित सदस्यांच्या पुढाकारणे येथील अंगणवाडी क्रमांक 190 ला कुलूप लावण्यात आले आहे.   या अंगणवाडी शिक्षिका पदासाठी गळतगा गावातील अंगणवाडी सहाय्यक सुजाता राजेंद्र पडलिहाळे यांना बेकायदेशिररीत्या कारदगा येथील अंगणवाडी वर्ग क्र. 190 मध्ये बढती देण्यात आली आहे.  त्यांच्याकडे सदलगा गावातील शिधापत्रिका व गळतगा गावचे कायमस्वरूपी निवडणूक ओळखपत्र आहे. सदर माहिती मा.उपसंचालक बालविकास विभाग कार्यालय बेळगाव, मा.तहसीलदार साहेब निपाणी , मा.ब...

भरधाव स्कूल बस ची रेल्वे गेटला धडक

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे         विठ्ठलवाडी येथील आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली येथे सकाळी सात वाजता भरधाव स्कूल बसने रेल्वेची गेट लागत असताना या रेल्वे गेटला जोराची धडक दिली.स्कूल बस थेट रेल्वे रुळावर जाऊन अडकली .दरम्यान या ठिकाणाहून जाणारी डेमो रेल्वे काही अंतरावर येऊन थांबली होती.रुळावर अडकलेली बस तेथील स्थानिक लोकांनी ढकलून बाजूला केली ज्यामुळे रेल्वे रूळ मार्ग मोकळा झाला. विठ्ठलवाडी आमनापूर मार्गावरील वाहतूक या वेळी काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने या बस मध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणीही विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सेलूत तिरंगा रॅलीचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू:- पंचायत समिती सेलू आणि नूतन विद्या लय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅली चे आयोजन दि. 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले. शहरातील 6 प्रशालेतील 800 मुले व मुलीनी सहभाग नोंदव ला बाळ गंगाधर टिळ क यांच्या पुतळ्यापासू न रॅलीला सुरुवात झा ली.गजानन वाघमारे उपशिक्षणाधिकारी (प्रा.)यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला हिरवा झेंडा दाखवि ला.या रॅलीचा समारोप दलिततमित्र कै श्रीराम जी भांगडिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला.या प्रसंगी बोलताना शिवाजी मगर तहसीलदार सेलू म्हणाले  भारतीय स्वातंत्र्य लढा हा त्यागा चा आणि शौर्याचा लढा आहे. क्रांतिकारकांनी केलेल्या त्यागाची आपण आठवण ठेवूया तिरंगाचा मान राखूया विद्यार्थ्यांकडून उत्साह सहभाग नोंदवून राष्ट्र भावना जागृत केलीे. राष्ट्रगीता ने रॅलीचा समारोप झाला.तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी या रॅली साठी पुढाकार घेत ला.याप्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्या पक एस. व्ही पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे,के. बा. विद्यालयाचे मुख्...

अनुदानापासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्या ची तहसीलदार कडे मागणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :आज दि. 13 ऑगस्ट रोजी तहसी लदार सेलू यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सेलू तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आपल्या विभागा मार्फत गाव पातळीवर सोयाबीन व कापूस ई पीक पाहणी यादी प्राप्त झाली आहे.दिनांक 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार इ पिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत 5000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे परंतु खरीप हंगाम 2023 ची ई पिक पाहणी करून सुद्धा सेलू तालुक्या तील प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांचे आपल्या विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या ई पीक नोंदणी यादीमध्ये नावे समाविष्ट नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या अनुदाना पासून वंचित राहत आहेत. तरी याप्रकरणी तातडीने दखल घेऊन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून सुद्धा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान वाटपासाठी राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करून त्यांना अनुदान मिळवून देण्यात यावे नसता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्याल...

महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने गृह उपयोगी वस्तूंचे वाटप

इमेज
इचलकरंजी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे गृह उपयोगी साहित्य (तीस भांड्यांचा सट) वाटप  कामगार नेते कॉ. आनंदा गुरव यांच्या हस्ते करणेत आले.  .      महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तु संचाचे वाटप सुरु आहे पुर्ण राज्यात सुरु आहे, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने इचलकरंजीत सोळासे पन्नास बांधकाम कामगारांना संचांचे ( भांडी) वाटप करणेत आले        यावेळी  रमेश खोत, गणेश मादास, अविनाश चव्हाण, दादासो गस्ते, इक्बाल मुल्ला, जीशान बागायत, सुनिल खोत,मोहन पन्हाळकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

अकिवाटचे सुपुत्र हेमंत कांबळे यांचे सेट परीक्षेत सुयश

इमेज
अकिवाट/ सचिन मठपती  येथील हेमंत मच्छिंद्र कांबळे यांनी 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सहाय्यक प्राध्यापक पात्रतेसाठी असलेल्या अर्थात सेट परीक्षेत इंग्रजी विषयात सुयश संपादन केले.     हेमंत कांबळे यांचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकिवाट येथील विद्यासागर हायस्कूल येथे झाले आहे.बी.ए.इंग्रजी पदवीचे शिक्षण  कुरुंदवाड येथील सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेजमध्ये पूर्ण केले. एम.ए.इंग्रजी पदव्युत्तर शिक्षण हे वालचंद कॉलेज अर्जुननगर (निपाणी) येथे पूर्ण केलेले आहे. सध्या ते एकसंबा येथे  बसवज्योती डिग्री कॉलेज येते  इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.    हेमंतचे  आई सुलोचना व वडील मच्छिंद्र कांबळे हे शेतमजूरांचे काम करतात.दोघेही अल्प शिक्षित असूनही आपला मुलगा प्राध्यापक व्हावा म्हणून दोघांनीही कठोर परिश्रम घेतले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना हेमंतने मिळवलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.     विशालक्राती न्यूज परिवाराच्या वतीने हेमंत कांबळे यांचे अभिनंदन!

विनोद बोराडे मित्र मंडळ द्वारा आयोजित नागपंचमी महोत्सवाचे 12 व्या वर्षात पर्दापण.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : सेलू हे सांस्कृ तिक शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व त्यांचे मित्र मंडळ नेहमीच परंपरेला अनुसरून महोत्सवाचे आयोजन करत असता त.त्याचाच एक भाग म्हणून सेलू शहरातील महिला व मुलांसाठी नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्स वाचे हे बारावे वर्ष होते.विनोद बोराडे व त्यांचे मित्र मंडळ दिनांक 09 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 8 असे या महोत्सवाची वेळ ठेवण्यात आली होती. यादरम्यान नागदेवता चे पूजनाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. महोत्सवातील विविध स्पर्धा रहाट पाळणा,  संगीत खुर्ची, फुगडी, उखाणे, दोरीवरच्या उड्या, प्रश्नमंजुषा, इत्यादी पारंपारिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर महिला व लहान मुलांसाठी रात पाळणे व विविध मनोरंजकाचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि या स्पर्धेतील प्रत्येक तीन विजेत्यांना आकर्षक बक्षीस ही ठेवण्यात आले होते. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या अशा आगळ्यावेगळ्या महोत्सवाचा सेलू शहरातील सर्व महिला व बंधू-भगिनींनी व लहान मुलांनी खूप आनंद लुटला. त्याचबरोबर दहा ...

मदतीचा उपयोग करू न विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करावे -उपजिल्हाधिकारी संगिता सानप.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.                             सेलू : दि. 10 ऑगस्ट शनिवार रोजी 09 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात 'हात मदतीचा'  सामाजिक उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप तुमच्या आमच्या सहकार्यातुन वर्ष 7  या उपक्रमांतर्गत  2337 विद्यार्थास शालेय साहित्य वाटप करण्यात आले असुन  आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या पुढाकाराने गरजू व होतकरू 28 विद्या र्थ्यांना शैक्षणिक साहि त्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी विद्या र्थ्यांनी वेळोवेळी मिळ णा-या मदतीच्या आधा रे आपले शिक्षण पूर्ण करून ध्येय गाठले पाहिजे.असे प्रतिपादन सेलू  उपविभागीय अधिकारी संगिता सानप यांनी मांडले.तर विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिले पाहिजेत व ती पुर्ण करण्यासाठी विचा र, मन आणि शरिर यांची शक्ती एकत्रित करून वापरली पाहि जे. असे मत अशोक काकडे, शालेय समिती अध्यक्ष यांनी मांडले. या कार्यक्रमात एकूण 28 विद्यार्थ्यांना शैक्षणि क साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्...

