श्री केशवराज बाबासाहेबांचा यात्रा महोत्सव. शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद. सेलूमध्ये दर्शनासाठी रीघ.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : शिर्डीचे संत साईबाबा चे सदगुरू व सेलू चे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या (व्यंकुशाह) २२४ व्या यात्रा महोत्सवाचा मंगळवारी २६ डिसेंबर रोजी (श्री दत्त जयंती) मुख्य दिवस होता. यानिमित्ताने महापूजा महाआरती झाली. व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित पारंपारिक भंडारा महाप्रसाद घेण्यासाठी सेलूसह परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी ही सकाळ पासूनच रीघ होती.
दुपारी साडेबारा वाजता श्री च्या तीर्थप्रसाद शिंपनानंतर श्री साईबाबा मंदिर परिसरात महाप्रसादाला सुरूवात झाली. यावेळी मुकेश बोराडे अशोक मंत्री गंगवाल माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे सतीश दिग्रसकर राजू पटेल बाळु मंत्री आदीसह व्यापारी मंडळाची मोठी उपस्थिती होती. महीला पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सेलुतील व्यापारी मंडळ साईबाबा संस्थान श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान यात्रा कमिटी तसेच विनोद बोराडे मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचा शिस्तबद्ध वाटपासाठी परिश्रम घेतले . सोमावरी श्रीमद भागवत कथेची सांगता झाली. सभापती अशोक काकडे यांच्या वतीने आयोजित महाप्रसादासाठी ही भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भागवताचार्य गोंदिकर महाराज यांच्यासह श्री केशवराज बाबासाहेब महाराजाचे वंशज लक्ष्मीकांत सुभेदार राम सुभेदार तसेच माजी आमदार विजयराव भांबळे उद्योजक रामप्रसाद घोडके सभापती चकरधर पौळ पूजारी नितिन जोशी यांच्या सह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिला काकडे  किशोर जोशी सूर्यकांत बिनीवाले सुभाष कुलकर्णी माधव वानरे आदींची उपस्थिती होती. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्र संचलन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले. रात्री पुरुषोत्तम महाराज वालुरकर यांचे श्रीहरी किर्तन झाले. यावेळी संस्थेचे पूजारी केशव वामन पुरुषोत्तम सुधीर मंडलिक यांची उपस्थिती होती. पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात
श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या २२४ व्या यात्रा महोतस्ववानिमित्त मंगळवारी २६ डिसेंबर रोजी पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला श्री दत्त जयंतीला यात्रेचा मुख्य दिवस असतो. यानिमित्ताने सकाळ पासूनच मंदीरात दर्शनासाठी भाविकांची रीघ होती. दुपारी तीनच्या सुमारास मंदिरातून श्रीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यात्रेनिमित गुरूशंकर नागुला, ऋतुराज माने व मित्रमंडळाच्या पुढाकाराने मंदिर गाभाऱ्याच्या दर्शनी भागात नारळाच्या पानाची देखणी सजावट करण्यात आली आहे. पालखीही नारळाच्या पानामध्ये नक्षिदाराने सजविण्यात आले होते. नेहमीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपरिक कानगी प्रसाद घेतला. महीला व पुरुष भजनी मंडळाच्या उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.