अ.भा.ग्राहक पंचायती च्या जिल्हा सहसचिव पदी सुनील गायकवाड तर तालूका संघटक शुकाचार्य शिंदे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि 9 ऑगस्ट अ. भा.ग्राहक पंचायतीच्या जिल्हास्तरीय समिती च्या प्रांताध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये झाले ल्या बैठकीमध्ये सामा जिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची जिल्हा सहसचिव तर तालुका कार्यकारणीवर शुकाचार्य शिंदे यांची तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रान्त अध्यक्ष डाॅ.विलास मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती त जिल्हाध्यक्ष गुलाब राव शिंदे व तालुकाध्य क्ष सतीश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्य कारिणी निवड बैठकीत  मागील दोन वर्षांपासून तालूका संघटक म्हणून अभिनंदनीय कार्य करणारे व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रचार प्रसारासाठी अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुनील गायकवाड यांची जिल्ह्याच्या कार्य कारणी मध्ये  जिल्हा सहसचिव या पदावर निवड करण्यात आली तर शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी असणारे शुकाचार्य शिंदे यांची तालूका संघटक म्हणून निवड करण्यात आली. अ.भा. ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष गुलाब राव शिंदे यांनी नवनिर्वाचित जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड यांना निवडी...

यड्राव गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे . ः आमदार डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  :  गावचे हित साधायचे असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधीनी विरोधासाठी विरोध न करता एकत्र येऊन काम केल्यास गावचा विकास होतो राजकारणाच्या वेळी राजकारण करा .पण गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. यामुळेच गावचा सर्वांगीण विकास होतो.असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.       येथील रेणुका मंदिर येथे झालेल्या  विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार यड्रावकर व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर होते यावेळी रेणुका मंदिर सभा मंडप पूजन, पडीयार वसाहत येथे विहीर नूतनीकरण, तांडा वस्ती योजनेतून गटर व रस्ता शुभारंभ, गाव चावडी इमारत बांधकाम शुभारंभ, बस थांबा निवारा चे  पाया खुदाई, मराठी शाळा व्हरांडातील फरशी बसवणे ,षटकोन शाळा येथे पत्रे बसविणे, बेघर वसाहतीकडे जाणारा रस्ता करणे आदी विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.      स्वागत व प्रास्ताविक सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर यांनी केले यावेळी दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्य...

श्रावणानिमित्त हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वेळीही रात्री 7 ते 9 या वेळेत महिनाभर शिवभजनाचा कार्यक्रम

इमेज
रायबाग : शहरातील श्रावण महिन्यानिमित्त जय हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वेळीही रात्री 7 ते 9 या वेळेत महिनाभर शिवभजनाचा कार्यक्रम सुरू होता.  या कार्यक्रमात ट्रस्टचे सदस्य जयराम शेट्टी, डॉ.एस.के.गुडोदगी, सिद्राम बेळ्ळनवर, जय हनुमान भजन मंडळाच्या गंगाधर सरीकर, शिवानंद हुलगबळी, महादेव कांबळे, अंकुश मादर, दत्ता पत्रोट आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर वर्तुळात मादिग आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केला विजयोत्सव साजरा.

इमेज
रायबाग : प.जाती-जमातीतील लोकांना अंतर्गत आरक्षण देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मादिग आरक्षण संघर्ष समितीच्या सदस्यांनी गुरुवारी आंबेडकर सर्कलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, फटाके वाजवून, मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा केला.      त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मादिग समाजाचे नेते सुरेश ऐहोळे म्हणाले की, गेल्या 30 वर्षांच्या अंतर्गत आरक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे.  राज्य सरकारने लवकरात लवकर अंतर्गत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.    महावीर ऐहोळे, कडेश ऐहोळे, शिवाजी म्हैशाळे, प्रभू म्हैशाळे, बसवराज मांग, करप्पा मांग, विनायक पोळ, संजू मांग, महेश मांग, लक्काप्पा पुजेरी, रेखा भंडारी, सावित्री हलबार, लक्कव्वा जोडट्टी, उत्तम कांबळे आदी नेते उपस्थित होते. 

कृष्णा नदीची पाणीपातळी कमी झाल्याने तालुक्यातील बावन सौंदत्ती-नसलापूर पूल वाहतूकीसाठी खुला

इमेज
रायबाग : कृष्णा नदीची पाणीपातळी कमी झाल्याने तालुक्यातील बावन सौंदत्ती-नसलापूर पूल आणि अंकली-रायबागा पूल हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.

लक्ष्मी पाटणकर यांचे निधन .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येथील जेष्ठ वयोवृध्द  माता बुध्दवासी लक्ष्मी बापूसो पाटणकर यांचे वयाच्या ९२ वर्षी  वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले . येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटणकर , अॕड . सुभाषचंद्र पाटणकर व दादासो पाटणकर यांच्या मातोश्री व माजी ग्रा . प . सद्स्य डॉ . सचिन पाटणकर व प्रा . सौरभ पाटणकर यांच्या त्या आजी होत .                                        त्यांच्या पश्च्यात तीन मुले , एक मुलगी , सूना , नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे . जलदान विधी शनिवार दि . १० आॕगष्ट २०२४ रोजी सकाळी ठिक ९ वाजता यड्राव येथील स्मशानभूमी येथे आहे .

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे- डॉ संजय रोडगे.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी.  एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल मध्ये पालक व विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण. सेलू : दि. ७ ऑगस्ट श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण अभियान अंतर्गत विद्यार्थी व पालकांनी वृक्षारोपण केले.वृक्षा रोपण अभियान कार्यक्रम प्रसंगी कार्य क्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे,सचिव डॉ. सविता रोडगे,प्रशास कीय अधिकारी प्रा. महादेव साबळे,प्रिन्सि पल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर,रुचि का गुप्ता,अनंत तेलभ रे,शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली. परंतु आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहोत याचेच वाईट परिणाम आज आपण पाहत आहोत. जागतिक तापमानाती ल वाढीमुळे पृथ्वीवरील मानवांचे सजीवांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाणी फुलेच देत नाहीत तर आपल्याला जगण्या...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट महिला शहर अध्यक्ष कोरोची पदी सौ दीपा खारगे यांची निवड

इमेज
प्रतिनिधी नंदिनी चव्हाण कुंभोज हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट महिला शहर अध्यक्ष कोरोची पदी सौ दीपा खारगे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय इचलकरंजी येथे करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे साहेब उद्योग व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपानी साहेब, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे साहेब, जिल्हाध्यक्ष कामगार विभाग अभिजीत आवळे साहेब, कोरोची शहराध्यक्ष रवींद्र शिंदे, संतोष पिसे, माणिक चौगुले, फारुक मुजावर, महिला आघाडी इचलकरंजीतील शहराध्यक्ष माजी नगरसेवक सौ माधुरी चव्हाण, शहर कार्याध्यक्ष बिलकिस मुजावर, महिला सचिव प्रियांका कांबळे, अनुराधा पाटील, व पार्टी ऑफिसचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

व्यवसाय शिक्षण अंतर्गत कोहिनूर रोप फॅक्टरी येथे क्षेत्रभेट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  कस्तुरबा गांधी विद्या लयाचा शालेय उपक्रम.   सेलू : दिनांक 6 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी सेलू शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 50 विद्यार्थिनींनी व्यवसाय शिक्षण अंतर्गत रस्सी कारखाना येथे भेट दिली. या वेळी बालिकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. बालिका सोबत व्यवसाय प्रशिक्षक श्रीमती शितल अव चार,अनुसया शिंदे, अनिता काळे, कला शिक्षक पांडूरंग पाटणकर हे उपस्थित होते.कच्चा मालाची आयात व पक्क्या मालाची निर्यात, 4 MM दोर पासून ते 40MM  दोर कसा बनतो. तयार माल पॅकिंग करून विक्री कसा केला जातो. परदेशात या मालाची निर्यात कशी होते. कोहिनूर आणि मनोरमा या दोन कारखान्यांमध्ये  दोन शिफ्ट मध्ये येथे 2000 व्यक्तींना रोजगार दिला जातो. आदि बाबीं विषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. व्यवस्थापक वल्लभ शेठ बाहेती यांनी उपस्थितांचे स्वागत केले.शैलेश विटेकर, राजू बुरकुले,अमोल हजारे यांनी बालिकांना माहिती दिली.तर आभार साक्षी टाकरास हिने मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्या ध्यापक सुनीता वेडे , सुमित्रा पवार यांनी ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात ब्रम्हवाकडी ता. सेलू येथील जय मल्हार ग्रुप च्या कार्यकर्त्यांचा प्रवेश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू तालुक्या तील ब्रम्हवाकडी येथील जय मल्हार ग्रुप च्या कार्यक्रत्यांनी माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात पूर्ण प्रवेश केला.यावेळी मा.आ. विजयराव भांबळे साहेबांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचा लीस शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष भागवत नजान,अशोक किशन काकडे, भास्कर आव्हाड, रामप्रसाद म्हेत्रे,महेश कोरडे, दिगंबर कोरडे,विष्णु पंत कोरडे,उद्धव कोरडे, ज्ञानेश्वर उर्फ बाळू नजाण, दत्ताराव काकडे,महादेव कोरडे, राम म्हेत्रे, सर्जेराव कोरडे, राजेश आव्हाड, अंगद म्हेत्रे या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.यावेळी प्रकाशराव मुळे,सुधा कर रोकडे,भगवान कदम,छत्रगुन आव्हाड, शुभम कदम आदी उपस्थित होते.

अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. कल्लेश्वर मित्र मंडळ मधील जुन्या व नव्या सदस्यांची नवी संकल्पना

इमेज
अकिवाट वार्ताहर - 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणारा आजचा श्रावण सोमवार कल्लेश्वर मित्र मंडळ, सैनिक टाकळी यांना भाग्याचा होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे, "जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत, अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. कल्लेश्वर  मित्र मंडळ मधील जुन्या व नव्या सदस्यांनी एक संकल्पना मांडली की,  पूरग्रस्त शिरोळ तालुका यामध्ये गुरुदत्त साखर कारखाना येथे छावणीमध्ये वास्तव्य करत असलेल्या लोकांच्यासाठी आजचा श्रावण सोमवार बडा खाण्यापेक्षा कमी नव्हता. मंडळातील सर्व सदस्यांनी महिलांना निरोप देऊन प्रत्येक घरटी 25, 25 चपात्या बनवून संध्याकाळचं रात्री भोजन त्यांच्याबरोबर केलं. आणि त्यांना उत्साहीत केलं, या अनमोल कार्यामध्ये कल्लेश्वर मित्र मंडळ आजी माजी सदस्य महिला आणि मार्गदर्शक यांची मोलाची कामगिरी होती. मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अशीच कामे आपल्या सर्वांच्या हातून यापुढेही  होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कॅप्टन प्रकाश खोत (सेवानिवृत्त)

चिंचली शहरातील शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य उपकेंद्राला तहसीलदार सुरेश मुंजे यांची भेट

इमेज
रायबाग : तालुक्यातील चिंचली शहरातील शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य उपकेंद्रात खासगी व्यक्तींनी अतिक्रमण केल्याची तक्रार आल्यानंतर तहसीलदार सुरेश मुंजे व चिंचली पं.स.चे मुख्याधिकारी व्ही.आर.बेल्लारी यांनी सोमवारी भेट दिली.     शासकीय इमारतीवर किंवा जागेवर कोणी अतिक्रमण केले असेल तर अशा व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, आरोग्य उपकेंद्राच्या अतिक्रमणाबाबतची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना कळवावे, असे नगरपंचायत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. रुग्णालयाची ओळख पटवून तारेचे कुंपण घालण्यात येईल, असे ते म्हणाले.  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एम. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, ते मंगळवारी चिंचली शहरातील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तपासणी करणार असून, अतिक्रमणाची माहिती घेऊन वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत.

हुतात्मा अनंता लेवडे यांच्या स्मृतिदिना निमित्त शालेय साहित्य वाटप.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : दि 5 ऑगस्ट सोमवार रोजी तालूक्यातील डिग्रस वाडी येथील मराठा आंदोलक अंनत सुंदरराव लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला. हुतात्मा अनंत लेवडे यांच्या परभणी रोड वरील स्मारकास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी दत्ता सोळंके, ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील  गायकवाड, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोल नात अनंत लेवडे यांनी 5 ऑगस्ट 2018 रोजी बलिदान दिले आणि आज मनोज दादा जरांगे यांचे आंदोलन सुरू असून मराठा आरक्षण आंदोलनात ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे, तरी या सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे की मराठा समा जातील युवकांचे बलि दान वाया जाउ देऊ नये.तसेच हुतात्मा अनंत सुंदराव लेवडे स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथ मिक शाळा वाडी येथील विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळ...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सेलुचे शहराध्यक्ष शेख दिलावर भाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :माजी आ. विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सेलू येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी मा.आ.विजयराव भांबळे साहेबांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यात प्रामुख्याने अमीर लाला, निसार अन्सारी, अफरोज पठाण, जुनेद शेख, मोबिल अन्सारी, शेख चांद, अकबर शेख, इब्राहीम भाई, अझर सय्यद, राजूभाई, पवन पवार, विजय भय्या, अशोक बोराडे,राज भाई,अफरोज पठाण परवेज पठाण, नजीर शेख, शिवाजी जाधव, मतीन शेख मुस्ताक भाई, शैलेश जोगदंड, नवरुल्ला बेग तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला. यावेळी अशोक नाना काकडे, रघुनाथ बागल, रामप्रसाद पौळ, सचिन गाडेकर, बाबा भदर्गे, अशोक उफाडे आदी उपस्थित होते.

एसटी नांदेड आगारात भारतीय अवयवदान दिन साजरा; कामगार - कर्मचाऱ्यांनी घेतली अवयवदानाची शपथ

इमेज
नांदेड- केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता भारतीय अवयवदान दिन (इंडियन ऑर्गन डोनेशन डे) साजरा करुन कामगार कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या शपथ घेऊन अवयवदान दिनानिमित्त जनजागृती केली. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन अवयवदानाबद्दल आपले मनोगत विषद केले. ते आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, एका अवयवदात्यामुळे ८ ते ९ जिव वाचवू शकतो म्हणून समाजातील अवयवदानाबद्दलच्या समज गैरसमज मानसिकतेबद्दल एक लोकचळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्या भारत देशामध्ये १९९४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपणाची क्रिया झाली असून त्या अवयवदात्याच्या स्मरणार्थ ३ ऑगस्ट हा दिवस भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो, असेही ते यावेळ...

क्रांतीसिंह नाना पाटील हे प्रतिसरकार स्थापन करुन रयतेची सेवा करणारे थोर क्रांतीकारक - गुणवंत मिसलवाड

इमेज
नांदेड- आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान क्रांतीकार झाले. १९४२ च्या नंतर ब्रिटीशांविरुद्ध चले जाव चळवळीला प्रारंभ झाला, अशातच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करुन आपला कारभार लोकाभिमुख करुन आपणच चालवणे हे ध्येय उराशी बाळगून प्रति सरकारांतर्गत सांगली, सातारा जिल्ह्यातील १५०० खेडीगावातील रयतेची सेवा करणारे थोर क्रांतिकारक म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता झुंजार नेते, पत्री सरकार निर्माते, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, एक धगधगती मशाल क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, क्रांतीसिंह नाना पाटील यांना जेल झाली. नंतर ते भूमीगल राहून प्रतिसरकारची सूत्रे हलवली. ...

एसटीचे बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांची वाहतुक अधीक्षक पदी निवड; कामगार - कर्मचाऱ्यांकडून सत्कार

इमेज
नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख मा. श्री. मासीन हमीद खान यांची वाहतुक निरीक्षक (टी. आय.) पदावरुन बढ़ती होऊन आता ते सहाय्यक वाहतुक अधीक्षक (ए.टी.एस.) या पदावर रा.प.म. नांदेड आगारात रुजू होऊन पदभार स्वीकारल्याबद्दल एसटी नांदेड आगार कामगार- कर्मचा-यांच्यावतीने त्यांचा एसटी कामगार संघटनेचे आगार सचिव मा.श्री. एम.डी. गौस यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहाराने हृदय साकार करुन पेढा भरवून अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, मा.श्री. यासीन हमीद खान हे आगारातील कामगार कर्मचान्यांमध्ये समन्वय ठेवून आपले दैनिक कर्तव्य पार पाडत असतात, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, खान साहेब हे स्मितहास्य, मृदू स्वभाव असं एक आगळं वेगळं व्यक्तीमत्त्व असून भविष्यात कामगार कर्मचायांचे प्रश्न अडीअडचणी समजून घेऊन कामगारा...

डॉ.अप्पासाब विठ्ठल हेगडे, यांच्या हस्ते सत्य दातांच्या दवखाना, पीडितांना फूड किटचे वाटप

इमेज
रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावातील केअर सेंटरमध्ये रविवारी डॉ.अप्पासाब विठ्ठल हेगडे, यांच्या हस्ते सत्य दातांच्या दवखान्यातील पीडितांना फूड किटचे वाटप करण्यात आले.           यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे, उपाध्यक्ष आझाद तासेवाले, अनिल हंजे, शांतीनाथ पाटील, चिदानंद मंगसुळे, महादेव तारातुरे, बाळासाहेब चौगले, अजित चंपू, संजय भापकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. 

नाईट कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेच्या अनावरण

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) : येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय सरोजिनीताई खंजिरे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा इचलकरंजी चे कार्याध्यक्ष श्री राजन मुठाणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंदर नारे उपस्थित होते.           यावेळी बोलताना श्री राजन मुठाणे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान स्पष्ट करताना अण्णा भाऊ यांनी गरीब, दलित व वंचित समाजाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून केले. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख आणि अवहेलना अण्णाभाऊ साठे यांनी कणखर व्यक्तीरेखांच्या माध्यमातून मराठी साहित्यात अजरामर केले असे प्रतिपादन केले. तसेच अण्णाभा...

के.आय.टी संस्थेच्या अध्यक्षपदी साजिद हूदली उपाध्यक्ष सचिन मेनन यांचा सत्कार

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे कोल्हापूर दिनांक 3 ऑगस्ट कोल्हापूर टेक्निकल इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षपदी साजिद हूदली व उपाध्यक्षपदी सचिन मेनन यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व युवक चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार रेशन संघटना जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र मोरे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते हिदायत मणेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. गुणवत्ता व विद्यार्थी हीत जोपासणारी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कर्तुत्ववान पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी  प्राचार्य मोहन वनरूटृऻ,डीएम फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश मणेर उद्योजक प्रकाश द्राक्ष भास्कर कांबळे तोहिद मणेर,मोहम्मदअली मणेर आदी मान्यवर उपस्थित होते.

रायबाग : तालुक्यातील नगराळ (रायबाग रेल्वे स्टेशन) येथील क्रांतिवीर सांगोली रायण्णा पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाचे उद्घाटन

इमेज
रायबाग : क्रांतिवीर सांगोळी रायण्णा यांची जयंती त्यांच्या संघर्षाचा आदर्श आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांची जयंती सार्थपणे साजरी करावी, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा केएमएफचे संचालक तथा विधान परिषदेचे माजी सदस्य विवेकराव पाटील यांनी केले.  रायबाग तालुक्यातील नगराळा (रेल्वे स्टेशन) येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, जयंतीउत्सवाच्या नावावर जादा पैसा खर्च न करता संगोळी रायण्णा जयंतीउत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांची सेवा केली जाईल. बुद्ध, बसवण्णा, आंबेडकर यांच्यासह महान नेत्यांची चाचणी घेतली आणि त्यांना बक्षिसे देऊन महान लोकांबद्दल जागरूकता निर्माण करायची होती.   वकील रायप्पा गोंडे, बीरप्पा गोंडे, बाळाप्पा गोंडे, सुशील शेट्टी, बाळू पाटील, अण्णाप्पा मुधोळ, अप्पासाब केंगन्नवर, रमेश कुंभार, वसंत कांबळे, संतोष दीपले, रमेश गोंडे, अण्णाप्पा मर्चंट, अर्जुन मर्चंट आदींसह अनेकजण उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथील दुर्घटनास्थळाला भेट मृताच्या कुटुंबियांना चार लाखाची मदत तात्काळ जाहीर. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार

इमेज
कोल्हापूर, दि. 2 शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सात जण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यापैकी एक जणाचा बुडून मृत्यू झाला, दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत.  चौघेजण पोहून बाहेर आले. या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी दोनच्या सुमाराला  शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे तातडीने भेट दिली. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच दुर्घटनेतून वाचलेल्या इतर जखमींची विचारपूस केली.        पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.    पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी एनडीआरएफच्या जवानांकडून शोध व मदत कार्याची माहिती  घेतली. केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकच्या एसडीआरएफच्या सात बोटी शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.  ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) कोरेगाव तालुका व अण्णा भाऊ साठे नगर कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट, अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी

इमेज
कोरेगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) कोरेगाव तालुका व अण्णा भाऊ साठे नगर कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी दिली. यावेळी जयंती कार्यक्रमास मा.आमदार  श्री शशिकांत शिंदे साहेब, आर पी आय युवक तालुका उपाध्यक्ष ऋतुराज वायदंडे,नगरसेवक हेमंत बर्गे, नगरसेव गणेश धनवडे,आर पी आय तालुका कार्याध्यक्ष पंकज जावळे, जिल्हा सचिव महिला वनिता खवळे, तालुका अध्यक्ष मनीषा सोनवणे, महिला तालुका उपाध्यक्ष पूजा साळुंखे, कोरेगाव शहर अध्यक्ष धनश्री भिसे, प्रकाश कांबळे, प्रशांत अवघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवर यांनी प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पअर्पण करून अभिवादन केले.      यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी म्हणाले, थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे कार्य एका जातीपुरते नाही तर सर्व शोषित वंचित समाजासाठी होते. अण्णा भाऊ साठे यांना एक मराठी समाजसुधारक, लोककवी ...

विद्यार्थ्यांनी सकारात्मक दूरदृष्टी ठेवावी : प्रा के एम भोसले

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : शिक्षणात अमुग्राह बदल होत आहेत यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दूरदृष्टी ठेवून शिक्षण क्षेत्रात गरुड भरारी घेणे गरजेचे आहे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी  लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी केले   विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गाची "मासिक पालक सभा संपन्न झाली यावेळी प्रा भोसले यांनी मार्गदर्शन केले  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली .  पालक प्रतिनिधी सौ. सुप्रिया कांबळे , सौ. फरजाना मुल्ला , सौ. रुपाली सुर्यवंशी  पांडुरंग वरक यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत , प्रास्ताविक करून संस्कार गुरुकुल "उपक्रमाची सौ.जयश्री पाटील यांनी माहिती दिली. नितिन बागुल यांनी नुकत्याच झालेल्या पायाभूत परीक्षेच्या निकालाचे वाचन केले.सौ. असिया तांबोळी यांनी इंग्रजी विषयाच्या संदर्भात पालकांना ...

विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक- डॉ. सुनिता दीक्षित ( देशपांडे) यांचे प्रतिपादन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  नूतन कन्या प्रशाला वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 2024. सेलू :विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी ज्ञाननिष्ठा, गुरुनिष्ठा ,अध्ययननिष्ठा एकाग्रता चतु:सूत्रीचा नेहमीच वापर करावा. विद्यार्थ्यांना गुरुजनां प्रती नेहमीच आदर असावा. नम्रता अंगी असावी. ध्येय मोठे ठेवावे आणि ध्येयप्राप्तीसाठी नेहमीच प्रयत्नशील असावे." असे प्रतिपादन डॉ. सुनिता दीक्षित( देशपांडे) यांनी केले. दि.01 ऑगस्ट 2024 श्रीमती लक्ष्मी बाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग गुणवंत विद्यार्थिनी सत्कार सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.सुनीता दीक्षित बोलत होत्या.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. सौ. सुनिता दिक्षित (देशपांडे) एम.बी.बी.एस.,एम.डी.(पॅथाॅलाॅजी) नांदेड, संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर,शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, कार्यकारी मंडळ...